|
'अंतर्नाद' मासिकाच्या सौजन्याने ...
वीस श्रेष्ठ पुस्तकांची यादी करण्याचा उपक्रम
'अंतर्नाद' मासिकाने दिवाळी २००५ ते दिवाळी २००६ मध्ये केला. साहित्य अकादेमी
पुरस्कारप्राप्त प्रत्येक वर्षांची सर्वश्रेष्ठ पुस्तके, महाराष्ट्र टाईम्सने १९८६मध्ये
प्रकाशित केलेली १०० सर्वोत्कृष्ट पुस्तके व नंतर मुंबई 'आकाशवाणी'ने १९९७ मध्ये
निवडलेली १८ पुस्तके अशा यादीतून १०० निवडक पुस्तकांची यादी अंतर्नाद दिवाळी २००५
च्या अंकात प्रसिद्ध केली गेली. त्यातून २० पुस्तके निवडण्याचे आवाहन वाचकांना केले
होते. पहिला टप्पा म्हणून ५० पुस्तकांची यादी जानेवारी २००६ मध्ये प्रकाशित झाली व
शेवटच्या टप्प्यात सर्वश्रेष्ठ २० पुस्तकांची यादी 'अंतर्नाद' दिवाळी २००६ अंकात
प्रसिद्ध झाली.
अंतर्नाद २००६ दिवाळी वार्षिक अंकात
प्रसिद्ध झालेली सर्वश्रेष्ठ पुस्तकांची अंतिम यादी
|
कादंबरी (५)
१. श्यामची आई - साने गुरुजी
२. रणांगण - विश्राम बेडेकर
३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४. ययाती - वि. स. खांडेकर
५. कोसला - भालचंद्र नेमाडे
कथा (४)
६. चिमणरावांचे चर्हाट - चिं. वि. जोशी
७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
नाटक (१)
१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर |
कविता (४)
११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत
१२. विशाखा - कुसुमाग्रज
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. मृद्गंध - विंदा करंदीकर
समीक्षा (१)
१५. युगांत - इरावती कर्वे
चरित्रे/आत्मचरित्रे (३)
१६. स्मृति-चित्रे - अक्ष्मीबाई टिळक
१७. बलुतं - दया पवार
१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
संकीर्ण (२)
१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
२०. मणसं - अनिल अवचट |
भारताबाहेरच्या वर्गणीदारांसाठी सूचना
दूरध्वनी संपर्कः +९१ (२०६) ५२२-७२३३
ई-मेलः bhanukale@vsnl.com
कार्यालयः सी-२ गार्डन इस्टेट
वायरलेस कॉलनीजवळ, औंध
पुणे ४११ ००७
|