 |
ती आणि मी
(पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा)
Author: भवरलाल जैन Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
विख्यात
उद्योगपती भवरलाल जैन यांची आत्मकथा.
"हे रा. भवरलाल जैन यांचे आत्मचरित्रही असेच कांताबाई जैन यांचे चरित्र झाले
आहे. आपल्या विवाहसंस्थेचे हे अगम्य रूप आहे, की पती-पत्नी हे उशिरा
विवाहोत्तर एकत्र येऊनही किती एकमेकांशी एकरूप होऊ शकतात. आत्मचरित्राच्या
सीमा ओलांडून चरित्रात जाणार्या कथनांचे रहस्य या हिंदू विवाहसंस्थेतल्या
संस्कारांशी निगडित आहे. " -- भालचंद्र नेमाडे यांच्या प्रस्तावनेतून
Maharashtra Times Review |
 |
गीत महाभारत
(पुस्तक विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा)
Author:
शशिकांत पानट
Publisher: नवचैतन्य प्रकाशन
"माणसाच्या मनातील सुविचार
आणि कुविचार यांचा झगडा व्यासांनी महाभारतातील पात्रांकडून वदवला आहे. त्या
व्यक्तिरेखांमध्ये गुणांचे आधिक्य आहे, परंतु सर्वगुणसंपन्नता नाही, म्हणून
ती वास्तव वाटतात; ओळखीची वाटतात. महाभारतकारांनी मानवी अंतरंगावर शोधज्योत
टाकली आहे, की जी विदारक नाही, विध्वंसक नाही, मूर्तिभंजक नाही, आणि
आपेक्षक तर नाहीच नाही. ती निरीक्षणाची, संशोधकाची, शिष्याची, समाजसुधारकाची
शोधज्योत आहे."
LokasattA Review |