Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


लमाण
Author: श्रीराम लागू
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $18.12 $14.49 20% OFF ( ~360 Pages, R595)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, विचार स्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या सार्वजनिक महत्वाच्या कामांत आघाडिवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्व देणारे डॉक्टर श्रीराम लागू आपल्या "नाटकी" जिवनाला खणखणीत शब्दरूप देत आहेत.
==========
एका नाट्यधर्मीची जडणघडण
'लमाण' म्हणजे मालवाहू कामगार. वि. वा. शिरवाडकरांच्या ज्या 'नटसम्राट' या नाटकातील नटवर्य अप्पासाहेब बेलवलकरांची मध्यवर्ती भूमिका श्रीराम लागूंनी प्रथम साकार केली त्याच भूमिकेतील वाक्य आहे : ''आम्ही फक्त लमाण, इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे.'' रंगमंचावरील आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत लागूंनी हे तथाकथित लमाणाचे काम विलक्षण निष्ठेने, जिद्दीने व सचोटीने केले आहे. ते नुसतेच श्रेष्ठ नट व दिग्दर्शक नाहीत तर पूर्वीपासून लेखकही आहेत. खरे म्हणजे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात एक अनन्यसाधारण स्थान आहे आणि अथपासून इतिपर्यंत अत्यंत ओघवत्या व वाचनीय शैलीत लिहिलेली 'लमाण' ही आत्मकथा हे सिद्ध करते.
लागू यांनी पुस्तकाची सुरुवात आपल्या अगदी लहानपणाच्या आठवणींपासून केली आहे. त्यांचे डॉक्टर वडील कॉंग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात जाऊन आले होते. श्रीराम स्वत: बी. जे. मेडिकल कॉलेजात गेले; तेव्हापासून त्यांच्यातला नट प्रथम जागा झाला. भालबा केळकर हे दिग्दर्शक आणि वसंत कानेटकर हे नाटककार तरुणपणीच त्यांच्या संपर्कात आले. कॉलेजच्या वयात केलेल्या इतर कोणत्याही नाटकांपेक्षा कानेटकरांच्या 'वेड्याचं घर उन्हात' या नाटकाने लागूंच्या देदीप्यमान कारकिर्दीचा पाया घातला. हे नाटक नव्याने स्थापन झालेल्या प्रोग्रेसिव्ह डTRअॅमॅटिक असोसिएशनचे होते. त्याचे दिग्दर्शन व त्यातील एक प्रमुख भूमिका भालबांचीच होती.
या पुस्तकात फार महत्त्वाचे स्थान असलेला पहिला नाट्यकर्मी म्हणजे भालबा केळकर. लागू आणि ते जरी बराच काळ सहकारी होते तरी कलावंत म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची विचारधारा या दोहोंत प्रचंड अंतर होते. त्याचा स्फोटक परिणाम अपरिहार्यपणे होऊन कालांतराने या दोघांत फार मोठा असा अंतराय निर्माण झाला.
'प्रोग्रेसिव्ह' (पी.डी.ए.) नंतरचा लागूंच्या नाट्यप्रवासातला सर्वात निर्णायक टप्पा म्हणजे मुंबईची 'रंगायन' ही संस्था, विजया मेहतांसारखी अत्यंत बुद्धिमान, कल्पक आणि कष्टाळू अशी अभिनेत्री व दिग्दर्शिका 'रंगायन' चे नेतृत्व करीत होती. नाटककार विजय तेंडुलकर आणि अभिनेते अरविंद-सुलभा देशपांडे व माधव वाटवे यांच्या कतरृत्वाने एक भारावलेले वातावरण निर्माण केले होते. काव्य, संगीत, चित्रकला आदी परस्परपोषक अंगांनी ते डवरलेले होते. विजयाबाई आणि लागू यांनी 'इंटिमेट थिएटर'साठी साकारलेली 'मादी' ही तेंडुलकरांची एकांकिका या सगळ्या क्रांतिकारक कालखंडाचे एक महत्त्वाचे प्रतीक होती. पुढे कित्येक वर्षांनी लागूंनी स्वत:ची 'रुपवेध' ही संस्था काढली. तिच्यात 'रंगायन'चाच ध्येयवाद कामी आलेला स्पष्ट दिसत होता.
