|
इडली, ऑर्किड आणि मी
Author: विठ्ठल कामत
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~200 Pages, R180)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कHROष्ट हॉटेल" म्हणून मिळालेलं आणखी एक, अत्यंत मानाचं बक्षीस घेऊन मी "ऑर्किड" मधल्या माझ्या राखीव स्वीटमध्ये परत आलो. सर्वसाधारण खानपानगृहवाला, ते "ऑर्किड" सारख्या असाधारण पंचतारांकित हॉटेलचा मालक, हा माझा प्रवास पूर्ण झाला होता. एए स्वप्न नव्हतं. ही स्वपनपूर्ती होती.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, १८ एप्रिल २००४
हलकी व पौष्टिक 'इडली'
सत्कार, सम्राट, सुरुची... कामतांच्या या 'स'काराचा रसास्वाद न घेतलेला मुंबईकर विरळाच. अस्सल मुंबईकरांची रसना तृप्त करणार्या कामत कुटुंबातील एका शिलेदाराचं 'द ऑर्किड' हे इकोटेल प. द्रुतगती मार्गावरुन जाताना खुणावू लागलं ते त्याच्या मानांकित प्रतिमेमुळे. कामतांच्या खाल्ल्या मिठाला जागणार्या प्रत्येक मराठी मुंबईकराचा ऊर 'ऑर्किड'च्या यशाने भरुन येतो. आज मुंबईची 'स्कायलाइन' अनेक हॉटेलांनी व्यापलेली असताना वेगळ्या संकल्पनेवर आधारलेलं हॉटेल कामतांनी उभारलं कसं, साधा हॉटेलवाला ते पंचतारांकित इकोटेल हा प्रवास कसा झाला याबद्दल कुणालाही कुतूहल वाटावं. हे कुतूहल शमवणारं एक प्रांजळ आत्मकथन 'इडली, ऑर्किड आणि मी!'च्या रुपाने साकारलं आहे.
इडली हा पचायला हलका, करायला सोपा, तरीही पौष्टिक खाद्यप्रकार. तसंच हे आत्मकथनही. हलकंफुलकं, सोप्या भाषेतलं, संवादी आणि कसदार. यात कुठेही यशाची मिजास डोकावत नाही की, यशस्वी मालकाची प्रौढी नाही. हे आहे स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचं वर्णन. ३० वर्षांपूर्वी मनात डोकावलेलं स्वप्न कसं प्रयत्नपूर्वक, टप्प्याटप्प्याने साकारत गेलं, त्याचा हा पट. कामत घराण्यात जन्मलेले वडील व्यंकटेश कामत यांनी कोरुन दिलेली धंद्यातील मुळाक्षरे गिरवलेले कामत ग्रुपच्या हॉटेलमधले प्रत्येक विभागात लक्ष घालून व्यवहारज्ञानाचे पाठ गिरवलेले विठ्ठल कामत हे कामसू व कल्पक व्यक्तिमत्त्व. आजही ते स्वत:ला 'बिझनेसमन' नाही तर 'आंत्रप्रिनर' मानतात. त्यांच्या प्रयोगशील वृत्तीची अनेक उदाहरणे पुस्तकाच्या पानोपानी डोकावतात.
जगाचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने विठ्ठल कामत त्यांच्या तरुणाईत लंडनला गेले. तिसर्या दिवशी त्यांनी तिथं 'शान' रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळवली. तिथल्या उमेदवारीचे भन्नाट किस्से त्यांनी सांगितले आहेत. स्वत: हॉटेलच्या किचनमध्ये राबून त्यांनी नरम, लुसलुशीत इडल्या बनवल्या. बिर्टिशांचं प्रमुख खाणं अंडं आहे, हे जाणून त्यांनी अंडं, कांदा व मशरुम वापरुन आगळा डोसा बनवला. त्याच किचनमधला दोन हजार लाडू बनवण्याचा त्यांचा अनुभव तर भन्नाट आहे.
