Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


मीडिया वॉच
Author: --------------------------
Publisher: ------------------------
Add to Shopping Cart
Price: $8.37 $6.69 20% OFF ( ~300 Pages, R275)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
२०२१ दिवाळी अंक
अनुक्रमणिका
संपादकीय कथा माणसांच्या ! - अविनाश दुधे - ०९
चेहरा आणि मुखवटे 'झिरो' टीआरपीवाला 'हिरो' पत्रकार - श्रीरंजन आवटे - ११
भारतीय राजकीय पटलावरचा प्रभावशाली जादूगर - मुक्ता चैतन्य - १७
मोदी सरकारवर बेधडक वार करणार्‍या महुआ मोईत्रा - अनुराधा कदम - २५
महानायक - मिथिला सुभाष - ३१
शर्माजींचा 'परफेक्ट' नसणारा बेटा! - अमोल उदगीरकर - ४१
तब्बू.. ज.हर खूबसूरत हैं आप! - जितेंद्र घाटगे - ४९
संथ वाहते कृष्णामाई - विजय चोरमारे - ५९
जी.ए.कुलकर्णी : एक अरभाट साहित्यिक! - हेमंत खडके - ६७
मैं जो हूअॅं 'जौन-एलिया' हूअॅं जनाब... - सानिया भालेराव - ७९
विज्ञान-तंत्रज्ञान कळे न हा चेहरा कुणाचा ? - नीलांबरी जोशी - ८५
मान्सून आणि भारतीय समाज-संस्कृती - सुनील तांबे - ९५
मंगळावर वस्ती करण्याचे स्वप्न जर पाहायचे तर.... - आनंद घैसास - १०१
आदिवासी संस्कृती-परंपरा हेमलकसाचा लोक बिरादरी प्रकल्प - अनिकेत आमटे - १२५
बस्तरची वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी संस्कृती - डॉ.ऐश्वर्या रेवडकर - १३३
आदिवासी संस्कृती आणि लोकसंस्कृती यातील आंतरसंबंध - मुकुंद कुळे - १४१
कथा बायांच्या... जगभरातील मैत्रिणींच्या भन्नाट कथा - सुलक्षणा व-हाडकर - १५१
गिरीजाबाईंची चटका लावणारी कहाणी - समीर गायकवाड - १६३
===
संपादकीय
कथा माणसांच्या!
माणूस ही निसर्गाची सर्वांत अद्भुत अशी निर्मिती आहे. पाच लाख वर्षांच्या मानवी इतिहासात अश्मयुगापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंत माणसाने अनुभव, मेहनत, चिकाटी व बुद्धिमत्तेच्या जोरावर या सृष्टीचा अक्षरश: कायापालट केला आहे. मनुष्यप्राण्याचा इतिहास हा मानवी कर्तृत्वाचा, पराक्रमाचा, जिद्दीचा, सृजनशीलतेचा, स्वप्नांचा पाठलाग करण्याचा इतिहास तर आहेच; सोबतच अमानुष कौर्य, अत्याचार, विषमता आणि नियतीच्या हातचे खेळणे बनून दुर्दैवाचे दशावतार अनुभवण्याचाही इतिहास आहे. वेगवेगळ्या युगात, कालखंडात विभिन्न रंगाच्या, वंशांच्या अब्जावधी स्त्री -पुरुषांच्या नवनिर्मितीच्या कथा - दंतकथा म्हणजेच मानवप्राण्याची कहाणी आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जगभरातील कोणत्याही रंगाच्या, वंशाच्या, धर्माच्या माणसाची सुख-दु:खाची कहाणी थोड्याफार फरकाने सारखीच असते. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाचं वेगळेपण काय असेल, तर बुद्धीच्या जोरावर अनुभवांचे विश्लेषण करून निष्कर्ष काढण्याची व आडाखे बांधून भविष्याचा वेध घेण्याची क्षमता! मनुष्यजातीत विकसित झालेल्या या क्षमतेमुळच माणसाने प्रगतीचा विस्मयचकित करणारा टप्पा गाठला आहे. या क्षमतेमुळेच हजारो वर्षांचे एकेक युग मागे सारत मानवी इतिहासातील सभ्यतेच्या (छिविलिzअतिओन) सर्वोत्कृष्ट अवस्थेला आपण पोहोचलो आहोत.
