|
कोसला
Author: भालचंद्र नेमाडे
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $12.18 $9.74 20% OFF ( ~328 Pages, R400)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: कोसला ही कादंबरी पारंपारिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, यशस्वी तंत्र झुगारून अनपेक्षित, काहीशा विस्कळीत, तर्हेवाईक शैलीत लिहिलेली ही कादंबरी आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी आहे. खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या सार्यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो. भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते ... "आपण सगळं करू, हे म्हणतात वगैरे ते सगळं. थेट इतकी वर्षं अशी उदाहरणार्थ काढलीच की नाही? आणि आणखीही थेट वर्षं काढायची घमेंड वगैरे आहे. आपण कुणा दुसर्याची वगैरे वर्षं चोरणार नाही. किंवा कुणाच्या बापाचा पैसा वाया घालवणार नाही. वय गेलं असं हे अवांतर म्हणतात. ते मात्र उदाहरणार्थ बरोबर नाही. आणखी पुढे नाना वर्षं आहेतच. वर्षं नीट असतातच. आपण उदाहरणार्थ किती का उशिरा उठतना? त्या मानानं कसं का वागतना? आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच."
Reader Comments: nayana pitale writes on Tue Jan 14 08:10:25 2020: i want read only
Amol Kumbalwad writes on Tue Jun 30 17:15:22 2015: I WNT TO READ IT
|
 |
 |
|