Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


वाटचाल फर्ग्युसनची
Author: संपादित
Publisher: मेहता प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $22.85 (~630 Pages)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
फर्ग्युसनची १२५ वर्षांची वाटचाल उलगडणारा हा ग्रंथ आहे. फर्ग्युसन कॉलेज हे पुण्याच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या कॉलेजची उज्ज्वल शिक्षक, प्राचार्य, विद्यार्थी परंपरा या ग्रंथातून अधोरेखित होते. तसेच फर्ग्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या आणि छोट्या घटनांची नोंद घेतल्याने हा ग्रंथ बण्याच अंशी परिपूर्ण वाटतो. ग्रंथातील छायाचित्रे, जोडलेली परिशिष्टे आणि संदर्भग्रंथ सूची यामुळे या ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थितीचाही बोध या ग्रंथातून होतो. एवूणच फर्ग्युसनची वाटचाल उलगडणारा हा ग्रंथ फर्ग्युसनसाठी एक आदर्श संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे नेटक्या आणि साक्षेपी संपादनाचं एक आदर्श उदाहरण ठरावं.
पूर्वपीठिका या प्रकरणात कोणत्या पाश्र्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची, न्यू इंग्लिश स्कूलची आणि फर्ग्युसनची स्थापना झाली त्याचा तपशील दिला आहे आणि फर्ग्युसनचा शुभारंभ या प्रकरणात फर्ग्युसनचा शुभारंभ कधी आणि कुठे झाला, फर्ग्युसन हे नाव का दिलं गेलं, याचा उल्लेख आहे. तसेच फर्ग्युसनचा शुभारंभ सोहळा, त्याला उपस्थित असलेले मान्यवर, त्यांनी केलेली भाषणे, डेक्कन कॉलेजच्या विलीनीकरणाचा सरकारकडून आलेला प्रस्ताव, फर्ग्युसनचे नवीन जागेत झालेले स्थलांतर, फर्ग्युसनची पहिली दहा वर्षे, फर्ग्युसनच्या संदर्भातील आर्थिक बाबी, पदवी परीक्षेचा व्यापक केलेला अभ्यासक्रम, वसतिगृह योजना, फर्ग्युसनचे पहिले विद्यार्थी संमेलन, टिळकांचा राजीनामा इ. महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश या प्रकरणात आहे. प्लेगच्या आपत्तीचे दशक या प्रकरणात फर्ग्युसन कॉलेजच्या नव्या मुख्य इमारतीचे झालेले उद्घाटन, आगरकरांचे निधन, सोसायटीच्या घटनेत झालेल्या महत्त्वाच्या दुरुस्त्या, प्लेगची भयानक वर्षे, र.पु. परांजपे रॅंग्लर झाल्याची घटना इ. बाबींची नोंद आहे. फर्ग्युसनचा नवा अध्याय या प्रकरणात रॅंग्लर परांजपे यांचा सुवर्ण कालखंड, इमारतींची भर, शास्त्रशाखेच्या प्रयोगशाळा, वसतिगृहांचा विस्तार, विद्यार्थिनींचे वसतिगृह, फर्ग्युसनमधले निवासी बंगले, फर्ग्युसन आणि डेक्कन यांची तुलना, मुंबई विद्यापीठाशी बदलते संबंध, फर्ग्युसनचे नियामक मंडळाशी संबंध, शिक्षकवर्ग, फर्ग्युसन आणि ब्रिटिश सरकार, फर्ग्युसन आणि जनमत इ. मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. वादळी वाटचाल सुवर्णमहोत्सवाकडे या प्रकरणात ज्येष्ठांचे निधन, आजीव सदस्यांत मतभेद, हॉटसन प्रकरण आणि फर्ग्युसनमधले महाभारत, सरकारबरोबरील मतभेद, विद्यार्थी परीक्षांमधील उज्ज्वल निकाल, फर्ग्युसनच्या सुवर्ण महोत्सवाचा मुख्य समारंभ इ. मुद्द्यांचे विवेचन केले आहे. फर्ग्युसनचे काही सेवक या प्रकरणात वामन शिवराम आपटे, बाळ गंगाधर टिळक इत्यादींसह फर्ग्युसनच्या काही सेवकांचा अल्प परिचय दिला आहे. माजी विद्याथ्र्यांच्या काही आठवणी या प्रकरणातून आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, विठ्ठल रामजी शिंदे, शवुंतला परांजपे इ. विद्याथ्र्यांनी फर्ग्युसनमधील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला आहे. हे पहिल्या भागातील शेवटचे प्रकरण असून, फर्ग्युसन कॉलेजच्या सुवर्णमहोत्सव प्रसंगी आलेले संदेश, शास्त्र विषयांचे शिक्षण, ग्रंथालयाचा विकास, फर्ग्युसन कॉलेज मॅगेझीन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे व तिच्या परिषदेचे अध्यक्ष (१८८४ १९३५) अशी पाच परिशिष्टं जोडण्यात आली आहेत. दुसण्या विभागातील पहिलं प्रकरण आहे सुवर्णमहोत्सव ते हीरकमहोत्सव. या प्रकरणात सुवर्णमहोत्सव ते हीरकमहोत्सव या दरम्यानच्या ठळक घटनांची नोंद घेतली आहे. जसे रॅंग्लर परांजपे यांचा ६१वा वाढदिवस, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्या पुतळ्याचे अनावरण इ. तसेच फर्ग्युसनच्या हीरकमहोत्सवी सोहळ्याचे वर्णन यांचा समावेश आहे. दुसण्या विभागातील दुसण्या, तिसण्या, चौथ्या, पाचव्या प्रकरणात १९३५ ते १९८५ पर्यंत जे जे प्राचार्य फर्ग्युसनला लाभले त्यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान फर्ग्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना, तसेच त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांचा आढावा घेतला आहे. या विभागातील दुसण्या प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाचे नवीन अभ्यासक्रम (१९४७) हे विस्तृत परिशिष्ट जोडले आहे. तिसण्या विभागातील पहिल्या ते पाचव्या प्रकरणात १९८५ ते २०१० दरम्यान फर्ग्युसनला लाभलेले प्राचार्य, त्यांची कारकीर्द आणि त्यांच्या कारकिर्दीदरम्यान फर्ग्युसनच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना, तसेच त्यांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक घटनांचा आढावा घेतला आहे. या विभागातील दुसण्या प्रकरणाच्या शेवटी कलांचे आविष्करण (आविष्कार, इनसिंक, स्पीकमॅके) हे परिशिष्ट जोडले आहे. ग्रंथाच्या शेवटी निवडक संदर्भ-साहित्य सूची जोडली आहे
संपादन - डॉ. वि. मा. बाचल

Write your review for this book

Other works of संपादित
   मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार
   ग्रामीण साहित्याचा इतिहास
   मराठीची बोलु कौतुके
   करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी- माझं कुलदैवत
   श्रीशिवलीलामृत (मोठा ताइप)

Similar books:
  इतिहास
   श्रीमान योगी
   मुस्लिम मनाचा शोध
   गांधीहत्या आणि मी
   मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
   मोगरा फुलला
   More ...  
  शैक्षणिक
   देवपूजा अशी करा
   संपूर्ण चातुर्मास
   वाचिक अभिनय
   श्रीपाद दाभोळकर, प्रयोग परिवार : काल-आज-उद्या
   श्रीगणेश उपासना अशी करा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.