|
षड्ज-गांधार
Author: कृ. द. दीक्षित
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $5.75 $4.6 20% OFF ( ~240 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: '... सुरांच्या सहवासात घालवलेल्या काळापुरतेच एखाद्याने आत्मचरित्र लिहावे तशा प्रकारचे हे पुस्तक आहे. दीक्षित सुरांच्या आणि सुरकारांच्या स्मृतीच्या तारा जुळवत गेले आणि त्यांच्या व्यक्तित्वाचा गंधार त्यातून नकळत प्रकटला ..' -- पु.ल. देशपांडे ================= षड्ज-गांधार हा लेखसंग्रह प्रसिद्ध होत असताना मला एक प्रकारची धास्ती वाटत आहे. वेळोवेळी लेख लिहिणे आणि ते मासिकांतून छापून येणे वेगळे आणि ते छापून पुस्तकरूपाने वाचकांच्या पुढे ठेवणे वेगळे. एरवी कौतुक होत असले तरी सून म्हणून सासूसासर्यांपुढे कशी नांदतेस बघू, असे जे मुलीला म्हणतात, तसेच काहीतरी वाटते हे मात्र खरे. हे पुस्तक काढण्याचा, छापण्याचा आणि प्रकाशित करण्याचा संकल्प श्री. श्री. पु. भागवतांचा आणि सिद्धीही त्यांचीच. मी १९४८ साली पहिला लेख लिहिला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि शांतपणाने लिहवून घेतले. कधीही धाक घातला नाही. लेख कबूल करून वेळेत मिळाला नाही तर काय त्रास होतो याचा मला माझ्या व्यवसायात चांगलाच अनुभव आहे. पुस्तक छापायचे ठरल्यावर सहज एकदा नाव काय असावे अशी चर्चा केली आणि नाव नक्की झाल्यावर तितक्याच शांतपणाने आणि धिमेपणाने त्यांनी ते जाहीरही करून टाकले. तेव्हापासून मात्र मी जास्तच धास्तावलो. श्री. श्री. पु. भागवतांनी लेख मार्मिक टीकाकाराच्या आणि सहृदय रसिकाच्या डोळ्यांनी पुन्हा वाचले, तपासले, सूचना केल्या आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी काही लेख पुन्हा लिहिले, काहींना डागडुजी केली. एवंच, या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सारे श्रम श्री. श्रीकृष्ण भागवतांचे आणि सारे श्रेयही त्यांचेच. अशा परिस्थितीत त्यांचे आभार मानावे तरी कसे आणि किती? षड्जा-गांधार हा लेखसंग्रह प्रसिद्ध होत असताना मला एक प्रकारची धास्ती वाटत आहे. वेळोवेळी लेख लिहिणे आणि ते मासिकांतून छापून येणे वेगळे आणि ते छापून पुस्तकरूपाने वाचकांच्या पुढे ठेवणे वेगळे. एरवी कौतुक होत असले तरी सून म्हणून सासूसासर्यांपुढे कशी नांदतेस बघू, असे जे मुलीला म्हणतात, तसेच काहीतरी वाटते हे मात्र खरे. हे पुस्तक काढण्याचा, छापण्याचा आणि प्रकाशित करण्याचा संकल्प श्री. श्री. पु. भागवतांचा आणि सिद्धीही त्यांचीच. मी १९४८ साली पहिला लेख लिहिला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि शांतपणाने लिहवून घेतले. कधीही धाक घातला नाही. लेख कबूल करून वेळेत मिळाला नाही तर काय त्रास होतो याचा मला माझ्या व्यवसायात चांगलाच अनुभव आहे. पुस्तक छापायचे ठरल्यावर सहज एकदा नाव काय असावे अशी चर्चा केली आणि नाव नक्की झाल्यावर तितक्याच शांतपणाने आणि धिमेपणाने त्यांनी ते जाहीरही करून टाकले. तेव्हापासून मात्र मी जास्तच धास्तावलो. श्री. श्री. पु. भागवतांनी लेख मार्मिक टीकाकाराच्या आणि सहृदय रसिकाच्या डोळ्यांनी पुन्हा वाचले, तपासले, सूचना केल्या आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी काही लेख पुन्हा लिहिले, काहींना डागडुजी केली. एवंच, या पुस्तकाच्या प्रकाशनाचे सारे श्रम श्री. श्रीकृष्ण भागवतांचे आणि सारे श्रेयही त्यांचेच. अशा परिस्थितीत त्यांचे आभार मानावे तरी कसे आणि किती? अनेक मित्रांनी लेख वाचल्याबरोबर आपल्याला झालेला आनंद तत्परतेने कळविला. त्यांचा मी ऋणी आहे. कुणी बरे म्हटले की क्षणभर समाधान वाटते. स्तोत्रंकस्य न तुष्टये असे जे कविकुलगुरूंनी म्हटले आहे ते अगदी सत्यच. पण अगदी नेमाने लिहून कळविणारे म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे. त्यांनीही लेख लवकर संपवा आणि पुस्तक प्रकाशित करा, असा