|
लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि आख्यायिका
Author: संपादित
Publisher: परममित्र पब्लिकेशन्स
|
|
Price: $82.26 $65.8 20% OFF ( ~1836 Pages, R2700)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: तीन खंड स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि तो मी मिळवीनच असे म्हणणारे लोकमान्य टिळक. त्यांची धडाडी, वक्तृत्व, नेतृत्व, दूरदृषटी, लोकसंग्रह, पत्रकारीता, झुंजार बाणा, अशा अनेक गुणांच्या तेजाने त्यांचे व्यक्तिमत्व झळाळत राहिले. त्यांच्या निधनानंतर गांधी जीनांपासून घरातल्या आप्तेष्टां पर्यंत लहान-मोठ्या अनेकांनी अगत्याने त्यांच्या आठवणी जागवल्या. त्या रसाळ आणि लोभस स्मृतीलेखांचा हा अनमोल ठेवा.. लोकमान्य टिळकांच्या निधनास १ ऑगस्ट २०२० या वर्षी १०० वर्ष पूर्ण झाली. या निमीत्ताने त्यांना आदरांजली त्यांच्या आठवणी जागवून. श्री. स. वि. बापट या त्यांच्या केसरी मधील एका सहकार्याने लोकमान्य टिळक जिवंत असतानाच लोकमान्यांनच्या आठवणी आणि आख्यायिका प्रचंड मेहनत करून संकलित केल्या आणि लोकमान्य टिळक आठवणी आणि आख्यायिका हा त्रिखंडात्मक ग्रंथ सिध्द केला १९२४ या वर्षी. त्या ग्रंथाचे पुर्नप्रकाशन आम्ही करत आहोत. मुळ पुस्तकातील मजकुराच्या शुध्दलेखना प्रमाणे. मराठी माणसासाठी अनमोल ठेवा अभ्यासकांसाठी संदर्भ ग्रंथ आणि रसिकांसाठी आनंदपर्वणी. मूळ संकलन व संपादन : श्री. स. वि. बापट स्मृति शताब्दी विशेष आवृत्ती चे संपादन : श्री. सुनील कर्णिक ; प्रस्तावना: डॉ. सदानंद मोरे ; आतील रेखाचित्रे: उदय पळसुलेदेसाई सजावट : आनंद भट खंड १ मुखपृष्ठ : सुहास बहुळकर पृष्ठसंख्या:५३८ खंड २ मुखपृष्ठ :गोपाळराव देऊसकर पृष्ठसंख्या:६८२ खंड ३ मुखपृष्ठ :उदय पळसुलेदेसाई पृष्ठसंख्या: ६१६ ===== सदाशिव विनायक बापटांनी ज्या व्यक्तींकडून टिळकांच्या आठवणी मिळवल्या त्यांची कक्षा विस्तीर्ण आहे. त्यांत टिळकांचे अनुयायी व चहाते तर आहेतच पण टिळकांविरोधकांच्या आठवणींचा समावेश करण्यात बापटांची टिळकभक्ती आड आली नाही. वैजनाथशास्त्री राजवाडे यांच्यासारख्यांनी 'गीतारहस्या' वर केलेल्या जहाल टीकेचाही समावेश बापटांनी कोणत्याही प्रकारची 'सेन्सॉरशिप' न चालवता केला आहे. बापटांच्या आठवणीत महाराष्ट्राबाहेरील मान्यवरांच्या आठवणींचाही समावेश होतो. त्यासाठी बापटांना विशेष इंग्रजी विभागाची तरतूद करावी लागली. या विभागात नेताजी सुभाष यांचेपासून बॅ० महमंदअली जिनांपर्यंत अनेक मातब्बर अवतीर्ण होतात. लोकमान्यांप्रमाणे नेताजींनाही मंडाले येथील तुरुंगातील पाहुणचार प्राप्त झाला होता. वयाने टिळकांपेक्षा तरुण असलेल्या नेताजींना या तुरुंगात खूप त्रास झाला. अशा वेळी त्यांनी आपल्यापेक्षा वयाने अधिक आणि व्याधीग्रस्त टिळकांचा आदर्श पुढे ठेवून दिवस काढले होते. बॅ० जिना आणि टिळक यांचे संबंध किती चांगले होते हे जाणकारांना वेगळे सांगायची गरज नाही. वकील जिनांनी टिळकांचे खटले लढवले होते. होमरूल चळवळीतही दोघे बरोबर होते. टिळकांचा अवमान करणार्या लॉर्ड विलिंग्डनची गौरवसभा उधळून लावण्याच्या योजनेचे सूत्रधार जिनाच होते. कअॅंग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात करार घडवून आणण्यात टिळक आणि जिना अग्रभागी होते. गांधींच्या असहकारितेच्या चळवळीनंतर जिनांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. "नागपूर कअॅंग्रेसने १९२० मध्ये असहकारितेच्या धोरणाला आणि कार्यक्रमाला मान्यता दिली, तेव्हा टिळक जिवंत असते, तर त्यांचा दृष्टिकोन काय असता याचा मी नेहमी विचार करीत आलेलो आहे,' असे जिना सांगतात, तेव्हा बापटांचा ग्रंथ एक वेगळ्या पातळीवर जातो. - डॉ. सदानंद मोरे प्रस्तावनेतून
Book Excerpt
|
 |
 |
|