|
वकिल्या पारधी
Author: लक्ष्मण गायकवाड
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
|
|
Price: $6.26 $5 20% OFF ( ~261 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आपल्या देशातून गोरे इंग्रज तर गेले म्हणतात. पण कैदखान्यात डांबून ठेवलेल्या आपल्या पारधी लोकांना का सोडत नाहीत? आपण तर जमीनदार देशमुखांपेक्षाही गोर्या इंग्रजांच्या विरोधात खूप मोठा लढा दिला. त्या गोर्यांना सळो की पळो करून जंगलातून आपण पिटाळून लावायचो. म्हणून गोर्या इंग्रजांनी आपल्यावरती डाव उधळला. जंगलात राहणार्या सर्व आदिवासी पारध्यांना बायका-लेकरांसहीत बंदी करून रेल्वेच्या अन झाडं कापण्याच्या कामाला लावलं, गुराढोरांसारखं आपल्याला बदडून काढलं. बाजीराव देशमुखांना आणि त्यांच्या जनतेला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात. आता सर्व सरकार त्यांच्या हातात आलं असं म्हणतात. मग आम्हाला अजून स्वातंत्र्य का मिळत नाही ? ...आमच्या जंगलात राहणार्या आदिवासी पारध्यांना गोर्या इंग्रजांनी कैद केलं होतं. आता ते गेल्यानंतरही आम्हांला का सोडत नाहीत? ... नाना पाटलांना इंग्रजांच्या विरोधात लढा दिला म्हणून वाजतगाजत स्वातंत्र्यसैनिक म्हणून जेलच्या बाहेर सोडून दिलं आणि माझ्या भावाला, काळविट्याला, मात्र चोर गुन्हेगारीचा कायदा लावून जेलमध्ये ठेवलं. दोघेही गोर्या इंग्रजांच्या विरोधात लढत होते. नाना पाटलांना मात्र स्वातंत्र्यसैनिक म्हणून मानसन्मान मिळाला- आता ता तिकडला मोठा मंत्री आहे आणि माझा भाऊ काळविट्या मात्र जातीच्या नावाखाली चोर गुन्हेगारीच्या शिक्षा भागत जेलमध्ये पडला आहे. आपल्या भारत देशाला कसलं स्वातंत्र्य मिळालं आहे, हे माझ्या अजूनही लक्षात येत नाही. देश स्वतंत्र झाला असं म्हणतात, पण अजून माझ्या बायको-मुलांचा शोधही नीट लागत नाही. ते कुठे आहेत याचा पत्ताही लागत नाही. आपल्या पारधी आदिवासींना सोडायचं तर आणखी खूपच दूर आहे.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार २ नोव्हेंबर २००३
पारधी- एक वास्तव
'उचल्या'मुळे लक्ष्मण गायकवाड सानथोर सार्यांच्याच परिचयाचे आहेत. आदिवासी, भटकया विमुक्त जमातींना इंग्रज सरकारने सरसकट चोर ठरवले आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही या जमातींना मुख्य प्रवाहात सामील करुन घेता येणे प्रस्थापितांना शकय झाले नाही. लमाण-पारधी-वडार या जातींसाठी लक्ष्मण गायकवाड यांच्यातला कार्यकर्ता काम करत असतो आणि त्यांच्यातला लेखक त्यांच्या वेदनेला शब्दरुपाने तोंड फोडत असतो. 'वकिल्या पारधी' हे असंच एक पुस्तक पारधी जमातीच्या वास्तव समस्यांना शब्दरुप देणारी कादंबरी आहे.
ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी आणि लक्ष्मण गायकवाड यांनी मिळून पारधी समाजाचे बराच काळ सर्वेक्षण केले. या निमित्ताने, प्रत्यक्ष त्यांच्यात वावरल्याने प्रस्तुत कादंबरीतील वर्णने प्रत्ययकारी उतरली आहेत. आपण केवळ पोटासाठी झगडत असताना आपल्यावर चोर असल्याचा शिकका का, या प्रश्नाने हा समाज त्रस्त झाला आहे आणि त्याचे प्रतीकस्वरुप वकिल्या पारधी आहे. प्रारंभीची, शिकारीची वर्णनं, त्या शिकारीचाच सण साजरा करणं, देवीची यात्रा, त्यांच्या तांड्याचा रात्रीच्या अंधारातला प्रवास या सर्वांमधून पारध्यांच्या राहणीमानाची यथास्थित कल्पना लेखक वाचकाला देतो. या पारध्यांची नावं मोठी गमतीशीर- रातपळ्या, वाघाअवळ्या, लगमण्या, बिरडीस, टरंग्या, मानकाप्या, तलवार्या हे पुरुष तर जळन, हरणी, बकरी या त्यांच्या बायका. कोडीयारा ही पारध्यांची देवी. त्यांचीभाषासुद्धा नककीच वैचित्र्यपूर्ण असणार. हीती मात्र लेखकाने संवादापुरतीही वापरलेली नाही. ती कळायला अनघड, हे मान्य केले, तरीही पारध्यांच्याही तोंडची पांढरपेशी बोली थोडी खटकतेच. त्यांच्या बोलीतले काही खास शब्द अधूनमधून पेरले गेले असते, तर त्या भाषेचा लहेजाही जाणून घेता आला असता.
भाषेमुळे निवेदन अगदीच त्रयस्थ वाटत असलं, तरीही पारधी जीवनातील आचार-विचार, प्रथा, समजुती यांचे अत्यंत जवळून दर्शन लेखकाने घडवले आहे. उपासमार होऊ नये, म्हणून पारध्यांनी घरात घोरपडी बांधून ठेवणं 'सुसंस्कृत मध्यमवर्गीयांना' पटवून घेणं थोडं जडच जातं. पण कागदी घोडे नाचवणार्यांनी तोंडी शब्दांची किंमत जाणणार्या या पारध्यांना त्यांच्याच शब्दात कसं अडकवलं, ज्यांना चोर ठरवून जातीबाहेर ढकललं, त्यांचा धर्माधिष्ठित राजकारणासाठी कसा वापर करुन घेतला, त्याची ही कहाणी आपण वाचायला हवी.
|
 |
 |
|