Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


इंदिरा गांधी एक वादळी पर्व
Author: माधव गोडबोले
Publisher: राजहंस प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $10.66 (~280 Pages)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
अवघ्या ४८ व्या वर्षी पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधींची कारकीर्द तब्बल १६ वर्षांची होती. ती नेहरूंच्या कारकिर्दीपेक्षा केवळ १ वर्षाने कमी होती. नेहरूंच्या कन्या असूनही त्यांच्या व नेहरूंच्या कारकिर्दीत जमीन-अस्मानाचा फरक होता. अनेक कारणांनी इंदिरा गांधींची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरली.
देशावर लादलेली आणीबाणी; कोणताही विधिनिषेध न ठेवता, बेदरकारपणे स्वत:च्या फायद्यासाठी केलेले कायदे; राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीतच केलेला बदल; न्यायव्यवस्था व प्रशासन बांधील करण्याचे धोरण; कायद्याचे राज्य या तत्त्वाबाबत पुन:पुन्हा दाखवलेला अनादर या नकारात्मक बाबींबरोबरच त्यांच्या कार्याच्या सकारात्मक बाजूचा - बांगलादेशची निर्मिती, पहिला अणुस्फोट, अन्नधान्य उत्पादनातील स्वयंपूर्णता, खलिस्तान चळवळीचा बीमोड - उल्लेख करावा लागेल. त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, पर्यावरण व वन्यजीवन क्षेत्रांना दिलेले प्रोत्साहनही उल्लेखनीय होते. त्यांना काव्य, कला, संगीत, साहित्य यांत रस होता. पण राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा आमूलाग्र वेगळी, सत्ता टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारी, तत्त्वहीन, नीतिमत्ता बाजूला ठेवणारी अशी होती. यांतील ख-या इंदिरा गांधी कोण होत्या, हे एक अद्यापही न सुटलेले कोडे आहे.
इंदिराजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करून त्यांचा वारसा आज कसा दिसतो, याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. पण तो भविष्यात काय राहील, हे इतिहासच ठरवेल; कारण त्याच्या कसोटीचे निष्कर्ष शाश्वत व कठोर असतात.
इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचे हे सरळसाधे चरित्रकथन नाही; ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्या अनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.
बांगलादेश युद्धापासून ब्ल्यू स्टार' मोहिमेपर्यंत, अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत, बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत ... इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली, ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली, याचे एका ज्येष्ठ सनदी अधिका-याने केलेले हे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवील आणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.

Saptahik Sakal Review

Write your review for this book

Other works of माधव गोडबोले
   जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व - एक सिंहावलोचन
   लोकपालाची मोहिनी
   भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
   फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा
   अपुरा डाव

Similar books:
  राजकीय
   पाकिस्ताननामा
   ५५ कोटींचे बळी
   मी अत्रे बोलतोय
   झाडाझडती
   ताम्रपट
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.