Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


बाबरी मशीद - राममंदिर वाद - राज्यघटनेची अग्निपरीक्षा
Author: माधव गोडबोले
Publisher: उत्कर्ष प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~310 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
हे पुस्तक लेखकाने मूळ इंग्लिशमध्ये लिहिलंय. द बाबरी मशीद - राममंदिर डायलेमा न सिड टेस्ट फॉर इंडियाज कॉन्स्टिट्यूशन या नावानं ते कोणार्क पब्लिशर्सनं प्रकाशित केलं. देशाच्या इतिहासात अयोध्येतील बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा पडण्याची घटना वेगळी आणि इतिहासाला वळण देणारी होती. त्या वेळी केंद्रात पी. व्ही. नरसिंहराव यांचं सरकार सत्तेवर होतं, तर केंद्रीय गृहसचिवपदी माधव गोडबोले होते. गोडबोले यांनी आपण बाबरी ढाचा वाचावा यासाठी काय केलं हे तर दिलंच आहे; पण दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंहराव यांनी या संदर्भात काय भूमिका घेतली होती, त्याचा अंदाज यावा यासाठी त्यांनी 'एशियन एज' या इंग्रजी दैनिकाला दिलेली मुलाखत परिशिष्टात दिली आहे. एम. डी. नलपत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत राव यांनी गोडबोले यांच्यावर टीका केली आहे; पण ती तशीच कायम ठेवून, गोडबोले यांनी त्याला समर्पक उत्तरही दिलं आहे. या प्रश्नांच्या सर्व बाजू वाचकांसमोर याव्यात, याच हेतूनं त्यांनी ही मुलाखत आपल्यावर टीका केलेली असूनही दिली आहे.
पुस्तकात ६ विभाग असून, त्यांत वेगवेगळी प्रकरणं आहेत.
पहिल्याच प्रकरणात त्यांनी पोलिसांची भूमिका, तसंच राज्यघटनेतील त्रुटींमुळं त्या दिवशी केंद्र सरकारला नेमकं काय करता आलं नाही, त्याचा तपशील दिला आहे. निमलष्करी दलाच्या फौजा अयोध्येपासून काही थोड्या अंतरावर असतानाही केवळ राज्य सरकारनं त्या तुकड्या वापरायचा आदेश न दिल्यानं केंद्र सरकार काहीही करू शकलं नाही, हे ते सांगतात.
दुसर्‍या विभागात ते त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा तपशील देतात. लिबरहान आयोगाची हतबलता, त्या आयोगाला कसं काही करता आलं नाही, याचेही तपशील या विभागात मिळतात.
पुढील प्रकरणांमध्ये बाबरी ढाचा वाचवण्यात सर्व घटनात्मक संस्थांना का अपयश आलं, याचा वेध ते घेतात आणि त्याची कारणमीमांसाही करतात. देशाची धर्मनिरपेक्षतेची कल्पना आणि देशातील वास्तव परिस्थिती याचा तपशील देऊन, त्यात नेमकं काय राहिलं आहे, यावर भेदक प्रकाश टाकतात. देशाची पुढील वाटचाल कशी असायला हवी, याबद्दल मार्गदर्शनही करतात.
देशात घडलेल्या या महत्त्वपूर्ण घटनेची माहिती देतानाच, शेवटच्या प्रकरणात त्यांनी आपण कुठल्या संधी गमावल्या आणि न्यायालयाची वक्तव्यं काय होती, याचीही कल्पना दिली आहे.

Other Links:

Write your review for this book

Other works of माधव गोडबोले
   जवाहरलाल नेहरुंचे नेतृत्व - एक सिंहावलोचन
   लोकपालाची मोहिनी
   इंदिरा गांधी एक वादळी पर्व
   भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
   फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा

Similar books:
  इतिहास
   श्रीमान योगी
   मुस्लिम मनाचा शोध
   गांधीहत्या आणि मी
   मराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास
   सिंधी साहित्याचा इतिहास
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.