Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


आयुर्वेदीय गर्भसंस्कार
Author: बालाजी तांबे
Publisher: सकाळ पेपर्स लिमिटेड
Add to Shopping Cart
Price: $20.41 $16.32 20% OFF ( ~400 Pages, R670)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
फॅमिली डॉक्टर'मधून "गर्भसंस्कार' ही लेखमालिका सुरू केल्यानंतर अनेक स्त्रियांची पत्रे आली, या विषयाचे गांभीर्य समजावून घेतल्यामुळे त्यांना लाभ झाला तसेच प्रसूती लवकर व नॉर्मल होण्यासाठी असलेला "बाळंत लेप - इझी डिलिव्हरी लेप' वापरल्याने फायदा झाल्याचे अनेकांनी कळवले. ...... ही लेखमाला आमच्या पाहण्यात उशिरा आली, अगदी नववा महिना सुरू असताना आम्हाला ही लेखमाला चालू असल्याची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही आता काय करावे? अशी विचारणा करणारीही पत्रे आली. या विषयावर चर्चासत्रे वा एक-दोन दिवसांची शिबिरे घेऊन याची अधिक माहिती करून घ्यायची इच्छा दाखविणारी अनेक पत्रे आली. त्यात सुचविलेली योगासने, व्यायाम, मसाज वगैरे शिकण्यासाठी अनेकांनी इच्छा प्रदर्शित केली. अशा तर्‍हेने गर्भसंस्कार विषयाच्या बाबतीत लोक जागरूक झाल्याचे निदर्शनास आले. म्हणून याचे एक पुस्तक तयार केल्यास ते कायम घरात राहू शकेल व पिढ्यांपिढ्या या पुस्तकाचा उपयोग होईल, या दृष्टीने या पुस्तकाचे काम तातडीने करण्याचे नक्की झाले. आयुर्वेदिक पद्धतीने किंवा भारतीय परंपरेने जे काही सांगितले तशी परिचर्या लोकांपर्यंत पोचवावी व त्याबरोबरीने आधुनिक संशोधनाची मदत घेण्याची वेळ आल्यास किती प्रमाणात व कशी करून घ्यावी यासंबंधीची माहितीही यात असावी असे ठरले. समोर उभ्या टाकलेल्या जीवनाचा विचार महत्त्वाचा ठरतो. म्हणून, जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी कृती म्हणजे "संस्कारां'चे विज्ञान सर्व शास्त्रांनी एकमताने तयार केले. आयुर्वेद हा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय असल्यामुळे त्यात असणार्‍या आठपैकी एका विभागात अपत्यप्राप्ती व स्त्रीआरोग्य यावर लिहिलेले आहे. त्याच्याच जोडीला रसायन व वाजीकरण हे विभागही तयार केले, रसायन व वाजीकरण जर बरोबर नसेल तर स्त्रीआरोग्य, पुरुष आरोग्य व पर्यायाने अपत्य संस्कारित होणार नाही. आयुर्वेदात या अंगाने अनेक गोष्टी सांगितल्या. स्त्रीमुक्ती, स्त्रियांची कमी संख्या, स्त्रियांना होणारा जाच वगैरे विषयांचे सध्याच्या जगात फार चर्चा होत असल्याचे आपण पाहतो. दुर्बलांवर बंधने टाकणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे भ्याड लोक समाजात असतातच. अशी स्वार्थी व पशुतुल्य वर्तणूक असलेली माणसे स्त्रियांवर अत्याचार करतात. या अत्याचारांचा बदला स्त्री शारीरिक पातळीवर लढून घेऊ शकत नसेल कदाचित, पण त्यांना निसर्ग मदत नक्कीच करतो व त्यातूनच सर्व मनुष्यमात्राचा र्‍हास सुरू होऊ शकतो. पुरुष व स्त्री एकमेकांवर अवलंबून असतात. त्या दोघांच्या एकरूपतेतूनच एक घटक तयार करून निसर्गचक्र चालवायला मदत करणे; दोघांनीही एकमेकांची मदत घेऊन जीवनाचा आनंद लुटत, जीवनात पुरुषार्थ दाखवत, वासना व दुसर्‍याच्या बंधनांपासून मुक्त होणे; हाच जीवनाचा उद्देश आहे. समाजात दिवसेंदिवस लग्न न करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, स्त्रीला दिवस गेल्यावर स्त्री-पुरुष वेगळे व्हायचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काळ- वेळ-वय-प्रकृती यांचे बंधन न पाळता केवळ शरीरसुखापुरतेच एकत्र येऊन केलेले हे सर्व पूर्वायुष्यातील प्रकार अपत्यप्राप्ती हवी असे ठरविल्यानंतर कुठले परिणाम दाखवतील आणि कशा प्रकृतीचे व प्रवृत्तीचे अपत्य जन्माला येईल, याचा नेम नसतो. त्यावर उत्तर शोधताना मती गुंग होते. हा प्रकार जगात सर्व ठिकाणी अधिकाधिक प्रमाणात प्रत्ययाला येत आहे. अशा वेळी संस्काराचे महत्त्व वादातीत ठरते. मुलांमध्ये काही दोष उत्पन्न झाले, तर आई वडिलांचे आयुष्य व मेहनत अशा मुलाला मोठे करण्यातच खर्ची पडते. त्याउलट जर आरोग्यवान, बुद्धिमान, संस्कारित मुले जन्माला आली तर सर्व काम सोपे होऊन समाजाला उपयोगी घटक तयार होतात. हे संस्कारशास्त्र तयार करताना आयुर्वेदाने जीवनाच्या सर्व अंगाना उपयोगी पडणार्‍या शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक घटकांचा ऊहापोह केला गेला. त्यामुळे गर्भ राहण्यापूर्वीची प्रकृती व तयारीवर विशेष भर दिला. एखादी लहानशी गोष्ट करतानाही काही तयारी करणे आवश्यक असते. लग्न करून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू लागणे ही काही गर्भधारणेची तयारी असू शकत नाही. कुठलीही तयारी न करता आलेल्या अनाहूत पाहुण्याला तोंड देताना तारांबळ उडण्याची परिस्थिती न येण्यासाठी "आपल्याला मूल हवे' हे योजनापूर्वक ठरवून नंतरच नवागताला बोलवावे हा साधा व सरळ शिष्टाचार वाटत नाही का? त्यानंतर दिवस राहिल्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव गर्भाच्या किंवा मातेच्या आरोग्यावर जन्मभर दिसणार त्या गोष्टींकडे लक्ष देऊन तसे संस्कार करून द्यायला नकोत का? दवाखान्यात आलेल्या बायकांना पाहिले असता बर्‍याच वेळा त्यांच्या त्रासाची सुरुवात बाळंतपणानंतर झालेली आढळून येते. याचा अर्थ बाळंपणानंतर योग्य काळजी न घेण्याने वात असंतुलित झाल्याने, हॉर्मोन्सचे असंतुलन झाल्याने स्त्रीच्या शरीरात नाना तर्‍हेच्या विकृती तयार झालेल्या आढळून येते, एवढेच नाही तर अपत्याच्याही शरीरात विकृती निर्माण झालेल्या दिसून येतात. वास्तविक पाहता, पोटात नऊ महिने गर्भ सांभाळणे हा एक आनंदाचा व उत्सवाचा काळ आहे. घरात दहा दिवस गणपती बसविल्यास, नवरात्र बसविल्यास किंवा सात दिवसांचे एक सेमिनार (ज्ञानशिबिर) आयोजित केल्यास जसे नियमात राहावे लागते, तसेच गर्भारपणाच्या नऊ महिन्यांच्या काळात काही पथ्ये पाळावी लागतात. तसेच गर्भधारणा झाल्यावर एका वेगळ्याच दिनचर्येचे पालन करायला नको का? काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते. डोहाळजेवणाच्या वेळी स्त्रीला ओवाळण्याची पद्धत असते. आज जगातल्या सर्व ध्यानपद्धतींत, आध्यात्मिक आचारसंहितेत, ईश्वरी वास असलेल्या जागेत दिवा लावण्याची (मग ते निरांजन असो वा मेणबत्ती) पद्धत आहे. ओवाळताना दिव्यावर होत असलेल्या त्राटकाने शरीरातल्या शक्तीला कशी उत्तेजना मिळते, मन कसे प्रसन्न होते, मेंदूचे द्वार असलेल्या आज्ञा चक्रातून हा संदेश (सिग्नल) आत गेल्यावर मन कसे प्रसन्न होते हे वैज्ञानिकांनाही पटलेले