|
गावकळा
Author: सदानंद देशमुख
Publisher: सुविधा प्रकाशन
|
|
Price: $3.52 $2.81 20% OFF ( ~147 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार जून ११ २००६ खेड्यांच्या बरबादीकरणाचा टणक उच्चार ( केशव सखाराम देशमुख )
कादंबरी लेखनाच्या प्रदेशामध्ये मुद्रा उमटवल्यानंतर सदानंद देशमुख आता "गावकळा' हा कवितासंग्रह घेऊन कवी म्हणून दाखल झालेले आहेत. खेड्यांच्या मरणकळांचे अवघे भोगवटे प्रकट करणारी "गावकळा'मधील कविता ही एकूण वर्तमानसंदर्भ, भणंग मनोवृत्ती, नैतिकता, माणूस - ढोर - बाई यांच्या अवहेलना, नव्या सद्य-कालीन पिढींचे बरबादीकरण आणि अभद्र वास्तव अशा जळजळीत विषयांना शोकात्म भावनेने सादर करते. ........ उरामध्ये दु-खाचा कल्लोळ आणि लहानमोठ्या मेंदूंमध्ये जाळाचा भडका उत्पन्न करणारी "गावकळा'तील कविता वाचकांना अस्वस्थ करून सोडते. "गावकळा'मधून आलेले सदानंद देशमुख हे निरीक्षणे आणि अनुभव पकडण्याच्या स्तरावर सिकंदर कवी ठरतात. भूमी आणि तिच्या भोगवट्यांशी समरूप पावणारी ही कविता आहे. आज, खेडी, बाया, गडी, पोरे, पोरी, जितराब हे ऐरणीवर लटकून आक्रंदत आहेत. या कठोर आक्रंदनाचा ध्वनी विलक्षण परिणामांसह सदानंद देशमुख यांनी १९८० नंतर मराठी कवितेमध्ये "गावकळा' निमित्ताने प्रथमत- आणला, हे आवर्जून नमूद करायला हवे. कारण "गावकळा'ची कळा माणूस, मातीच्या पोटातून उगवलेली आहे.
अर्थात "गावकळा'मधील कवितेचे वावर कुठवर असावे? आज नवे वारे जसे वाहू लागले त्याप्रमाणे नव्या बदमाशीची वाहतूकही वाढली. अशा बदमाशीची नाना, नूतन रूपे "गावकळा'तून येतात. शेतांवरील बैल गेले आणि लहानथोर फक्त "बारोमास' गावशिवार विधवा करून टाकणारी यंत्र गावाशिवारात डेरेदाखल झाली. यासंबंधी मेंदू बधिर करणारी, मनं कुरतडून खाणारी जाणीव "गावकळा'मध्ये येते.
सिनेमा, टीव्ही, व्हिडिओ, ध्वनिमुद्रिका, टेप, सीडी, जिपा, फटफट्या, अवैध वाहतूक, पाणठेले, टपर्या, बाजे, बॅंड, टुरिंग थिएटर्स, विडी, दारू, सिगारेट अथवा व्हल्गर गाणी, चारित्र्याची लागलेली वाट, मुजोरी, धिंगाणा, सेक्सविषयीची आसक्ती की अनासक्ती यातला पुसला गेलेला फरक, असे एक नव्हे हजार लहान- बारीक- सूक्ष्म अनुभव, निरीक्षणे सदानंद देशमुख यांनी त्यांच्या रचनांचे विषय केल्यामुळे या कवितेत कोरड्या शब्दांच्या वृथा बुडबुड्यांना स्थान नाही. अनुभव, निरीक्षणांचा भक्कम प्रदेश हे या कवीच्या सर्जकत्वाची खूण आहे. जगण्याचीच कशी वाट लागली आहे, अशा सत्य, सद्य-कालीन भेदक अनुभवांना मांडणारी "गावकळा'मधील कविता होय. लहान, थोर अनुभवांमधून, सूक्ष्म निरीक्षणांमधून एका व्यापक; परंतु तल्लख चिंतनापर्यंत आणून सोडण्याची शक्ती "गावकळा'मधील कवितेच्याजवळ निश्चित आहे; म्हणूनच आजच्या कवितेमध्ये लक्ष वेधून घेण्याची या कवितेची धमक न मालवणारी ठरावी.
"गावकळा'तील कवितांमधून येणारे विषयक्षेत्र असे रुंद क्षेत्र आहे. सावकारी, कर्जबाजारूपणा, हुंड्याच्या प्रथा, नागवणारी खेडी, मुलींचे छळ, सासुरवास नावाचे स्त्रीजन्य अराजक, तमाशांमधून वर्धित होणारा सांप्रत पांचटपणा व त्यातून घसरलेले रंजन आणि निखळलेला विनोद अशा भेदक विषयांबरोबरच सदानंद देशमुख यांनी "गावकळा'करिता पेश केलेले विषय खेड्यांच्या श्वासांशी आणि खेडुतांच्या समग्र अस्तित्वाशी घट्ट बिलगलेले कवितांमधून मांडले. हे अवघे विषयविश्व मार्मिक आणि भेदक आहे.
- केशव सखाराम देशमुख
|
 |
 |
|