|
तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड
Author: अतुल कहाते
Publisher: मनोविकास प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~170 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रहार ११ मे २०१४ मेंदू गंजवणा-या संकटाच्या तीव्रतेचा इशारा -- विशाखा शिर्के गेली पाच ते सात वर्ष एक बदल जाणवतोय. लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर आजूबाजूला (अगदीच भांडणं होत नसतील तर..) बरीचशी शांतता असते, ती असणारच कारण दहापैकी आठ जणांनी डोकं मोबाइल किंवा टॅबमध्ये घातलेलं असतं. इंटरनेटच्या अतिवापरामुळे येणारा अस्वस्थ सैरभैरपणा, विचारशक्ती कमी व उथळ होणं, बुद्धांक कमी होणं, मेंदूचा कमी होत चाललेला वापर, पुस्तकांवर इंटरनेट व टॅबयुगाचा झालेला परिणाम, इलेक्ट्रॉनिक कचरा, मल्टिटास्किंगची समस्या, एकूणच इंटरनेट व आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा मानसिक व शारीरिक परिणाम इत्यादी विषयांची संदर्भ व उदाहरणं देऊन चर्चा या पुस्तकात केली आहे. गेली पाच ते सात वर्ष एक बदल जाणवतोय. लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर आजूबाजूला (अगदीच भांडणं होत नसतील तर..) बरीचशी शांतता असते, ती असणारच कारण दहापैकी आठ जणांनी डोकं मोबाइल किंवा टॅबमध्ये घातलेलं असतं. रस्त्यावरून जाताना मोबाइलवरून गाणी ऐकणा-या मुलाला हॉर्न ऐकू न आल्यामुळे झालेला अपघात काय किंवा घरात आई-वडील आल्यानंतरही त्यांच्याशी न बोलता इंटरनेटवर गेम खेळत बसणारी आजची पिढी. हे सर्वच आजच्या अस्वस्थ जगाचे नागरिक आहेत आणि त्यांची अस्वस्थता त्यांना जाणवतही नाही इतक्या खोलवर आधुनिक तंत्रज्ञानानं त्याच्यावर प्रभाव केलेला आहे. इंटरनेट, मोबाइल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अतिवापरामुळं होणा-या वाढत्या भयंकर परिणामांची बखरच अतुल कहाते यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड या पुस्तकात मांडली आहे. इंटरनेट, मोबाइल आणि आधुनिक गॅजेट्स यांच्या अंगवळणी पडलेल्या वापराच्या दुष्परिणामांचं अत्यंत समर्पक आणि सखोल विश्लेषण त्यांनी या पुस्तकात केलं आहे. कहाते स्वत: एमबीए असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ते गेली सतरा वर्ष कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांनी स्वत:ही हे सर्व दुष्परिणाम अनुभवले आहेतच. पुस्तकातील एक चांगली गोष्ट म्हणजे यात नुसतं वरवरचं लिखाण नाही, लेखकाची फक्त स्वत:ची मतं नाहीत तर अनेक संशोधकांचे, इतर लेखकांचे, तत्त्ववेत्त्यांचे, मानसशास्त्रज्ञांचे संदर्भ वारंवार दिलेले आहेत. त्यासाठी कहाते यांनी अनेक पुस्तकं वाचली आहेत, अनेक संशोधनांचा अभ्यास केला आहे. एकूण अकरा प्रकरणांमधून अनेक विषयांचा मागोवा लेखकानं घेतलेला आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळं येणारा अस्वस्थ सैरभैरपणा, विचारशक्ती कमी व उथळ होणं, बुद्धांक कमी होणं, मेंदूचा कमी होत चाललेला वापर, पुस्तकांवर इंटरनेट व टॅबयुगाचा झालेला परिणाम, इलेक्ट्रॉनिक कचरा, मल्टिटास्किंगची समस्या, एकूणच इंटरनेट व आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा मानसिक व शारीरिक परिणाम इत्यादी विषयांची त्यांनी या पुस्तकात संदर्भ व उदाहरणं देऊन चर्चा केली आहे. हे सर्व वाचताना अत्याधुनिक तंत्रज्ञानानं आपल्याला स्मार्ट न बनवता भोंगळ व अधूच जास्त बनवलं आहे याची जाणीव होत जाते. आभासी जगाच्या वाढत्या प्रभावामुळं माणसाला आता माणूस नकोसा झाला आहे, तर त्याला खोटा जगात रमणंच जास्त आवडतं आहे असा इशारा लेखक देतात. त्याचबरोबर इंटरनेट, मोबाइल व आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळं माणसाच्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा कसा र्हास होत चालला आहे, हेही त्यांनी समजावून सांगितलं आहे व हे सर्व अत्यंत वाचनीय आणि उद्बोधक आहे. कोणतंही पुस्तक हाती धरून वाचण्यासाठी जी एकाग्रता व समजशक्ती लागते तीच आज इंटरनेट-टॅबच्या प्रभावामुळे नाहीशी झाली आहे, असं कहाते अनेक उदाहरणांच्या आधारे सांगतात व ते खरंदेखील आहे, त्यामुळे आपल्यावर तंत्रज्ञानाचा किती वाईट प्रभाव झाला आहे हे समजून घ्यायचं असेल तर एक प्रयोग म्हणून हे पुस्तक एकाग्रतेनं वाचून पाहण्याचा प्रयोग वाचकांनी करून पाहावा. पुस्तक तसं छोटं आहे; परंतु वाचकांची समजशक्ती अजूनही शाबूत असेल तरच त्यातील आशय डोक्यापर्यंत पोहोचेल. अकरा प्रकरणांशिवाय लेखकाचं मनोगत व समारोप ही प्रकरणंदेखील यात आहेत, तीही वाचण्यासारखी आहेत. चांगलं काही वाचायला आवडणार्यांसाठी शेवटी दिलेली संदर्भ सूचीदेखील खूप उपयोगाची आहे. वरवर चाळून हे पुस्तक ठेवून देण्यासारखं नाही, अन्यथा तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम किती गंभीररीत्या खोलवर पोहोचले आहेत, याची जाणीव होणार नाही.
Other Links:
|
 |
 |
|