|
कायमचे प्रश्न
Author: रत्नाकर मतकरी
Publisher: मनोविकास प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: साहित्यसूची डिसेंबर २०११ आपल्या सामाजिक बांधिलकीपेक्षा आपलं लेखक किंवा कलावंत असणं कधीच मोठं न वाटणारे काही मोजकेच लेखक-कलावंत आहेत. त्यात रत्नाकर मतकरी हे आजच्या काळातले अग्रगण्य नाव आहे. अप्रामाणिकपणाची चीड रन्तात भिनलेल्या मतकरींनी आपल्या सामाजिक-राजकीय नुकसानीची पर्वा न करता वेगवेगळया सामाजिक-राजकीय विषयावरील वैचारिक बांधिलकी स्पष्ट केली आहे. मतकरींनी वेगवेगळया प्रश्नांचा जागल्याच्या भूमिकेतून घेतलेला धांडोळा लेख, भाषणांच्या स्वरूपात यापूर्वी प्रसिद्ध झाला आहे. मुकुंद कुळे यांनी असे निवडक २५ लेख संपादित करून कायमचे प्रश्न ह्या पुस्तकरुपात वाचकापुढे आणले आहेत. हे लेख गेल्या काही वर्षात लिहिलेले असले, तरी त्यातील ठुसठुसणारे प्रश्न अजूनही तसेच कायम आहेत. हे प्रश्न नजीकच्या भविष्यात तरी निकाली लागतील अशी शन्यता कमी आहे, त्यामुळे मतकरींचे लेख सार्वकालिक राहणार आहेतर्आजकीय-सामाजिक व साहित्यिक-सांस्कृतिक असे पुस्तकाचे दोन भाग केले आहेत. राजकीय- सामाजिक भागातील सुरुवातीच्या लेखात भारतीय लोकशाही, आपल्या निवडणुका, दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारची भूमिका यावर मार्मिक टीकाटिपणी केली आहे. हे सगळं वाचल्यावर जगातील सर्वांत मोठी लोकशाही अशी बिरुदावली मिरवणारी लोकशाही खरोखरच "ऑम्ह द पीपल, बाय द पीपल अॅण्ड म्हॉर द पीपल" आहे का असा प्रश्न पडतो. गेली पंचवीसएक वर्षं चालू असलेल्या नर्मदा बचाव आंदोलनकर्त्यांची बाजू पटल्याने मतकरींनी एक ठाम भूमिका घेऊन लिहिलेएले लेख वाचल्यावर एकंदरीतच धरणग्रस्तांच्या जटिल प्रश्नांकडे नव्याने लक्ष वेधलं जातं. साहित्य संमेलन भरवण्यासाठी सरकारी/प्रयोजकांची मदत घ्यावी किंवा नाही, राजकीय मंडळींची उपस्थिती ह्यासारख्या नियमितपणे चर्चिल्या जाणार्या विषयांवरील मते मतकरींनी विविध व्यासपीठांवरुन मांडली आहेत. साहित्यिकांचं राजकारण व त्यांचं मिधेपण याबद्दल असलेल्या तीव्र चिडीमुळे त्यांनी आपल्या भाईबंदांनाही म्हटकारलं आहे. बाल साहित्य, मायबोली टिकवणे, मराठी प्रकाशन व्यवसायाच्या भवितव्याची असलेली काळजी त्यांच्या लेखातून प्रतीत होते. सरतेशेवटी एक मुंबीकर ह्या नात्याने गेल्या पाच दशकात झालेले बदल टिपून पुढच्या पिढीकरता उद्याच्या गर्भात काय असेल ह्याची चिंता ते व्यक्त करतात. -- अरविंद आपटे
Other Links:
|
 |
 |
|