Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


तिकडमबाजी
Author: शिरीष कणेकर
Publisher: दिलीप प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
महाराष्ट्र टाईम्स रविवार ७ मार्च २०१०
प्रसन्न हसवणूक!
-- सौमित्र पोटे
शिरीष कणेकर हे नाव आता मराठी वाचकाला नवं नाही. कोपरखळ्या मारत, कानपिचक्या देत प्रसंगी तिरकसपणे सल्ले देत त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये केलेलं विपुल लिखाण आणि त्याची झालेली पुस्तकं याची साक्ष आहे. अर्थात, त्यांच्या स्तंभलेखनाचं पुस्तक होणं ही बाबही आता नवी नाही. पण त्यात वर्षागणिक भरच पडलेली आहे.
जगभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचा 'सेन्स ऑफ ह्यूमर' अनुभवायचा असेल, तर तिकडमबाजी एकदा वाचायलाच हवं. व. पु. काळे, सतीश दुभाषी, लता मंगेशकर, सचिन पिळगांवकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, नूरजहॉं, जितेंद यांच्यापासून पिकासो, आल्फ्रेड हिचकॉक, डॉन ब्रॅडमन, रोनाल्ड रीगन, विन्स्टन चचिर्ल अशा अनेक महारथींच्या किश्श्यांनी हे पुस्तक नटलंय. यात खुद्द कणेकरी किस्सेही आहेतच. म्हटले तर हसण्यावारी नेता येणारे, पण थोडा विचार केला तर खूप गभिर्त अर्थही यात दडलेला दिसतो. ऑस्कर वाइल्डचं नाटक बसवताना, दिग्दर्शकाने त्याला काही बदल सुचवले. तर वाइल्ड थक्क झाला. म्हणाला, 'या मास्टरपीसमध्ये बदल करणारा मी पामर कोण?' यात ऑस्करचा अॅटिट्यूड दिसतो. त्या बाप माणसाची कल्पना येते. हे किस्से जमवून वाचकांना त्यांनी चांगली भेट दिलीय. याच पुस्तकातल्या उत्तरार्धात त्यांचा 'कणेकरी' हा विक्रमी कार्यक्रम जशासतसा देण्यात आलाय. अर्थात, कणेकरी कार्यक्रमातली रंगत त्यात नाही. कारण, त्या कार्यक्रमात आशयाबरोबर खास कणेकरी स्टाइलच्या फ्रेझेस, पॉज, आवाजातल्या चढ उतारातली गंमत आहे. म्हणजे, वाचताना अगदीच पीजे वाटणारा विनोद कणेकरी स्टाइलने पोट धरून हसायला लावू शकतो. पण, हरकत नाही. ज्यांनी तो कार्यक्रम पाहिलाय, त्यांना कणेकरांचे शब्द जसेच्या तसे कानावर पडतील.

Review courtesy of Maharashtra Times:
महाराष्ट्र टाईम्स रविवार ७ मार्च २०१०
प्रसन्न हसवणूक!
-- सौमित्र पोटे

शिरीष कणेकर हे नाव आता मराठी वाचकाला नवं नाही. कोपरखळ्या मारत, कानपिचक्या देत प्रसंगी तिरकसपणे सल्ले देत त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये केलेलं विपुल लिखाण आणि त्याची झालेली पुस्तकं याची साक्ष आहे. गेल्या चार वर्षांत त्यांची तीन नवी पुस्तकं बाजारात आली. अर्थात, त्यांच्या स्तंभलेखनाचं पुस्तक होणं ही बाबही आता नवी नाही. पण त्यात वर्षागणिक भरच पडलेली आहे. मेतकूट, कणेकरायण आणि तिकडमबाजी यांचा कणेकरांच्या पुस्तकसाम्राज्यात समावेश झाला आहे.

यात सगळ्यात हिट आहे, तिकडमबाजी. जगभरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांचा 'सेन्स ऑफ ह्यूमर' अनुभवायचा असेल, तर तिकडमबाजी एकदा वाचायलाच हवं. व. पु. काळे, सतीश दुभाषी, लता मंगेशकर, सचिन पिळगांवकर, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, नूरजहअॅं, जितेंद यांच्यापासून पिकासो, आल्फ्रेड हिचकॉक, डॉन ब्रॅडमन, रोनाल्ड रीगन, विन्स्टन चचिर्ल अशा अनेक महारथींच्या किश्श्यांनी हे पुस्तक नटलंय. यात खुद्द कणेकरी किस्सेही आहेतच. म्हटले तर हसण्यावारी नेता येणारे, पण थोडा विचार केला तर खूप गभिर्त अर्थही यात दडलेला दिसतो. ऑस्कर वाइल्डचं नाटक बसवताना, दिग्दर्शकाने त्याला काही बदल सुचवले. तर वाइल्ड थक्क झाला. म्हणाला, 'या मास्टरपीसमध्ये बदल करणारा मी पामर कोण?' यात ऑस्करचा अॅटिट्यूड दिसतो. त्या बाप माणसाची कल्पना येते. हे किस्से जमवून वाचकांना त्यांनी चांगली भेट दिलीय. याच पुस्तकातल्या उत्तरार्धात त्यांचा 'कणेकरी' हा विक्रमी कार्यक्रम जशासतसा देण्यात आलाय. अर्थात, कणेकरी कार्यक्रमातली रंगत त्यात नाही. कारण, त्या कार्यक्रमात आशयाबरोबर खास कणेकरी स्टाइलच्या फ्रेझेस, पॉज, आवाजातल्या चढ उतारातली गंमत आहे. म्हणजे, वाचताना अगदीच पीजे वाटणारा विनोद कणेकरी स्टाइलने पोट धरून हसायला लावू शकतो. पण, हरकत नाही. ज्यांनी तो कार्यक्रम पाहिलाय, त्यांना कणेकरांचे शब्द जसेच्या तसे कानावर पडतील.