मनुष्यप्राण्याच्या इतिहासात सजीव जातींमध्ये केवळ माणसांच्या वाट्याला वैविध्यपूर्ण व मनोहारी अनुभव येतात. जगण्याच्या प्रक्रियेत येणार्‍या या अनुभवातून माणसाला सृष्टीबद्दलच्या अनेक रहस्यांचा उलगडा झाला. सोबतच अनेक नवीन प्रश्नही त्याच्या मनात रुंजी घालायला लागलेत. मानवी जगण्यातील हीच गंमत माणसाला अधिक समृद्ध करण्यासोबतच जगण्याप्रति नम्रही करत असावी. या अनुभवांच्या श्रीमंतीतूनच जगभर शेकडो महाकाव्याची, महाग्रंथांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक पिढीतील प्रतिभावंत, पराक्रमी, सृजनशील, कर्तृत्ववान माणसांसोबतच सर्वसामान्य माणसांच्या कथाही कमालीच्या वेधक असतात. 'मीडिया बअॅंच'चा या वर्षीचा दिवाळी अंक अशाच माणसांच्या कथांभोवती फिरणारा अंक आहे. रवीशकुमार, प्रशांत किशोर, मोईना मोइत्रा, अमिताभ बच्चन, कपिल शर्मा, तब्बू, जॉन आलिया, जी. ए. कुळकर्णी, जयंत पाटील या विविध क्षेत्रातील मातब्बरांच्या आयुष्याची जीवनकहाणी खूप काही सांगून जाण्यासोबतच, त्यांच्या आयुष्यातील अंधार्‍या कप्प्यांवर प्रकाशझोत टाकणारीही आहे. या अंकातील 'आदिवासींची संस्कृती-परंपरा' हा भाग, ज्यांना आदिम जमाती मानलं जातं, अशा माडिया, गोंड, मुरीया, भद्रा आदी जमातीबद्दलचं आकलन वाढविणारा आहे. 'जगणे बायांचे' या विभागातील दोन्ही लेख 'मीडिया वॉच'च्या वाचकांना कमालीचे आवडतील, ही खात्री आहे. जगभर भ्रमंती केलेल्या पत्रकार, सांस्कृतिक बुद्धिमत्ता विषयाच्या अभ्यासक सुलक्षणा व-हाडकर यांनी वेगवेगळ्या देशातील त्यांच्या मैत्रिणींच्या भन्नाट कथा सांगितल्या आहेत. लोकप्रिय ब्लॉगर समीरबापू गायकवाड यांची 'रेड लाईट डायरी' ही दरवर्षी 'मीडिया वॉच'च्या वाचकांना चटका लावून जाते. या वर्षीची गिरीजाबाईंची कहाणीही हुरहुर लावणारी आहे.
'मीडिया वॉच' दिवाळी अंकाचे हे नववे वर्ष आहे. पहिल्या वर्षीपासून वाचकांच्या जाणिवा विकसित करण्यासोबत त्यांचं भावविश्व समृद्ध करणारा मजकूर देण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न असतो. यावर्षीही तो प्रयत्न आम्ही केला आहे. कोरोना मागील दोन वर्षापासून माध्यम जगताची परीक्षा घेत आहे. 'मीडिया वअॅंच' लाही त्याचा फटका बसला. गेल्या दोन वर्षात अनेक व्यावसायिक जाहिरातदारांनी हात आखडते घेतले आहे. कोणत्याही काळात उपद्रव वा उपयुक्तता मूल्य यापैकी एक काहीतरी तुमच्याजवळ असलं, तर जग मदत करतं, ही वस्तुस्थिती ज्ञात असल्याने व्यावसायिक जाहिरातदारांच्या भरवशावर न राहता मित्र व स्नेही यांच्या सहभागातून, वाचकांच्या सहयोगातून 'मीडिया वॉच' चालावं, अशी भाबडी व आदर्शवादी कल्पना डोक्यात ठेवून गेल्या ९ वर्षापासून आमचा प्रवास सुरु आहे. नवल म्हणजे, या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी कोरोना ऐन भरात असताना वाचक व मित्रपरिवाराच्या लेहामुळे आम्ही अंक प्रकाशित करू शकलो. या वर्षीही तोच उमेद वाढविणारा अनुभव आहे. २० वर्ष वेगवेगळ्या माध्यमसमूहातील टोकाच्या व्यावसायिक अनुभवाच्या पार्श्वभूमीवर 'मीडिया वॉच'च्या निमिताने जे अनुभव मिळताहेत, ते चांगुलपणावरील विश्वास वादविणारे आहेत. आमचे सर्व मित्र, स्नेही व वाचकांच्या प्रेमाप्रति आम्ही कृतज्ञ आहोत. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
-- अविनाश दुधे

Write your review for this book

Other works of --------------------------
   आवाज
   माहेर
   कुबेर
   धनंजय
   वनौषधी

Similar books:
  दिवाळीअंक
   किशोर
   साहित्य सूची
   धर्मभास्कर
   उल्हास प्रभात
   चंद्रकांत
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.