Marathi CDs & Cassettes Online Marathi Books Shopping Cart

Quick Search:   

    Advanced Search

You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com"  

About Us New
Marathi Books - Select books and Diwali amk.
- Pay by Credit Card,
- Receive package via air-mail.
- Sent word-wide.
- NO shipping charges!
Marathi Library - Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
  Read Synopsis of Books
  Browse Authors
  New Additions
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
English Books
  Maharashtra
  India
Tell us your favorite marathi books

रसदार वाङ्मयसाहित्याचा घरबसल्या आस्वाद ... रसिक.कॉम
सौ. लता भावे, पुणे/सॅन-होजे

विविध व्यक्तींच्या विविध आवडी-निवडी व छंद असतात. त्यापैकी एक म्हणजे वाचनाची आवड. रिकाम्या वेळात मनोरंजन, थकल्या-भागल्या मनाला विरंगुळा, ज्ञानवृद्धी इ. साधले जाते. काहींना दर्जेदार साहित्य आवडते, काहींना हलके-फुलके पण चांगले साहित्य हवे असते, काहींना ठराविक प्रकारचे, तर काहींना विशिष्ट विषयावरील साहित्य हवे असते. आणि ते जर उपलब्ध असेल तर काही प्रश्नच नाही असे वाटते. पण अमेरिकेत फार पूर्वीपासुन येऊन इथे राहाणार्‍यांना आणि नव्याने येणार्‍यांना हा एक मोठा प्रश्नच असतो की हे साहित्य इथे कसे मिळवायचे? अमेरिकेत या दृष्टीने सोय आहे का? अशी सोय करता येईल का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला रसिक.कॉम ही वेबसाईट बघायला हवी. कारण वाचन भुकेला खाद्य लगेच मिळवायला हवे ना?

रसिक.कॉम च्या श्री. रवी आपटे आणि श्री. अजित भावे या दोन संचालकांशी या बाबतीत बोलण्याचा योग माझ्या प्रस्तुतच्या अमेरिका भेटीत आला.

भावना व उद्देश

"अमेरिकेशी मराठी भाषिकांचे आवागमन गेल्या काही वर्षांत वाढले आहे. कमीजास्त कालावधीसाठी येणार्‍यांना दैनंदिन गरजेचे सर्व साहित्य वेबसाईटवर उपलब्ध आहे, तसेच "वाचन-साहित्य" पण आहे" असे श्री. रवी आपटे म्हणाले. त्यांनी सांगितले की "'रसिक' ह्या शब्दाची निवड करतांनाच आम्ही दर्जेदार साहित्य व ते वाचकांपर्यंत दर्जेदार सेवेने पोहोचवण्याची व्यवस्था हा मूळ उद्देश ठेवला". मराठी भाषिकांना संस्कृती जतन करण्यासाठी वाचन-साहित्य सहज उपलब्ध करून देण्याच्या कल्पना श्री. आपटे यांच्या मनात बरेच दिवस रुजत होत्या. मराठी भाषिकांचा वाढता वाचकवर्ग, दूरसंचार सेवेतली विविधता व संगणकाद्वारे सुलभ झालेल्या अनेक सोयी यांचा उपयोग करून त्यांनी मनातल्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

पूर्वतयारी

भारतातून लोकप्रिय, श्रेष्ठ पुस्तके संग्रही ठेवण्यासाठी श्री. आपटेंनी पुस्तक खरेदी सुरू केली . ३००० पुस्तकांचा संग्रह आपल्या घरी तयार केला व प्रारंभी पुस्तक विक्री करण्याच्या दृष्टीने काम सुरू झाले. भारतभेटीतील अल्पकाळात पुस्तके विकत घेऊन इथे आणणे, किंवा आप्तेष्टांकडून आवडीची पुस्तक मागवणे सर्वांना शक्य नसते. म्हणून 'रसिक'कडून १९९८ मध्ये पुस्तकविक्री सेवा सुरू झाली.

सेवेचा श्रीगणेशा व पुढील वाटचाल

वाचकांकडून या सेवेला प्रचंड प्रतिसाद ताबडतोबच मिळाला. वाचकांकडून अनेक सूचना घेऊन रसिक.कॉम वेबसाईटवर दिसणारी माहिती आकर्षक करण्यात आली, वेबसाईटशी झटापट न करता पुस्तक विकत घेण्याची क्रिया पण अगदी सुलभ करण्यात आली. पुस्तके, लेखक, प्रकाशक यांच्या लांबलचक याद्या देण्याऐवजी सोपा "मराठी शब्दांतर्फे शोध" हा मार्ग वेबसाईटवर निर्माण केला गेला. ३००० पुस्तकांचा रसिकांकडून फडशा उडण्याआधीच, वाचकांनी विकत घेतलेली पुस्तके खरेदी करणार्‍याला भारतातून सरळ घरपोच करण्याची सोय पण पुण्यातल्या गॅलक्सी इंटरनॅशनलच्या सौ. सुनिता देसाई यांच्या सहकार्याने सुरु केली गेली.

