|
कथा भागवत भाग १ व २
Author: शं. रा. देवळे
Publisher: कॉंटिनेंटल प्रकाशन
|
|
Price: $9.74*
Reaches you in 4 to 5 weeks (More options)
|
* Price is inclusive of "Standard" shipping charges. Additional charges will apply for "Express" shipping.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: भागवत पुराण हे अठरा पुराणांपैकी सर्वात लोकप्रिय पुराण आहे. अठरा पुराणांपैकी दहा शिवविषयक, चार विष्णुविषयक, दोन ब्रह्माविषयक, एक अग्निविषयक आणि एक सूर्यविषयक अशी आहेत. त्यांपैकी भागवत पुराण, विष्णुपुराण, मत्स्य-पुराण आणि वायुपुराण ही अधिक प्राचीन आहेत. भागवतातील भक्तांच्या कथा अतिशय रंजक आणि बोधप्रद आहेत. ध्रुव, प्रल्हाद, अजामीळ, सुदामा यांच्या कथा पुन:पुन: वाचण्यासारख्या आहेत. या कथा रंजक तर आहेतच शिवाय त्या इश्वरभक्तीचे माहात्म्य वाचकांच्या मनावर बिंबवितात. भागवतातील सर्व कथा भकितप्रद असल्या तरी त्या कथांतील विविधतेमुळे भागवत हा ग्रंथ आकर्षक झाला आहे. अत्यंत प्राचीन काळापासून लोकांत रुढ असलेल्या भक्तांच्या श्रेष्ठ कथांचा संग्रह भागवताने केला आहे.सापत्न मातेच्या छळामुळे इश्वराच्या भेटीसाठी तडक रानात निघालेला ध्रुव, साक्षात पित्यानेच वैर आरंभिले असतानाही अनेक कठोर प्रसंगांतर इश्वराच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणारा प्रल्हाद, पशू असूनही भक्तीच्या उत्कटतेमुळे संकटमुक्त होणारा गजेंद्र, आयुष्यभर पापे करणारा पण अखेरीस मुलाच्या निमित्ताने नामस्मरण घडून उद्धार झालेला अजामीळ, द्वारकाधीश श्रीकृष्णासारख्या मित्राला दोन मुठी पोहे प्रेमाने भेट म्हणून नेणारा सुदामा, वैराग्याचे पुतळे असलेले शुक व ऋषभदेव, तर सर्व तर्हेची सुखे उपभोगूनही त्यांपासून अलिप्त राहणारा पूर्णावतार श्रीकृष्ण - आशा विविध व्यकितचित्रांमुळे भागवत ग्रंथ सुरस झाला आहे. भागवतात काव्य आहे, तत्त्वज्ञान आहे, भक्ती आहे, कथा आहेत. या सर्वांचा थोडक्यात परिचय व्हावा म्हणून हा कथारुप प्रयत्न आहे.
|
 |
 |
|