Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


एका चरित्राचे चरित्र
Author: द. न. गोखले
Publisher: मौज प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $5.99 $4.79 20% OFF ( ~165 Pages, R175)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
'डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन' या चरित्राच्या निर्मितीचा चरित्रकाराने सांगितलेला वृत्तान्त

प्रस्तावना
श्री. गं. दे. खानोलकरांच्या 'साहित्य-सिंह' या श्रीपाद कृष्णांच्या चरित्राची समीक्षा महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या जानेवारी-फेब्रुवारी-मार्च १९७३ च्या अंकात मी केली होती; आणि ती वाचून मराठीतील आघाडीचे नाटककार नि माझे मित्र प्रा० वसंत कानेटकर यांनी पत्रद्वारे मला अशी सूचना केली होती, की मी 'चरित्र' या वाङ्मयप्रकाराची चर्चा करणारे एखादे साहित्य-शास्त्रीय पुस्तक लिहावे ! 'चरित्र' या वाङ्मय-प्रकाराबद्दल तोवर मी थोडाफार विचार केलेला होता. पण असे पुस्तक लिहावयाचे तर जुन्यानव्या मराठी चरित्रांचे व्यापक नि व्यासंगी वाचन हवे, इतर भाषांतील - निदान इंग्रजीतील -चरित्रवाङ्मयाची चांगली माहिती हवी, नि चरित्रविषयक औपपत्तिक विचारावरही भक्कम पकड हवी. पण मी वाचन, व्यासंग वगैरे बाबतींत फारच उणा होतो. आजही आहे. तेव्हा, कानेटकरांची सूचना म्हणजे चरित्राच्या समीक्षेत 'आगे बढो' म्हणून पाठीवर दिलेली उत्तेजनाची थाप, असे मी मानले, आणि मनातल्या मनात सुखावून गप्प बसलो. कानेटकरांनी गंमत म्हणून माझ्यासाठी हरभर्‍याचे झाड लावले असेल, असेही मला क्षणभर वाटून गेले. पण 'चरित्र' या वाङ्मयप्रकाराविषयी काही लिहावे या कल्पनेचे बीज, अस्पष्टपणे का होईना, तेव्हाच माझ्या मनात नकळत रुजले असावे. आज 'एका चरित्राचे चरित्र' हे पुस्तक वाचकांच्या हाती देत असताना, ते बीज बारा वर्षांपूर्वी रुजत घालणार्‍या श्री. कानेटकरांचे स्मरण झाल्याशिवाय राहत नाही.
डॉ० पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन' हे चरित्र लिहिण्याचा संकल्प सोडून चरित्रविषयक साधनसामग्री गोळा करण्याचे काम मी जेव्हा सुरू केले तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की चरित्र या वाङ्मय-प्रकाराविषयी सर्वसामान्य विवेचन करणारे पुस्तक लिहिणे आपणाला कठीण असले तरी चरित्र कसकसे जन्माला येते' याविषयी स्वत:चा अनुभव सांगणारे आत्मनिवेदनात्मक लेखन आपण सहजतेने करू शकू. तोवर मी क्रांतिवीर बाबाराव सावरकर' (१९४७) आणि डॉ० केतकर' (१९५९) ही चरित्रे लिहिली होती आणि चरित्रलेखनाचा थोडासा अनुभव माझ्या गाठीशी जमा झालेला होता. त्यामुळे चारित्रविषयक काही दृष्टी बरोबर घेऊन मी नव्या चरित्राला हात घालीत होतो. एखाद्या वाङ्मयकृतीच्या निर्मितीचा इतिहास सांगावयाचा म्हणजे मुख्यत: लेखकाच्या डोक्यात झालेल्या वैचारिक, भावनिक अशा अमूर्त गोष्टींची हकीगत शब्दांकित करावयाची. त्यासाठी स्मृती समर्थ पाहिजे. विशेषत: मानसिक उलथापालथी अचूकपणे टिपून घेण्याची नि त्या जशाच्या तशा धारण करण्याची क्षमता त्या स्मृतीत असली पाहिजे. मी एकंदरीत स्मरणाचा दुर्बळ आहे आणि माझा तरी अनुभव असा आहे, की मनातील विचार-विकारांचे अंतिम रूप किंवा निष्कर्ष लक्षात राहिले तरी: विचार-विकारांतील चढउतार, आंदोलने, वळणे, वाकणे, द्वंद्वे, अनुकूल-प्रतिकूल युक्तिवाद वगैरे तपशील जाम लक्षात राहात नाही. त्यामुळे, पूर्वीच्या दोन चरित्रांच्या लेखनाचा वृत्तांत स्थूलपणे मला लिहिता आला असता तरी तपशील गळून गेल्यामुळे तो वृत्तांत तितकासा उपयुक्त झाला नसता. पण डॉ० पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन' हे चरित्र मी नव्यानेच हाती घेत असल्यामुळे विचार-विकारांचे तपशील त्या त्या वेळी टिपून ठेवणे मला शक्य होते आणि चरित्रविषयक माझ्या दृष्टीचे उपायोजन त्या चरित्रात पावलोपावली मी कसकसे केले ते सांगण्याची सोय होती. तेव्हा, 'डॉ. पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन' या चरित्राचेच चरित्र सांगावयाचे, असा बेत मी पक्का केला.

Write your review for this book

Other works of द. न. गोखले
   डॉ. आंबेडकरांचे अंतरंग
   गांधीजी: मानव नि महामानव
   डॉ. केतकर
   चरित्र-चिंतन
   स्वातंत्र्यवीर सावरकर: एक रहस्य

Similar books:
  समीक्षा
   सर्व सुर्वे
   दुनिया तुला विसरेल!
   धार आणि काठ
   साहित्यगंगेच्या काठी
   कुमार गंधर्व: मुक्काम वाशी
   More ...  
  टीका
   आधुनिक मराठी कवयित्रींची कविता
   द्वादश-रत्नमाला
   महानुभावांची अन्वयस्थळे
   वाद-संवाद
   पासंग
   More ...  
  वैचारिक
   भारतीय संस्कृती
   तुमच्या माझ्यासाठी
   मराठी रियासत - खंड १ ते ८
   यमुनापर्यटन
   सूर्य पाहिलेली माणसं
   More ...  
  टीका
   मर्मभेद
   लढे अंधश्रद्धेचे
   मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ - खंड २
   साहित्य: अध्यापन आणि प्रकार
   उकल
   More ...  
  वैचारिक
   काळाची पाऊले
   सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना
   मंजिल दूरच राहिली
   फलज्योतिष: शास्त्र की अंधश्रद्धा
   मी माझा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.