|
मखलाशी
Author: शिरीष कणेकर
Publisher: राजा प्रकाशन
|
|
Price: $5.48 $4.38 20% OFF ( ~170 Pages, R160)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: गप्पा मारल्यागत सुसंवाद साधणारा बाज हे कणेकरांच्या सदाबहार लेखणीचे वैशिष्ट्य आहे. त्याच अफलातून 'कणेकरी' शैलीचा अजब नजराणा
Review courtesy of Loksatta: रविवार , १९ जून २००५ वेधक टिप्पणी शिरीष कणेकर हे नाव मराठी वाचकांना चांगले परिचयाचे असून, हिंदी चित्रपट व क्रिकेट हे त्यांच्या खास जिव्हाळयाचे विषय. याखेरीज अन्य विषयांवर, दैनंदिन ताणतणावांवर हलकेफुलके लेखन करण्यातही त्यांचा चांगला हातखंडा आहे. मोजकया जागेत मोजकया शब्दांत नेमकेपमाने लिहिणे ही गोष्ट तशी सोपी नाही. कणेकर यांना ती चांगल्या रितीने साधली असून, 'मखलाशी' वाचताना जागोजागी त्याचा प्रत्यय येतो. शिरीष कणेकर यांची यापूर्वी 'चापलुसकी', 'चहाटळकी' व 'इरसालकी' ही तीन पुस्तके प्रसिद्ध झाली असून, या पुस्तकांच्या दोन आवृत्या निघून संपल्याही ! या तिन्ही पुस्तकातले निवडक लेख पुन्हा संपादित करुन काढलेला लेखसंग्रह म्हणजेच मखलाशी ! आता 'मखलाशी' या शब्दाचा नेहमीचा अर्थ येथे अभिप्रेत नसून दैनंदिन घटना, किस्से यावर कणेकर विविध लेखांमधून कशा पद्धतीने मर्मिक टिप्पणी करतात, याचे प्रत्यंतर 'मखलाशी'मधले विविध लेख वाचताना येते. त्यामधल्या अनेक लेखांना विनोदाची मस्त फोडणी आहेच ! याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रग्रहण हे लागलंच नाही ! हा लेख. वृत्तपत्राच्या दैनंदिन कामकाजात पत्रकारांकडून जे संभाव्य घोटाळे होतात, त्यावर कणेकरांनी अत्यंत नर्मविनोदी शैलीत झोत टाकला आहे. 'पुणे आणि पुणेकर' हा उर्वरित महाराष्टरच्या कायम चर्चेचा विषय. 'पुणे तिथे काय उणे' या लेखात ही वैशिष्टये कथन करताना आजच्या परिस्थितीत बदललेले 'पुणे आणि पुणेकर' कणेकर नेमकया शैलीत टिपतात. 'मोठी माणसं ही अशीच असतात' या लेखात कणेकर 'खर्या अर्थाने मोठी माणसं अतिशय साधी असतात' असे निरीक्षण सहजपणे नोंदवतात आणि त्यासाठी कुसुमाग्रजांसमवेत झालेल्या भेटीचा किस्सा सांगतात. याच लेखात जयंत नारळीकरांबद्दलचा किस्साही असाच वेधक छोटया घटनांमधून मोठी माणसे आपल्या मोठेपणाचे अवडंबर न माजवता कसे नमर्पणे वागतात याचे प्रत्यंतर नारळीकरांच्या वर्तनातून येते, तेव्हा सुखद धकका बसतो. 'जूही आली शिवाजी मंदिरी...' हाही लेख असाच सरस ठरलाय ! कणेकर यांचा चाहता आणि वाचकवर्ग खूप मोठा असून, त्यांनाही 'मखलाशी' निश्चितच आवडेल, यात शंका नाही. अभय जोशी
|
 |
 |
|