प्रेमळ आग्रह धरलाच. संगीतातली त्यांची जाणकारी काय आहे याची मला कल्पना आहे. म्हणून या पुस्तकाला प्रस्तावना लिहाल का असा प्रस्ताव करायचाच अवकाश, त्यांनी हो तर म्हटलेच, पण मी राहिलेले लेख लवकर संपवावे म्हणून नेहमीच धीर दिला. श्री. पु. ल. देशपांडे हे मित्र तर आहेतच, पण पाठीराख्या भावासारखेही आहेत. त्यांचेही आभार कसे मानावे कळत नाही. त्यांच्या प्रस्तावनेनंतर माझे लेख म्हणजे पुन्हा आपल्या संगीताच्या संकेताविरुद्ध उस्तादानंतर शिष्याने गायला बसण्यासारखे आहे. या पुस्तकाच्या पायी सर्वांनीच आपलेपणा दाखविला. त्यांतही माझी पत्नी सौ. निर्मला ही लेखांची पहिली वाचक. सुरुवात बरोबर आहे का नाही, द्विरुक्ती होते का, वगैरे सूचना पाळून मगच लेख मी पूर्ण करीत असे. तसेच माझ्या वहिनी सौ. मंदाकिनी याही वाचून आपली पसंतीनापसंती कळवीत : त्या दोघींनी माना वेळावल्या की थांबावे आणि डोलावल्या की पुढे लिहावे. आता या घरच्याच कुटुंबाचे आभार मी मानीतही नाही आणि मला वाटते मानताही येत नाहीत. जे गायक-वादक मी ऐकले आणि ज्यांच्या संगीतकलेच्या सावलीत मी सुखावलो त्यांच्या आठवणी मी लिहिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आनंदाची अगदी अल्पस्वल्प पावती असे हे लेख; गाण्याची टीका-टिप्पणी वा कलासमीक्षा नाही. इतर कितीतरी थोर कलाकार याच काळात झाले. त्यांपैकी पुष्कळ गवय्यांना ऐकायचा योग आला नाही. त्यांचे भरपूर गाणे-बजावणे ऐकायला लाभले नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिले नाही. त्यांच्या कलाविष्काराला मी मुकलो हे माझेच दुर्भाग्य. त्यांच्याविषयी लिहिले नाही, लिहिता आले नाही, हा केवळ माझाच कमीपणा. लहानपणापासून गाण्याचा-म्हणजे गाणे ऐकण्याचा-छंद लागला. पण परमेश्वराने तर हद्दच केली. शिक्षण संपवून कायद्याच्या चौकटीत वादी-प्रतिवादी हजर है अशा आरोळ्या; ऐकण्याऐवजी ज्या व्यवसायात वादीसंवादींचा सुरेख संगम साधणारी गायकगायिका भेटतील आणि तबल्याचे कायदे ऐकता येतील अशा व्यवसायात मला लोटून दिले. तिथे अनेक कलावंतांचा सुखद सहवास घडला. कितीतरी चर्चा झाली त्यांच्याबरोबर आणि ती करता करता ज्ञान मिळाले. अनेक विचार सुचले. भ्रम निमाले. जे मला समजले वा उमगले ते लिहिले आहे. माझा आग्रह वा दुराग्रह मुळीच नाही. सुतराम नाही. या व्यवसायात जसा गायकवादकांचा सहवास घडला तसेच कामानिमित्त वाचावे लागले, लिहावे लागले, संगीतविषयक पुस्तकांचा अभ्यासही करावा लागला. त्यामुळे संगीताविषयी लिहीत असताना, विचार मांडत असताना हे विचार अमक्या एका पुस्तकातले वा विचारवंताचे असावे असे वाटले तर नवल नाही. संगीतासंबंधी साधकबाधक चर्चा जशी पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केली तशीच माझे सहकारी श्री. मधुसूदन कानेटकर यांच्याबरोबर नेहमी होत असे. श्री. मधुसूदन कानेटकर यांच्यासारखा गायनविद्यासंपन्न, उत्कृष्ट आवाजीचा, आणि परंपरागत साधना केलेला गवई सहकारी माझ्याबरोबर काम करीत आहे याचा मला आधार आणि अभिमान आहे. त्यांचेही आभार मानणे अप्रशस्त, पण मनातले गुपित सांगितले. माझ्या गाण्याच्या नादाला वडिलांनी कधीही बांध घातला नाही. त्यांच्या परीने त्यांनी मला प्रोत्साहनच दिले. एका जलशाला जाण्याची मला फार हौस होती, पण अंगात ताप भरपूर होता. वडिलांनी माझी बेचैनी ओळखली. ते म्हणाले, जलसा चुकला म्हणून याचा ताप मात्र वाढेल. बरोबर एक माणूस देऊन मला गाडीतून जलशाला नेण्याआणण्याची स्वत:च यातायात केली. अशी माया त्यांनी नेहमीच केली. त्या काळात गाण्यासाठी वडवड करणे पसंत नसे. नादिष्टपणाला अडसर घालणे हे शिस्तीचे आणि व्यवहारदक्षतेचे समजले जाई. अशा दिवसांत आणि काळात माझ्या मनाचा हिरमोड करू न देता मला एका दिव्य आनंदाची प्राप्ती करून दिली हीच माझी खरी वडिलार्जित संपत्ती. यासाठी मी येथे त्यांचे कृतज्ञतापूर्वक, भावपूर्वक स्मरण करीत आहे.
|
 |
 |
|