व्हेनिसला रिकाम्या खिशानं वावरताना त्यांना सुचलं की, तहानलेल्या प्रवाशांना थंड पाण्याची बाटली व कलिंगडाचा रस सर्व्ह केला तर... तिथल्या तिथं तात्पुरतं ऑफिस थाटून हा धंदा सुरु केला आणि स्वत:चा खिसा भरला; नृत्याचे कार्यक्रम करुन तो आणखी समृद्ध केला.
कामतांचं वापीचं हॉटेल चालत नव्हतं. त्याचं मार्केटिंग करण्यासाठी विठ्ठल कामतांनी राबवलेल्या कल्पनाही अनोख्या होत्या. हॉटेलबाहेर रिकाम्या गाड्या पार्क करुन ठेवून गर्दीचा आभास निर्माण करणं, नवीन गाडी तिथं येऊन थबकली की ती एका प्रशिक्षिताद्वारे जर्मन मशीनच्या साह्याने गाडी साफ करुन घेणं, गाडी साफ करेपर्यंत मालकाला रेस्टॉरंटमध्ये जाण्यास उद्युक्त करणं, रेस्टरुममध्ये गेलेली मालकीण १० मिनिटं तरी परतू नये अशी 'व्यवस्था' रेस्टरुममध्ये ठेवणं, गाडी मालक व प्रवाशांना रुचकर खाण्यानं प्रभावित करणं... अशा कलृप्त्या वापरुन बघता बघता त्यांनी ही 'कामतनी वाडी' लोकाप्रिय केली.
जपानमध्ये भारतीय रेस्टॉरंट सुरु करण्याचा त्यांचा अनुभवही वाचण्यासारखा आहे. अशा अनेक संपन्न अनुभवांमधून विठ्ठल कामत घडत गेले. घरातील सुसंस्कारामुळे नीतिमान बनलेलं हे व्यक्तिमत्त्व त्याला कल्पक बुद्धीची व प्रचंड मेहनतीची जोड, हाच त्यांच्या यशाचा जादुई मंत्र. याच मंत्रानं आज त्यांना 'जगातील उत्कृष्ट इकोटेलचा मालक' या सन्मानापर्यंत पोहोचवलंय. 'सत्कार'मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विठ्ठल कामतांनी जगात आदर- सत्कार मिळवला. 'एआरपोर्ट प्लाझा ते कामत प्लाझा ते द ऑर्किड' हा प्रवास तर अफलातून आहे. जिद्दीचा, मेहनतीचा, कल्पकतेचा आणि संयमाचा कस बघणारा हा प्रवास विठ्ठल कामतांनी यशस्वी केलाय आणि तो तितकयाच ताकदीनं कागदावर उतरवलाय.
मराठी उद्योजकाची ही यशोगाथा प्रत्येक मराठी माणसानं वाचाविशीच आहे. मराठी साहित्यात या पुस्तकानं निश्चितच चांगली भर टाकली आहे. अनुभवसंपन्नतेतून उतरलेलं हे लेखन अतिशय मनस्वीपणे साकारलं आहे. अर्थात याचं बरंचसं श्रेय लेखन सहाय्यक शोभा बेंद्रे यांनाही. तीन खळग्यांच्या सध्या सर्वत्र पावभाजी, वडासांबार, इडली सांबारसाठी वापरल्या जाणार्या चौकोनी 'कामत प्लेट'चे हे जनक. विठ्ठल कामतांना त्यांच्या पुस्तकाची प्लेटही छान जमलीय. रुचकर व पौष्टिक अशीही ही साहित्यिक थाळी वाचकांना नककीच पसंत पडेल.
पुस्तकाचा आकारही चौरस आहे. (चौरस आहाराचं प्रतीक म्हणून का?) मुखपृष्ठही देखणं आहे. सतीश भावसार यांची चित्रंही मस्त आहेत. पदार्थ पाहून खावासा वाटेल, असा सजवला पाहिजे, हा धंद्यातील मंत्र पुस्तकाच्या निर्मितीतही वापरला गेलाय. शुभदा चौकर
Reader Comments: Abhijeet writes on Mon Aug 22 05:49:21 2005: A must read book for everyone who can read & understand MARATHI. A great person & a great effort !!!Anushka writes on Wed May 5 11:22:41 2004: this is really nice book,i just love it,ani muhkya mhanje pratek marati mansane he pustak vachave
|
 |
 |
|