|
मी आणि माझी शाहिरी
Author: लीलाधर हेगडे
Publisher: साने गुरुजी आरोग्य मंदिर प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~206 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार २६ फेब्रुवारी २००६ एका जिगरबाज शाहिराची कहाणी (मंगेश विश्वासराव)
शाहीर लीलाधर हेगडे या ध्येयनिष्ठ शाहिराची झपाटलेली कथा 'मी आणि माझी शाहिरी' या पुस्तकात प्रकाशित झाली आहे. साने गुरुजींच्या एका धडपडणार्या मुलाची आणि तशाच अनेक भारावलेल्या व्यक्तिमत्त्वांची ही गाथा आहे. कविवर्य वसंत बापट आणि लीलाधर हेगडे म्हणजे आधुनिक 'होनाजी - बाळा'! बापटांनी पोवाडे, गाणी लिहायची आणि हेगडेंनी ती गायची, असा जणू अलिखित करारच होता. १९४२ च्या चळवळीपासून शाहीर हेगडे यांनी हातात डफ घेतला आणि अनेक देशभक्तांच्या पाठीवर थाप मारीत त्यांचा हुरूप त्यांनी वाढवला.
तत्पूर्वी, ठाण्यात विद्यार्थिदशेत असताना देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले 'उद्योग' आपल्या खटयाळ भाषेत मांडले आहेत. त्यानंतर ठाणे जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाचा प्रचार करण्यासाठी त्यांनी भ्रमंती केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सेवा दलाच्या शाखा अनेक ठिकाणी सुरू केल्या. १९४६ मध्ये रेशनिंग कचेरीतील नोकरी सोडून हेगडे महिना ५० रुपये मानधनावर राष्ट्र सेवा दलात पूर्ण वेळ सेवक म्हणून काम पाहू लागले. १९४५ मध्ये वसंत बापट यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर 'महाराष्ट्र शाहीर कलापथक' तयार झाले आणि जनजागरणासाठी ते महाराष्ट्रभर फिरले. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे यासाठी ते साने गुरुजींसोबत राज्यभर फिरले.
स्वातंत्र्यानंतर जव्हार संस्थान विलीनीकरणासाठी केलेले प्रयत्न, त्यानंतर 'खेडयाकडे चला' हा गांधीजींचा आणि एस. एम. जोशींचा आदेश शिरोधार्य मानून गावोगावी श्रमदान शिबिरातून केलेले काम, यातून या माणसाचा पिंड घडला. राष्ट्रीय तमाशे घेऊन बापट-हेगडे ही जोडगोळी सर्वत्र फिरली. असाच एके ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना साने गुरुजी गेल्याची बातमी समजली. तरीही विषण्ण अवस्थेत त्यांनी कार्यक्रम केला. पोरकेपणाची जाणीव त्या वेळी झाली, असे हेगडे यांनी लिहिले आहे. त्या काळात ठाण्यातील वाघबीळ येथे राष्ट्र सेवा दलाने श्रमदानातून तयार केलेला रस्ता तेथील रहिवासी अजूनही विसरलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी हेगडे तिथे गेले तेव्हा त्यांना १०३ वर्षांचा दादू भेटला. त्या वृद्धाने ओळखल्यावर हेगडेंचे मन मोहरून गेले. दरम्यानच्या काळात आकाशवाणीच्या आवाजाच्या परीक्षेत शाहीर साबळे आणि आपण कसे नापास झालो आणि नंतर त्यावर गदारोळ उठल्यावर आकाशवाणीचे कार्यक्रम कसे मिळू लागले, याची कथा हेगडे यांनी सांगितली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी एसेमसोबत स्वत:ला झोकून दिले. चीनच्या आक्रमणाच्या वेळी आचार्य अत्रे आणि कविवर्य वसंत बापट यांच्यात रंगलेला वादही या पुस्तकात दिला आहे. दादा कोंडके यांनी लिहिलेल्या 'चिनी आक्रमणाचा फार्स'चे कार्यक्रमही राज्यभर सेवा दलाच्या कलापथकाने केले. या दौर्यातल्या गमतीजमती, वेगवेगळे अनुभव हेगडे यांच्याच शब्दांत वाचावे, इतके ते सरस उतरले आहेत.
महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, गल्ली ते दिल्ली, आजादी की जंग हे कार्यक्रम सेवा दलाच्या कलापथकाने केले. तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासमोर 'महाराष्ट्र दर्शन'चा कार्यक्रम झाला. हेगडे यांनी नवसाक्षरांसाठी व बालकांसाठी लेखन, प्रौढांसाठी केलेले लेखन याविषयीही या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे.
त्यानंतरच्या सोशालिस्टांची झालेली दुफळी पाहून हा कार्यकर्ता व्यथित झाला. तरीही त्यांनी समाजकार्य जोमाने सुरू ठेवले. 'आपल्याला पटेल तेच लिहिले. मी मला पटले तेच गायलो' असे म्हणणारा हा शाहीर आता सांताक्रूझच्या साने गुरुजी आरोग्य मंदिरात आपले तन-मन गुंतवून आहे. एके काळी गलिच्छ झोपडपट्टीच्या मध्यवर्ती भागात त्यांनी एका पत्र्याच्या खोलीत साने गुरुजी विद्या मंदिर सुरू केले. आता तिथे एक डौलदार इमारत उभी आहे. त्यात अनेक उपक्रम चालू असतात. आज शेरोशायरीच्या जमान्यातही हा शाहीर वयाच्या अठठयाहत्तराव्या वर्षी शाहिरीचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतो आहे. त्यांची शाहिरी एएकून बाबा आमटेंसारखा देवमाणूस त्यांचे हात हाती घेऊन त्यांना नवे बळ देतो आहे.
|
 |
 |
|