Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


यज्ञकुंड
Author: बाळ राणे
Publisher: मुद्रा प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $5.78 $4.62 20% OFF ( ~241 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Review courtesy of Loksatta:
लोकसत्ता रविवार, १५ जून २००३

कौटुंबिक तरीही सामाजिक

स्वातंत्र्यपूर्व काळातली रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात सुरु होणारी ही वासनेची, शोषणाची, क्षोभाची, देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या चळवळीची आणि त्याच काळात घडलेल्या हिंदू-मुसलमान अत्याचाराची कहाणी आहे. त्याच वेळी ही एका दुर्दैवी कुटुंबाची करुण कहाणी आहे. कुटुंब हेच भारतीय समाजाचा मूलघटक मानला गेला आहे. त्यांचा परस्परपरिणाम उघडच आहे. या दोहोंची चांगली सांगड लेखकाने घातली आहे.

इथे तीन भाऊ आहेत, एक बहीण आहे, तीन भावांच्या बायका आहेत. पण सर्वजण कुचंबणेच्या कुंपणात बंदिस्त जीवन जगत आहेत.थोरले काका- बळीराम- ही गावातील वतनदार, वजनदार व्यक्ती. वंशपरंपरेनं गावाचं सरपंचपद त्यांच्याकडेच. अशा व्यक्तींच्या सर्व प्रकारे वागण्या-बोलण्याला एक उद्धट कतरृत्वाचा उग्र दर्प असतो. थोरले काकाही याला अपवाद नाहीत. गावात त्यांचा अधिकार चालतो, पण घरातील पत्नीशिवाय इतर स्त्रियांवरही ते स्वामित्वाचा अधिकार गाजवतात. गावातील एक खुळी-मुकी मुलगीदेखील त्यांच्या वासनेची शिकार होते. एखादे 'अंगवस्त्र' बाळगणे,हा तर या वतनदारांचा जणू जन्मसिद्ध हककच असे.

ही धग सहन न होऊन पुरुषोत्तमकाका घरदार सोडून, पत्नीचा त्याग करुन परांगदा होतात. पण आपण पळपुटेपणा केला आहे आणि अश्राप पत्नीला विनाकारण यातना देत आहोत, या जाणिवेत ते स्वत: सतत होरपळत असतात. जणू काही या दोषाचं प्रायश्चित्त म्हणून ते स्वत:ला स्वातंत्र्याच्या चळवळीत झोकून देतात आणि निरंजन या वेगळ्या नावाने आपली प्रतिमा निर्माण करतात.

लेखकानेच म्हटल्याप्रमाणे एका दीर्घकथेचं हे कादंबरीत रुपांतर केलं आहे. कोकणातल्या एका कुटुंबाचं आणि गावाचं चित्रण हा पूर्वरंग आहे तर स्वातंत्र्य चळवळ, भारताची फाळणी, त्या काळात झालेले हिंदू-मुसलमानांचे दंगे हा उत्तरभाग आहे. पूर्वकहाणीत (कदाचित) एखाद्या सत्य परिस्थितीचं बीज असेल तर उत्तर भागात ऐतिहासिक काळातील काल्पनिक घटना आहेत. निरंजन ही व्यक्ती दोन भागांना जोडणारा दुवा आहे. निरंजनमधील अपराधीपणाची जाणीव जागृत ठेवत त्याच्या कार्याला उदात्त परिमाण देण्याची किमया लेखकाने साधली आहे.

या कादंबरीला दोन नायक आहेत. एक म्हणजे थोरले काका. जळजळीत वासनेचा जिवंत पुतळा. वासनापूर्तीसाठी कशाचीही तमा न बाळगणारा. नीतिनियम स्वत:च ठरविणारा. हा सर्व कुटुंबावर हुकुमत गाजवतो. गावाचा सरपंचदेखील आहे. असा हा कर्ता पुरुष. पण त्याचं चित्रण करताना त्याच्या नर-पुरुषाच्या मादी-स्त्रीविषयक कतरृत्वाचं केलेलं वर्णन थोडंसं एकांगी वाटतं. जणू स्त्री-उपभोग हेच जीवनकार्य असल्याप्रमाणे हे व्यक्तिचित्रण वाटतं. दुसरा नायक म्हणजे निरंजन. देशभक्तीच्या मार्गावर श्रद्धेने चालणारी ही व्यक्ती. देशाच्या फाळणीच्या वेळी धुमसणारा असंतोष, नंतर घडणारे अमानुष अत्याचार आणि जातीय दंगली यांनी व्यथित होणारा निरंजन लेखकाने समर्थपणे उभा केला. त्या काळात निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या भूमिका आणि कार्यपद्धती यांनी गोंधळलेला निरंजन रंगवताना लेखकाची राजकीय जाणदेखील उत्तमपणे व्यक्त होते. एका दुबळ्या व्यक्तीचं कसं अंतर्बाह्य रुपांतर होऊ शकतं, याचं सशक्त उदाहरण लेखकाने दाखविलं आहे.

या कादंबरीत दोन उपकथानके आहेत. शांतात्या आणि माळीमास्तर यांचं तरल प्रेमप्रकरण हे पहिले. असफल प्रेमाची ही कहाणी अत्यंत संयत स्वरुपात मांडली आहे. पन्नास-साठ वर्षांपूर्वीच्या सामाजिक स्थितीचा विचार करता हे चित्रण वास्तविक वाटावं, असंच आहे.

गंगाधर-रुपा हे दुसरं प्रेमप्रकरण. रुपा ही गंगाधरच्या वडिलांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेली मुलगी. म्हणजे पर्यायाने गंगाधरची सावत्र बहीणच. पण अज्ञानापोटी त्या दोघांत प्रेमांकुर फुलतात आणि दोघेही पती-पत्नीच्या बंधनात अडकतात. फाळणीच्या वेळी झालेल्या हिंदू-मुसलमान दंगलीत गंगाधर व रुपाची ताटातूट होते. रुपावर मुसलमान अनन्वित अत्याचार करतात. तिची त्या भयानक परिस्थितीतून सुटका होते आणि पुन्हा गंगाधरशी मीलन होतं. कर्मधर्मसंयोगाने त्यांची निरंजनशी म्हणजे त्यांच्या काकाशीच गाठ पडते. हा भाग लेखकाने फारच नाट्यमय, थोडासा फिल्मीच, घडवला आहे. पण निश्चितच एकंदरीत कथानकाची उत्सुकता वाढविणारा आहे.

'यज्ञकुंड' ही कादंबरी म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक दु:खाचा आलेख आहे. लेखकाची संवेदनशीलता प्रवाही भाषेतून वाचकांना आपल्याबरोबर घेऊन जाते. वाचायला सुरुवात केल्यावर संपवूनच खाली ठेवावीशी वाटणारी ही कादंबरी आहे.

मधुसूदन आदवानीकर

Write your review for this book

Other works of बाळ राणे
   महासागर
   आकाशगंगा
   आयुष्य नावाचं महाकाव्य
   दक्षिण आफ्रिका : गाथा स्वातंत्र्याची
   प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ

Similar books:
  कादंबरी
   श्रीमान योगी
   मृत्युंजय
   शोध महात्मा गांधींचा - भाग १ आणि २
   स्वामी
   तुंबाडचे खोत - खंड पहिला
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.