|
त्या एका दिवशी
Author: माधुरी पुरंदरे
Publisher: पुरंदरे प्रकाशन
|
|
Price: $2.74 $2.19 20% OFF ( ~90 Pages, R80)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: "माधुरी पुरंदरे यांचं सकस बालसाहित्य बालमनाबरोबरच मोठांनाही समृद्ध करणारं आहे. गोष्टींमधून लहानग्यांचं मन अलवारपणे टिपण्याचं आणि त्यांना उत्तम चित्रांची जोड देण्यात त्यांचा हातखंडाच! लहानांसाठीची त्यांची पुस्तकं मोठांनाही हवीहवीशी वाटतात, वाचावीशी वाटतात. अनोख्या चित्र व लेखनशैलीने मराठी बालसाहित्यात त्यांनी आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्यांना माधुरी पुरंदरेंच्या बालसाहित्याची सफर घडली आहे, अशी मंडळी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असतात. त्या एका दिवशी हे पुस्तकंही त्यांच्या लिखाणातलं अनोखेपण दर्शविणारं आहे. या पुस्तकात त्या एका दिवशी आणि मला क्रियापद भेटले तेव्हा.. या दोन गोष्टी वाचायला मिळतात. त्या एका दिवशी या गोष्टीतला गौतम हा वयात येणारा मुलगा. आई-वडिलांवर खूप प्रेम करणारा; परंतु काही कारणास्तव त्यांच्यातील अबोल्यावर दु:खी होणारा, या अबोल्यातून निर्माण झालेल्या त्या दोघांच्या वर्तणुकीवर सखोल विचार करणारा एक संवेदनशील मुलगा. एक दिवस वडिलांबरोबर आत्याकडे जायला निघतो. त्याचा हा प्रवास त्याच्या साहसाचा ठरतो. गौतमचे साहस या गोष्टीतून वाचायला मिळतेच; परंतु त्यातही वयात येणार्या मुलाची मानसिकता, होणार्या शारीरिक बदलांचा त्याच्या तन-मनावर होणारा परिणाम याची अलवार उकल लेखिका करते. वयात येणार्या मुलाचं हळवं मन अलगदपणे लेखिकेने उलगडलं आहे. चोराच्या तावडीत सापडलेले वडील आणि स्वत:ची मोठा शिताफीने सुटका करण्यात गौतम यशस्वी होतो. साधी-सरळ अशी ही साहसकथा अनेक पैलू उलगडत जाते. या पुस्तकातीलच मला क्रियापद भेटले तेव्हा.. ही कथाही सुंदर आहे. खरं तर कथेचे शीर्षक अससेल्या नावाचा निबंध चिन्मयीला तिच्या सरांनी दिला आहे. पण हा काही निबंधाचा विषय झाला? असं म्हणत ती सरांवर थोडी चिडचिड करते. पण तिचा बाबा तू लिहून तर बघ! असं तिला समजावणीच्या सुरात सांगतो आणि ती निबंध लिहायला बसते. हा निबंध लिहिता लिहिता तिच्या लहानपणीच्या आठवणींचा पटच उलगडत जातो. या निबंधात मरणे या क्रियापदाची आपल्याला कशी ओळख झाली हे सांगताना त्याच्याशी संबंधित गमतीदार, हळव्या, दुखर्या आठवणी ओघानं येऊन जातात आणि त्यातूनच तिचा निबंध साकार होतो. परंतु निबंध लिहून तो सरांना दाखवून आपली पाठ थोपटून घेण्याचा विचार दूर सारून, हा निबंध लिहिताना तिने अनुभवलेला आनंद तिला जास्त मोलाचा वाटतो. कथेतला हा भाग खूपच सुंदर आणि महत्त्वाचा! ही कथा वाचताना चिन्मयीचे आई-वडील आणि चिन्मयी यांच्यातील हळूवार नातंही उलगडत जातं. या दोन्ही कथांमधून आई-वडील आणि मुलं यांच्यातील नातेसंबंधही अधोरेखित होतं." -- लता दाभोळकर, लोकसत्ता २६ ऑगस्ट २०१२
|
 |
 |
|