'लमाण'मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे लागूंचा तीन खंडांचा परदेशप्रवास, दुसरी म्हणजे त्यांनी केलेली प्रायोगिक व व्यावसायिक नाटके आणि तिसरी म्हणजे राजकारण आणि समाजकारण यात त्यांनी वठविलेली भूमिका. हे तीनही भाग त्यांनी तपशिलात रंगविलेले आहेत आणि त्यामुळेच 'लमाण'चे मूल्य सिद्ध झालेले आहे.
मुख्यत: आपल्या डॉक्टरी व्यवसायामुळेच लागूंचे वास्तव्य कॅनडा, टांझानिया व लंडन येथे झाले. कॅनडा व टांझानियामधले त्यांचे अनुभव अत्यंत मजेदार आहेत. उदा. किलिमांजारो या पर्वताची चढाई. परंतु डॉक्टरांना लागलेला नाटकांचा ध्यास सतत त्यांच्यापाशी राहिला. स्ट्रॅटफर्ड- ऑन्टारियो आणि न्यूयॉर्क- लंडन येथे त्यांनी नुसतीच नाटके पाहिली नाहीत; तर टांझानियातल्या एका छोटया गावात शेक्सपियर व ब्रेश्ट यांचे एकेक नाटक आणि त्यांनीच पूर्वी केलेल्या 'खून पाहावा करुन' या नाटकाच्या गुजराती रुपांतराचाही प्रयोग केला!
कॅनडा, अमेरिका आणि इंग्लंड येथे लागूंनी मोठमोठ्या अभिनेत्यांची नाटके पाहिली. न्यूयॉर्कला टेनेसी विल्यम्सच्या 'स्वीट बर्ड ऑफ यूथ'मध्ये जेराल्डीन पेज, लंडनमध्ये जॉन गीलगुडचा 'ओथेल्लो', युनेस्कोच्या 'र्‍हायनोसेरॉस'मध्ये लॉरेन्स ऑलिव्हिए आणि टेरेन्स रॅटिगनच्या 'रॉस'मध्ये अलेक गिनेस- या सर्वांचे सूक्ष्म समीक्षण 'लमाण'मध्ये आढळते. परंतु याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो पाश्चात्त्य रंगभूमी आणि मराठी रंगभूमी या दोहोंच्या व्यावसायिक शिस्तीमध्ये लागूंना जाणवलेला विरोध. पुढे पाश्चात्त्य रंगभूमीवर झालेल्या 'म्युझिकल्स'च्या झगमगटाचीही लागूंना प्रचीती आली आणि ती त्यांना बेगडी वाटणे हे रास्तच होते. गीलगुड-ऑलिव्हिए यांच्यानंतर पाश्चात्त्य रंगमंचावर एक-दोन पिढ्या आलेल्या आहेत, नाटककार व दिग्दर्शकांच्याही. तरीही 'लमाण'मध्ये नावाजलेले कलावंत इतिहासजमा झाले आहेत, असे म्हणता येणार नाही.
मुंबई-पुण्याला स्थायिक झाल्यावर गेली कित्येक वर्षे श्रीराम लागू नाटकात काम करीत आहेत. मधला एक मोठा काळ असा होता की, नाटक आणि चित्रपट अशा दोन्ही क्षेत्रांत ते व्यस्त होते. 'लमाण'मध्ये 'सामना' किंवा 'झाकोळ'सारख्या एखाददुसर्‍या चित्रपटाचा अपवाद वगळता त्यांच्या चित्रपटीय कारकीर्दीबद्दल फारसे काही नाही. ही फारशी आश्चर्याची गोष्ट नाही, कारण त्यांचे रंगभूमीवरील कतरृत्व आणि बहुतेक चित्रपटांतील त्यांची कामगिरी यांची तुलनाच होऊ शकत नाही!