आहे. तेव्हा "ओवाळणे' ही एक भारतीय बुरसटलेली कल्पना आहे असे न मानता, अशा गोष्टींचा अवलंब करणे इष्ट नाही का? पोटात मूल वाढत असताना कोणती औषधे घ्यावीत, जी उष्णता वाढविणार नाहीत, याची काळजी गर्भारपणात घ्यायला नको का? जन्मजात मुलाच्या अंगावरील त्वचेवर पुरळ (रॅश) असणार नाही, त्याच्या हृदय वगैरे अवयवात काही दोष असणार नाही याची काळजी गर्भारपणातच घेणे आवश्यक असते. गर्भारपणाच्या आधी पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा करून दांपत्याने तयारी केली असल्यासच पुढे चांगले परिणाम दिसतात. "फेमिनाईन बॅलन्स' सारखे संगीत ऐकल्याने सर्व शरीराचे संतुलन होऊन गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळ्यांवर सुपीक जमीन तयार होऊन गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे. सध्या घरात फारशी कोणी वडीलधारी मंडळी नसतात. गर्भ राहिल्यावर काय करावे, मुलाला कसे वाढवावे, मसाज कसा करावा वगैरे गोष्टी नवदांपत्याला माहीत नसतात. पण याचे शिक्षण घेणे आवश्यक नाही का? नोकरी-धंदा करण्यासाठी व पैसा कमविण्यासाठी आपण सर्व तर्‍हेचे शिक्षण घेतो पण जीवनोपयोगी व कुटुंबास आवश्यक असणारे वंशवृद्धीचे हे शिक्षण घेणेही आवश्यक नाही का? आपल्या घरात वडीलधारी मंडळी वा फॅमिली डॉक्टर असतात तशाच पद्धतीने या सर्व संस्कारांची माहिती आधुनिक पिढीला मिळाली तर खूप उपयोग होऊ शकेल, फॅमिली डॉक्टर हा जसा कुटुंबाचा सल्लागार असतो तसे जीवनाच्या या महत्त्वाच्या अंगांची विस्तृतपणे माहिती व कौटुंबिक मार्गदर्शन देणारे आहे हे "गर्भसंस्कार पुस्तक'. आयुर्वेदाने सांगितलेल्या गर्भसंस्कारांबरोबरच संगीतशास्त्र, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा इतर शास्त्रांनी या विषयात सांगितलेले आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकात विचारात घेतले आहेत. खरोखर जर काही उपयोग व्हायचा असला तर सर्वांचाच हातभार लागायला हवा. सध्या आपण आढळणार्‍या विकृतींविषयी ओरडत राहतो. गावातल्या महादेवाच्या मंदिरात पाऊस पाडावा या नवसासाठी प्रत्येकाने एक छोटा गडवाभर दूध टाकण्याचे ठरविले. पण गावातील बहुतेक लोकांनी असा विचार केला की "मी एकट्याने पाणी टाकले तर इतरांनी टाकलेल्या दुधात समजून येणार नाही', पण अशा प्रवृत्तीमुळे सकाळी सर्व गाभारा निव्वळ पाण्याने भरलेला दिसला. आज समाजात काहीसे असेच चित्र दिसते. प्रत्येक व्यक्ती ओरडते की आज जीवन बिघडलेले आहे, भ्रष्टाचार व हिंसाचार वाढला आहे, पण असे होण्यामागे जबाबदारी सर्वांचीच आहे. समाज ज्या व्यक्तींमुळे बनतो त्या व्यक्ती सुदृढ व संस्कारसंपन्न निर्माण झालेल्या तरच समाज चांगला होईल. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल.
- डॉ. श्री बालाजी तांबे आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला ४१० ४०५
Other Links:

Write your review for this book

Other works of बालाजी तांबे
   चक्र सुदर्शन
   स्वास्थ्याचे २१ मंत्र भाग १

Similar books:
  आरोग्य
   वंशवेल
   घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
   आयुष्मान भव !
   गुणकारी आहार
   निरामय कामजीवन
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.