पुस्तकविक्रीला प्रतिसाद मिळू लागण्याच्या आधारावर श्री. आपटे व श्री. भावे यांना आणखी एक कल्पना सुचली. ती म्हणजे पुस्तकविक्री सेवेला पुस्तक-वाचनालय सेवेची जोड देण्याची. दोघांनी सुसंबद्ध व सुटसुटीत वाचनालय सेवा देऊन 'रसिक'चा दर्जेदारपणा टिकेल अशी प्रक्रिया निश्चित केली. त्यांनी जणू ब्रीदवाक्यच तयार केले की "आमच्या सेवेतर्फे तुमच्या आवडीचे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर अगदी जगात कुठेही असलात तरी घरपोच; तुम्ही पुस्तकासाठी मागणी करा फक्त! अमेरिकेतल्या कोणत्याही भागात तुम्ही असलात तरी आम्ही आहोत वाचनालयाच्या घरपोच सेवेसाठी सुद्ध सिद्ध!" आणि या संचालकद्वयांना आता २००५ मध्ये सांगावेसे वाटते की २००२ पासून आम्ही सुरू केलेली पुस्तक-वाचनालय सेवा आता छान प्रतिसाद मिळवत आहे. श्री. भावे म्हणाले, "पुस्तकविक्री सेवेद्वारे आम्ही वाचकांचा पुस्तक-संग्रह समृद्ध करण्यासाठी सहाय्यक आहोत, तर पुस्तक-वाचनालय सेवेद्वारे आम्ही त्यांचे मनोरंजन व ज्ञानसमृध्हीही करीत आहोत".

"वाचनालयाची पुस्तके व्यवस्थित घरी पाठवण्याची काय व्यवस्था?" या विषयी श्री. भावे यांनी सांगितले की प्रारंभी पॉलिथिन पिशव्यांचा उपयोग करत होतो. पण पोस्टाच्या प्रवासात पिशव्या फाटणे, पुस्तके गहाळ होणे असे प्रकार फार होऊ लागले. "पण आता तसे होत नाही", असे ठामपणे, प्रसन्न मुद्रेने श्री. भावे म्हणाले. याला कारण त्यांनी सांगितले की "आता पुस्तके कार्ड-बोर्डच्या बॉक्समध्ये घालून, आजूबाजूला नीट पॅकेजिंगच्या गोळया ठेऊन वरचा भाग 'व्हेल्क्रो'च्या पट्टीने बंद केला जातो. आम्हाला पुस्तकांच्या नीट पोहोचण्याची समस्या उरलेली नाही आता!"

पुस्तकांच्या सेवेची काही वैशिष्टये

"मराठी पुस्तकांची विक्री व पुस्तक-वाचनालय इंटरनेटद्वारा करणारी रसिक.कॉम ही एकमेव सेवा आहे", हे रास्त अभिमानाने सांगून श्री. रवी आपटे म्हणाले, "आमच्या सेवेचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे हे पुस्तकालय इंटरनेटच्या जाळयावर आधारित असल्यामुळे कुणाला पुस्तके धुंडण्यासाठी कुठे जावे लागत नाही. पुस्तकांची मागणी अगदी घरबसल्या करता येते. आमच्या वेबसाईटवर पुस्तकांच्या सूचीचा शोध घेण्याची सुविधा आहे, मुखपृष्टाची चित्रे आहेत, बर्‍याच पुस्तकांची परीक्षणे पण आहेत. तुम्ही फक्त पुस्तकांची निवड करून आम्हाला कळवायची".

"आमची वेबसाईट आहे
www.rasik.com/marathi/ - पुस्तके विकत घेण्यासाठी आणि www.rasik.com/library/ - वाचनालयासाठी. त्यावर आपले नाव, पत्ता, इ-मेल-पत्ता अशी माहिती भरल्यावर आमच्याकडून तुम्हाला सभासदत्व म्हणून "User ID" मिळतो. त्या सभासदत्वाद्वारे पुढे तुम्ही पुस्तकांची देवाण-घेवाण करता. आपल्या मागणीनुसार पुस्तके लगेच पोस्टाने पाठवली जातात. वाचनालयातले पुस्तक बाहेर गेले असल्यास ते पुस्तक तुम्ही आमच्या प्रतिक्षासूचीत दाखल करू शकता. ते पुस्तक मग दुसर्‍या वाचकाकडून परत आले की तुम्हाला मिळू शकते."