'लमाण'मध्ये लागूंनी जवळजवळ सर्व नाटकांच्या अत्यंत मौलिक आणि उद्बोधक अशा हकीकती सांगितल्या आहेत. त्यातील काही थोड्यांचाच उल्लेख येथे करणे सोयीचे आहे. यात विजय तेंडुलकरांबरोबरच मोहन राकेश, गिरीश कर्नाड, सूगो बेट्टी यांच्यासारख्या दिग्गजांच्या अनुवादित नाटकांचा समावेश तर आहेच, पण अनेक नव्या दमाच्या नाटककारांचाही. यात वि. वा. शिरवाडकरांच्या 'नटसम्राट'ने डॉक्टरांचे नाव अजरामर केले तर गो. पु. देशपांड्यांच्या 'उद्धवस्त धर्मशाळा'ने त्यांच्या रंगमंचावरील कार्याला संपूर्ण नवे वळण दिले.
वसंत कानेटकर आणि वि. वा. शिरवाडकर हे दोघेही नाशिककर नाटककार लागूंना जवळचे. त्या दोघांच्याही नाटकांतल्या आव्हानदायी चरित्रभूमिका त्यांनी समर्थपणे हाताळल्या. गो. नी. दांडेकर आणि श्री. ना. पेंडसे यांच्यापासून तो प्र. ल. मयेकर, प्रेमानंद गज्वी आणि श्याम मनोहर यांच्यासारख्या आजकालच्या नाटककारांच्या 'प्रायोगिक' कृतीही त्यांनी उत्साहाने हाताळल्या. मोहन तोंडवळकर, सुधीर भट आणि मोहन वाघ यांच्यापासून तो गोवा हिंदू असोसिएशन आणि इंडियन नॅशनल थिएटरसारख्या संस्थांतही ते निष्ठेने वावरले. या सगळ्यांमध्ये उठून दिसतो तो थिएटर युनिटचा सत्यदेव दुबे. त्याच्या प्रागतिक संस्थेसाठी डॉक्टरांनी तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे खळबळजनक नाटक दिग्दर्शित केले आणि त्यात स्वत: एक मध्यवर्ती भूमिकाही केली.
महाराष्ट्र शासनाची रंगमंचीय सेन्सॉरशिपची यंत्रणा आणि 'गिधाडे' यांच्यामधील झगड्याची 'लमाण'मधली हकीकत अपेक्षेप्रमाणे रोमहर्षक आहे. (यात 'गिधाडे'चे इंग्रजी भाषांतर पुढे अलेक पदमसींनी रंगमंचावर आणले तेव्हा सेन्सॉरने त्याच्याकडे ढुंकूनही बघितले नाही!) 'गिधाडे'बद्दल लागूंनी एखाद्या अव्वल दर्जाच्या समीक्षकासारखे लिहिलेले आहे.
आपला संबंध आलेल्या बहुतेक सर्व नाटकांबद्दल लागू जाणकारीने लिहितात. यात 'उद्धवस्त धर्मशाळा'प्रमाणेच त्यांनी स्वत: अनुवादित करुन प्रायोगिलेल्या ज्या आनुईच्या 'ऑन्टिगनी'चाही उल्लेख करायला पाहिजे. 'सामना' हा रामदास फुटाणे निर्मित व जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट ज्या दिवशी बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवासाठी गेला, त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी पुकारली. आणीबाणीवर लागूंनी केलेली टीकाटिप्पणी त्यांची राजकारणाची समज किती प्रगाढ आहे, हे स्पष्ट करते. 'उद्धवस्त धर्मशाळा'ने हे सिद्ध केलेच होते. पुढे 'ऑन्टिगनी', गो. पुं.चे 'चाणक्य' यांच्या निवडीतही हेच स्पष्ट केले.
याच समजाप्रमाणे डॉक्टरांची सामाजिक बांधिलकी किती पक्की आहे, हे 'सामाजिक कृतज्ञता निधी'साठी त्यांनी आचार्य अत्र्यांचे 'लग्नाची बेडी' हे नाटक घेऊन महाराष्ट्रभर जो अपूर्व असा दौरा केला, त्यावरुन दिसून येते.
