|
आर्थिक प्रश्न - काल, आज आणि उद्या
Author: गंगाधर गाडगीळ
Publisher: दिलीपराज प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~194 Pages, R200) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रश्न, मग ते साहित्यक्षेत्रातले असोत, सामाजिक असोत अगर आर्थिक असोत. त्यांच्याकडे व्यापक, समतोल व मर्मग्राही दृष्टीने पाहाणं हे या गंगाधर गाडगीळांचं वैशिष्ट्य आहे. असं करताना चालू घटकेच्या विचारप्रणाली व घोषणा यांच्या ते आहारी जात नाहीत. त्याचप्रमाणे शास्त्रीय समजल्या जाणाच्या मीमांसा अगर सिद्धांत ते तपासून पाहिल्याशिवाय स्वीकारत नाहीत. आपले विचार मांडताना ते विद्वत्तेचं प्रदर्शन करीत नाहीत आणि शास्त्रीय समजल्या जाणाच्या परिभाषेच्या जडणजाळात गुरफटून जात नाहीत. अगदी साध्या भाषेत ते सुगमपणे आपले विचार निर्भीडपणे मांडत असतात. गाडगीळांचे हे सगळे गुणविशेष त्यांनी वेळो वेळी लिहिलेल्या या आर्थिक प्रश्नांवरील लेखांत ठसठशीतपणे दिसून येतात. या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळेच समाजवादाचा सर्वत्र उदो उदो होत असताना आणि तो भारतात आणि जगभर यशस्वी होणार असं वातावरण निर्माण झालं असताना त्यांनी १९६३ साली समाजवादानं भारताचे आर्थिक प्रश्न सुटतील का ? असा प्रश्न उपस्थित करून त्याला संयुक्तिकपणे नकारार्थी उत्तर दिलं यामुळे त्यांच्यावर टीकाकार तुटून पडले आणि प्रतिगामी असा सवंग शिक्का त्यांच्यावर मारला गेला. पण आपल्या भूमिकेला ते चिकटून राहिले आणि अखेर त्याचंच विश्लेषण सत्य ठरलं. गाडगीळ जरी समाजवादी अर्थरचनेचे कडवे विरोधक असले तरी चिंतामणराव देशमुखांनी भारताच्या समाजवादाकडे झुकलेल्या अर्थरचनेचा पाया किती दूरदृष्टीनं, कौशल्यानं आणि व्यवहार्य खटल्यात घातला ते मार्मिकपणे दाखवून देतात. नव्या उदार आर्थिक धोरणाचं स्वागत करतानाच त्याची अंमलबजावणी करताना जागोजागी हात कसा आखडता घेतला जात आहे आणि प्रस्थापित हितसंबंध त्याला कसा विरोध करीत आहेत ते दाखवून देतात. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेकडे ते असंच समतोलपणे पाहातात; बहुराष्ट्रीय, जगद्व्याळ कंपन्यांचे स्वागत करताना त्यांच्या बाबतीत ते डोळसपणे इशारेही देतात. निर्भेळ चांगलं असं काही असत नाही. बन्यावाईटाचं मिश्रण सर्वत्र असतं याचं त्यांचं भान त्यांना स्वागतार्ह वाटणाच्या जागतिकीकरणाच्या संदर्भातही सुटत नाही. आणि पुढल्या शतकात कोणत्या आर्थिक आव्हानांना जगाला तोंड द्यावं लणार आहे. त्यांचाही मार्मिक जाण त्यांना आहे. सर्वांना समजू शकेल अशा साध्या भाषेत लिहिलेले हे लेख सामान्य वाचकांना तर उपयुक्त ठरतीलच पण अर्थशास्त्राच्या अभ्यासकांनादेखील ते मार्गदर्शक ठरतील.
|
 |
 |
|