'कणेकरायण' हे यापूवीर छापलेल्या एकत्रित लेखांचं पुस्तक. यात आत्मपर, विनोदी, ललित, व्यक्तिचित्रं, प्रवास वर्णन, संकीर्ण, सिनेमाविषयक असे विस्तृत लिखाण आहे. कणेकरांची स्टाइल पचनी पडली की हे पुस्तक म्हणजे मेजवानी. वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून छापून येणारं लिखाण एकत्रित वाचण्यात मजा येते. त्यातला 'शापित यक्ष ऑस्कर वाइल्ड' हा लेख वाचनीय आहे. त्या माणसाचे विचार, त्याचं साहित्य सगळंच पराकोटीचं भिन्न. बंडखोरीचा अर्क असावा, तर ऑस्करसारखा. बरं, त्यात अतिशयोक्तीही नाही. लेखात ऑस्करची माहिती आणि लेखकाचं चिंतन या दोन्ही गोष्टी समांतर चालतात. ललित लेखातला 'भोग' मनाला नकळत भिडणारा. कुठेही अतिशयोक्ती न वापरता, केवळ बारीक निरीक्षणाच्या जोरावरचा हा लेख खूप काही सांगून जातो. लेखकाच्या दर पाच-सहा लेखानंतर 'असा' एक सरप्राइज आहे, फक्त ते एन्जॉय करता आलं पाहिजे. 'फिल्लमबाजी'मधला नासीरखानवरचा लेखही तसाच झालाय. बघता बघता विनोदाची झालर असलेल्या लेखाला कारुण्याची जोड मिळते. त्यातला 'देव भावाचा भुकेला'ही अफलातून आहे. सामान्य रसिकाचं पत्रकाराला फटकारणं इतकं मनोरंजक होणं ही लेखनातली मजा आहे. 'कणेकरायण' अतिशय माहितीपूर्ण आहे.

त्यांचं तिसरं पुस्तक 'मेतकूट'. हे स्तंभलेखन पुस्तकरुपात आलं आहे. याच्या प्रस्तावनेतच लेखकाने स्तंभलेखनाचं महत्त्व अधोरेखित केलंय, ते अफलातून. कवी, कथाकार, कादंबरीकार, स्तंभलेखक, नाटककार यांची विभागणीही झकास आहे. सुरुवातीलाच असलेला बोबीमावशी हा लेखकाने पहिल्या बॉलवर मारलेला बॉल हरवणारा षट्कार आहे. आपल्या मावशीचं वर्णन करताना, स्वाभाविकपणे लेखकाच्या आईचे संदर्भही येतात. पण, लेखाचा शेवट मनाला इतका चटका लावतो, की पुढचे सात-आठ लेख वाचताना पहिल्या लेखाचं प्रतिबिंब मनात तसंच असतं. अशा एखाद्या लेखामधून लेखक मनातलं बोचरं दु:खं हसत हसत बाहेर काढतो.

सारांश, कणेकरांची ही तीनही पुस्तकं संग्रही ठेवून कधीही वाचता येण्याजोगी झालीत. अर्थात, यात सरप्राइज एलिमेंट आहे तो 'कणेकरायण'मधला ऑस्कर वाइल्ड आणि 'तिकडमबाजी'चे किस्से. कणेकरांचा पिंड पत्रकाराचा. त्यामुळे त्या गोड हसर्‍या लेखणीमागे कमालीचा अभ्यास दडलाय; हे वेगळं सांगायला नको. फक्त तीनही पुस्तकं वाचताना वाटत की, लोकांसाठी, त्यांच्या आनंदासाठी लिहिणार्‍या कणेकरांनी आता फक्त स्वत:साठी लिहावं. स्वत:ला वाटेल तसं. त्यातून कदाचित बघता बघता हसर्‍या आयुष्याचं तत्त्वज्ञान निपजेल!

Write your review for this book

Other works of शिरीष कणेकर
   यादोंकी बारात
   फटकेबाजी
   मेतकूट
   मोतिया
   डॉलरच्या देशा

Similar books:
  विनोदी
   बटाट्याची चाळ
   अपूर्वाई
   चिमणरावांचे चर्‍हाट
   झेंडूची फुले
   पुरचुंडी
   More ...  
  लेख
   दाद
   गजाआडील दिवस
   गणगोत
   हसवणूक
   निवडक ना. सि. फडके
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.