|
बाळूच्या अवास्थांतराची डायरी
Author: किरण गुरव
Publisher: शब्द प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~150 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: किरण गुरव यांची कथा ही केवळ 'बाळूच्या अवस्थांतराची डायरी' नाही. हा आजच्या काळाच्या अवस्थांतराचाच कोलाज आहे. वास्तव आणि कल्पिताच्या अजोड सरमिसळीतून ही कथा साकारते. त्यामुळे घटना-घटितांचे प्रतिबिंब एवढ्यापुरतीच ती मर्यादित राहात नाही. तुकड्या-तुकड्यात दुभंगलेल्या, चिरफाळलेल्या पुढ्यातल्या वास्तवाला गुरव यांची कथा विलक्षण भाषासामर्थ्याने चिमटीत पकडते. गरगरून टाकणारी गतिमानता आणि बहुपदरी आशयसूत्रे यामुळे नागरअनागर अशा सीमारेषाही या कथेत पुसट होतात. बदलत्या सामाजिक धारणा, कोसळती मूल्यव्यवस्था, माणसाचेही 'क्रयवस्तु'करण तेजीत आणणारा सर्वसंचारी बाजार अशा असंख्य बाबी गुरव यांच्या कथेत सघन तपशिलांसह दीर्घपटलावर सामावतात आणि कथा ही स्थळकाळाला बांधून टाकणारी कला आहे याचा प्रत्यय येतो. संवेदनेशिवायचे कृतक्जग निर्जीव शब्दांच्या सांगाड्यातून रचण्यालाच कथा म्हणून खपविण्याच्या सराईतपणापासून ही कथा अलिप्त आहेच, अवकाश भरून काढण्यासाठी सरधोपट वास्तववादाचा अ-कलात्म अवलंब करण्याची लागणही या कथेला झाली नाही. रंजनप्रधान चटपटीत शैली आणि वाचकानुनयाच्या सापळ्यातून मराठी कथेला मुक्त करून थेट जीवनदर्शनाच्या पातळीवर आणणारे जे आजचे कथाकार आहेत त्यात किरण गुरव हे महत्त्वाचे नाव आहे, हे याही कथासंग्रहातून ठळक होईल! - आसाराम लोमटे ==== साहित्य अकादमी पुरस्कार २०२१ जाहीर झाल्यानंतर किरण गुरव यांची प्रतिक्रिया - साहित्य अकादमी पुरस्काराचा खूप आनंद साहाजिकच आहे. माझ्याबरोबरच कथा या साहित्य प्रकाराला बळ देणारा हा पुरस्कार आहे. खेड्यापाड्यातील नव्यानं लिहितं होणार्या मुलांना कथा हा साहित्यप्रकार त्यातल्या वेल्हाळपणामुळं खूप आपलासा वाटतो. बाळूच्या अवस्थांतराची डायरी या शिर्षक कथेतील बाळू हा अशा मुलांचा प्रतिनिधी आहे. शिक्षणासाठी शहराकडे होणारे बाळूचे स्थलांतर हळूहळू त्याचे मानसिक अवस्थांतर बनते. बाळूची खेडूत मानसिकता आणि तिला दिसणारे आक्राळ विक्राळ शहर यांच्यातील टकराव हा एक सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील अनेक मुलांना ही कथा त्यांचीच वाटते. या संग्रहातली इंदूलकरांची कथा ही देखील कथानिर्मिती, लेखकाचे चरित्र आणि त्याचा काळ यांची परस्पर गुंफण तपासते. या इंदुलकरांना कधीकधी त्राग्यानं जीवसृष्टीत जन्माला आल्याबद्दल वाईटही वाटतं. पण कथेत सरतेशेवटी ते आपल्या जन्मास कारण ठरलेल्या भैरीस्वरूप निसर्गाचे, आई-वडिलांचे शुक्रगुजार होतात. आपला जन्म म्हणजे या सर्वांनी मिळून सृष्टीत घडवून आणलेला एक छोटासा जैविक महास्फोट आहे या निष्कर्षाला ते अखेरीस येतात.
Other Links:
|
 |
 |
|