'लमाण'मध्ये काही चुका आहेत.
स्ट्रॅटफर्ड-ऑन्टारियोचा प्रणेता टायरॉन जथ्री हा ब्रिटिश होता. 'अ डबल लाइफ'मध्ये ऑथेल्लो करणार्‍या नटाची भूमिका करणारा रोनाल्ड कॉलमन हा आपल्या बायकोचा गळा दाबून खून करीत नाही, तर दुसर्‍या एका, सामान्य स्त्रीचा करतो. 'सुंदर मी होणार'च्या मुळातला बॅरेट (चार्लस लॉटन) हा लॉर्ड नसतो!
काहीही असले, तरी 'लमाण' हे त्याच्या लेखकाइतकेच श्रेष्ठ आणि अद्वितीय आहे!
-- ज्ञानेश्वर नाडकर्णी, लोकसत्ता ८ फेब्रुवारी २००४

Loksatta Review
Reader Comments:

Ravi Apte writes on Fri Aug 6 15:05:28 2004:
From publisher's Website .... A person chooses to be an actor because he enjoys the excitement of switching roles at the drop of a hat or the adventure of leading many lives in one life time and of course the creative satisfaction of expressing oneself in front of an audience. Acting is a complex process where the actor continually learns a new character and unlearns the previous one and carries the experience further by adding it to his own repertoire as an actor. This process gains a new dimension, when the inherent restlessness of an actor is coupled with a serious study of life and a continual urge to better oneself. An actor, who has been effectively and effortlessly doing this for years is Dr. Shreeram Lagoo. This new year, the first of our Marathi releases is Shreeram Lagoo\x92s autobiography Laman (The Peddler). The humble title depicts the modest way of life of the writer who thinks of himself as a mere peddler, who delivers playwrights lines to the audiences. The book is humbly titled, but this in no way reflects the artistic and intellectual prowess of the writer. Facets like this and many more come to life in Laman which is the travelogue of a journey of an intelligent and prolitically evolved actor and a compassionate human being. The book designed by artist Subhash Awchat and Shekhar Godbole adds to the impact of the writing. Another book, rich in content and production values from Popular Prakashan. ABOUT THE AUTHOR ....... Born in a Gandhian family, Dr. Lagoo inherited the professional and ideological legacy of his father. But his passion for theatre grew in leaps and bounds during his days at the medical college in Pune. He and his friends pioneered the formation of a Progressive Dramatic Association with path breaking plays like `Wedya Cha Ghar Unhat'. His quest for better theatre took him to `Rangayan\x92 and Vijaya Mehta where he did new age plays like `Mee Jinklo Mee Harlo\x92, `Ek Hoti Rani\x92, `Yashoda\x92. He consciously gave up a flourishing practice as a doctor to turn a professional actor. After a shaky start on the professional circuit, he got the landmark role of an aging actor in V. V. Shirwadkar\x92s `Natasamrat\x92 which was inspired by King Lear. After this he did a stint of memorable roles in `Kachecha Chandra\x92, `Papa Sanga Konache\x92, `Gidhade\x92, and `Himalaya Chi Sawli\x92. He believed in being an actor to the core, and he continuously groomed himself physically, mentally, culturally and intellectually. All this hard work and toil to do better every time, gave him the rare distinction of being an acclaimed actor on the amateur theatre as well as the box office driven professional theatre. His belief in socially relevant and aware theatre has got him associated with `Andhashraddha Nirmulan Samiti\x92 with which he dreams of a better social habitat.

Write your review for this book

Other works of श्रीराम लागू
   वाचिक अभिनय
   रूपवेध

Similar books:
  आत्मचरित्र
   नाच ग घुमा
   माझी जन्मठेप
   गांधीहत्या आणि मी
   पोरवय
   एक गुलाम: ओलायुदाह इक्विनो याचे आत्मचरित्र
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.