श्री. भावे म्हणाले, "आमच्याजवळ सुमारे एक हजाराहून अधिक पुस्तके आहेत - काही लोकप्रिय पुस्तकांच्या एकाहून अधिक प्रती आहेत. त्यामुळे लोकप्रिय पुस्तके बर्‍याच वाचकांना एकाच वेळी वाचता येतात. हे एक वैशिष्टयच आहे आमच्या सेवेचे! आमच्या वाचनालय संग्रहात धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, तत्वज्ञानावरील, संशोधनपर ग्रंथांबरोबरच आत्मचरित्रे, चरित्रे, ललित लेख, कविता संग्रह इ. इ. सर्व प्रकारची पुस्तके आहेत."

तर श्री. रवी आपटे यांनी खुलासा केला की "२००१ सालापासून या संग्रहाला जोड म्हणून दिवाळी अंकांची पण भरती करण्यात आली आहे. दिवाळीच्या फराळाबरोबरच दिवाळी अंकाचा रुचकर आस्वाद आमच्या वाचकांना देण्याचा एक आगळाच आनंद आम्ही घेत आहोत."

वाचनालय सभासदत्वाचे नियम

'पुस्तकवाचनालयाच्या सेवेसाठी सभासदत्व कसे घ्यायचे?' हा एक प्रश्न तुम्हाला असणारच. "तो पण आम्ही सुलभच ठेवला आहे", असे श्री. आपटे म्हणाले. "त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक किंवा फक्त दिवाळी अंकांसाठी तुम्ही सभासदत्व घेऊ शकता. यातही आम्ही वाचकांच्या सोयीचाच विचार प्रामुख्याने ठेवला. कारण कोणाकडे ३-४ महिने आई-वडील येतात, आप्तमंडळी, मित्रमंडळी येतात. त्यांना करमणूक म्हणून पुस्तके, मासिके वाचायला हवी असतात. वर्गणी क्रेडिटकार्डाद्वारे द्यावी लागते. एखादे आवडते पुस्तक वा मासिक आमच्या संग्रहात नसले तर आमच्याकडे तशी मागणी केल्यास आम्ही आनंदाने त्याची विक्री-पुस्तकांच्या सूचीत वा वाचनालयात भरती करू शकतो. आणखी एका मुद्दयाचा खुलासा म्हणजे एका वेळी सहा पर्यंत पुस्तकांची वाचनालयातून मागणी करता येते. ती पुस्तके किती कालावधीत परत करायची व त्यासाठी लागणरे पोस्टेज इ. सर्व गोष्टी पुस्तकांच्या बॉक्स मध्ये तुम्हाला मिळतात."

"आमच्या या सेवेत काही वैयक्तिक कारणामुळे गैरसोयी भासत असल्यास किंवा सेवा सोयीत काही सुधारणा हवी असल्यास तसे आम्हाला कोणी कळवताच आम्ही त्यावर उदार दृष्टीकोनातून लगेच विचार करतो", असे श्री. आपटे आणि श्री. भावे यांनी मोकळया मनाने सांगितले.

वाचकांसाठी संदेश

आमच्या पुस्तकसंग्रहात भारतीय लेखकांची मराठी भाषेतली पुस्तके आहेतच. तसेच अमेरिकेत वास्तव्य करून असणारे व मराठी भाषेत लिखाण करणारे साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांना पण प्रसिद्धी देण्यात रसिक.कॉम सतत प्रयत्नशील आहे. कोणास संशोधनाच्या दृष्टीने, सखोल अभ्यास करण्यासाठी काही विशेष साहित्य हवे असल्यास ते सुद्धा उपलब्ध करून देण्याचा मन:पूर्वक प्रयत्न आम्ही करतो.

एकंदरीत 'रसिक' या शब्दाचा गर्भित अर्थ 'दर्जेदार, श्रेष्ठ, उच्च-स्तरित कृतीचा चहेता' हा आहे. आणि त्या अपेक्षेप्रमाणेच "आम्ही आमची ग्रंथसंग्रहालय-वाचनालय सेवा चालू ठेवण्यात अविरत प्रयत्नशील राहाणार आहोत" हा संदेश या मुलाखतीद्वारा रसिक.कॉम'च्या संचालकद्वयीला या दिवाळीच्या निमित्त द्यायचा आहे. आणि त्याबरोबरच दिवाळीच्या शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत.

 

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.