|
लोकप्रभा
Author: --------------------------
Publisher: ------------------------
|
|
Price: $3.11 $2.48 20% OFF ( ~130 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: २००९ - डॉ. यशवंत रायकर यांचा जाणता मुघल हा विशेष लेख आहे. मोगल सम्राट अकबर याच्याविषयीच्या दंतकथा आजही आपल्या समाजात आहेत. काही जणांच्या मते तो रसिक, कलावंत वृत्तीचा, तर काहींच्या मते तो क्रूरकर्मा होता. रायकर यांनी या लेखात त्याच्या थोरवीची दुसरी बाजू सांगितली आहे. लेखात विविध चौकटीही देण्यात आल्या आहेत. अखेरीस अकबर नेमका कसा होता, ते वाचकांनीच ठरवावे, असे लेखकांने सांगितले आहे. क्लिओ ओडझर ही तरुणी १९७५ मध्ये हिप्पी बनून गोव्यात पाच वर्षे राहिली होती. त्या काळातील अनुभवांवर तिने पुस्तक लिहिले. त्याची कहाणी इब्राहिम अफगाण यांनी एका हिप्पीची डायरीमध्ये सांगितली आहे. सुलभा पिशवीकर यांचा संगीतातील घराणी या लेखासह मल्लिकार्जुन मन्सूर (अच्युत गोडबोले), चालचोरांची घराणी (शिरीष कणेकर), कोठावळे, पुस्तकं आणि लॉटरी (अशोक कोठावळे), मामुटी नावाची इंडस्ट्री (प्रभा कुकडे) यांचेही महत्त्वपूर्ण लेख आहेत. लोकप्रभाचे संपादक प्रवीण टोकेकर, वरिष्ठ सहाय्यक संपादक पराग पाटील यांचे अनुक्रमे फिर छिडी रात, बात फूलों की व नखलू नको पुन्हा पुन्हा यासह राजू परुळेकर, धनंजय कुलकर्णी आणि इतरही लेख आहेत. संपादक : प्रवीण टोकेकर २०१३ - लोकप्रभाच्या दिवाळी अंकाची सुरुवातच जेनेटिक्स या विषयाने झाली आहे. जीवशास्त्र, अभियांत्रिकी, संगणक या सगळ्या शास्त्रांच्या नवनव्या शोधातून, समन्वयातून जेनेटिक्सचा या पुढच्या काळातला महत्त्वाचा टप्पा प्रयोगशाळेत गरजेनुसार हवे ते अवयव तयार करणं हा असणार आहे. मानवी जीवन समूळ बदलून टाकणारा हा टप्पा नेमका काय आहे, या टप्प्यापर्यंत शास्त्रज्ञ कसे येऊन पोहोचले, या पुढच्या काळात काय काय घडू शकतं, याचा सखोल वेध डॉ. उज्ज्वला दळवी यांनी घेतला आहे. याच विषयावर शिरीष गोपाळ देशपांडे यांची विज्ञानकथा आणि सुधीर सुखटणकर तसंच आवडाबाई यांच्या विनोदी ढंगाच्या दोन छोटेखानी कथा आहेत. साधारण दहा वर्षांपूर्वी टीव्हीच्या छोटा पडद्यावर रिअॅलिटी शो सुरू झाले. या रिअॅलिटी शोजमध्ये पहिलेवहिले विजेते ठरलेले हर्षवर्धन नवाथे, अभिजीत सावंत, कार्तिकी गायकवाड, सुनील पाल, फुलवा खामकर आज काय करतात याचा 'ते काय करतात?' या विभागात धांडोळा घेतला आहे प्रशांत मोरे, सोनाली नवांगुळ, रेश्मा राइकवार आणि इरावती बारसोडे यांनी. पैठणी, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चप्पल, सावंतवाडीची खेळणी या महाराष्ट्राच्या खास चिजा. आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात त्यांची ब्रॅंड व्हॅल्यू काय आहे, याचा 'ब्रॅंड महाराष्ट्र' या विभागात दयानंद लिपारे, एजाजहुसेन मुजावर आणि अभिमन्यू लोंढे यांनी वेध घेतला आहे. ग्रॉस हॅपिनेस मोजणार्या, उर्जेची सर्वाधिक निर्यात करणार्या, आनंदी लोकांच्या देशाची म्हणजेच भूतानची सफर ही 'अद्भुतान' कशी आहे, याची विनायक परब यांनी घडवलेली सफर एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. स्वच्छ रस्ते, रहदारीचे नियम पाळणारे लोक, सायकलवरून फिरणारा हसरा, आनंदी राजा आणि त्याची राणी, सरकारी कार्यालयांच्या अत्यंत देखण्या इमारती हे सगळं वर्णन वाचून तुम्हीही भूतानच्या प्रेमात पडाल. कार्यकारी संपादक - विनायक परब
|
 |
 |
|