|
आधुनिक चीनचा चकवा
Author: सी. पं. खेर
Publisher: दिलिपराज प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~260 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: हे पुस्तक भारताचा शेजारी असलेल्या चीनविषयी विविध माहिती देणारे आहे. चीनचा इतिहास, त्या देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा वेध घेत महाशक्ती म्हणून जगाच्या नकाशावर उभे असलेल्या या महाकाय देशाविषयी अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात करण्यात आलेले आहे. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून लिहिलेले हे पुस्तक चीनविषयी माहिती जाणून घेणार्यांसाठी उपयुक्त ठरेल.
लोकसत्ता रविवार, २९ फेबरुवारी २००४
चीनच्या बदलत्या 'स्व'रुपाचा वेध
'आधुनिक चीनचा चकवा' हे सी. पं. खेर यांचे पुस्तक भारताचा शेजारी आसलेल्या चीनविषयी विविध माहिती देणारे आहे. चीनचा इतिहास, त्या देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडी यांचा वेध घेत महाशक्ती म्हणून जगाच्या नकाशावर उभ्या असलेल्या या महाकाय देशाविषयी अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून लिहिलेले हे पुस्तक चीनविषयी माहिती जाणून घेणार्यांसाठी उपयुकत ठरेल. आज जगात एक बलाढय देश म्हणून उभ्या राहिलेल्या चीनने अमेरिकेसारख्या राष्ट्रपुढेही आव्हान उभे केले आहे. 'वरवर व्यापारी सलोखा दाखवीत चीन अमेरिकेला चकवीत राहिला आहे आणि चीन आधिक प्रबळ होणार नाही, यासाठी अमेरिका आपल्या सोंगटया हलवीत आहे,' असे मत व्यक्त करुन चकवाचकवीचा हा खेळ सूचित करणे हा 'आधुनिक चीनचा चकवा' हे शीर्षक पुस्तकात देण्यामागचा हेतू आहे, असे लेखकाने स्पष्ट केले आहे.
या पुस्तकातील विविध प्रकरणांच्या माध्यमातून भारत-चीन सांस्कृतिक संबंध, चीनमध्ये १८०० ते १९४९ पर्यंत झालेल्या राजकीय घडामोडींचा मागोवा, प्रजासत्ताक चीनची राजकीय जडणघडण, चीनचे परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, त्या विकासासाठी हाती घेतलेल्या विविध विकास योजना आणि उपकर्म, वित्तीय सुधारणा आदींची विस्तृत चर्चा लेखकाने केली आहे. भारताशी अगदी दोन हजार वर्षांपेक्षा आधिक काळापासून ज्या चीनचा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात संबंध होता त्या चीनशी भारताचे संबंध कसे होते, हेही या पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. १९५५ च्या बांडुंग परिषदेत पंचशील तत्त्वांचा स्वीकार करणार्या चीनने 'हिंदी चिनी भीभी'चा नारा देत भारतावर १९६२ साली कसे आक्र्मण केले, याचा इतिहास या पुस्तकात वाचल्यावर मिळतो. भारत आणि चीन, चीन आणि तिबेट यांमधील वादांचे स्वरुप यांची माहितीही पुस्तकात आहे.
चीनमध्ये १८०० ते १८९६, १८९८ ते १९३७, १९३७ ते १९४९ यादरम्यान ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्यांचे विवेचन स्वतंत्र प्रकरणांद्वारे या पुस्तकात करण्यात आले आहे. भारत आणि चीनमधील संबंधाबाबत जाणून घेण्याची जशी भारतीय वाचकांस उत्सुक्ता आसते, तशीच उत्सुक्ता १९८९ साली बीजिंगमधील तायनानमेन चैकात विद्यार्थ्यांचे जे आंदोलन झाले, त्या आंदोलनाबाबत जगभरात ज पडसाद उमटले, ते जाणून घेण्याचीही आसते. राजकीय विभागांतर्गत एका स्वतंत्र प्रकरणाद्वारे ३ आणि ४ जून १९८९ या दोन दिवसांत झालेल्या त्या आंदोलनाची व आंदोलन चिरडून टाक्ण्यासाठी चीनच्या राजवटीने उचललेल्या पावलांची तपशिलात माहिती वाचावयास मिळते.
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयी माहिती देणारे एक स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. त्यात चीन-सोव्हेति संघ संबंध, चीन-आमेरिका संबंध, चीन-पाकिस्तानि संबंध यांची चर्चा आहे. 'भारत-चीन राजकीय संबंध' या प्रकरणात भारत-चीन दरम्यानचे वादाचे मुद्दे चर्चिले आहेत. अक्सी चीन, मॅकमॅहॉन रेषा, चीनचे १९६२ साली भारतावरचे आक्र्मण, त्याचा हेतू, भारतामधील साम्यवादी पक्ष, नक्षलवादी चळवळ आदी विषय लेखकाने हाताळले आहेत. चीनच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय उत्कर्षाचा वेध घेत घेत 'कम्युनिस्ट चीन ढासळणार काय ?' या प्रश्नाची चर्चा या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात लेखकाने केली आहे. एकूणच चीनचा अभ्यास करु इच्छिणार्यांसाठी खूप काही माहिती या पुस्तकात आहे. चीनच्या अभ्यासकांसाठी उपयोगी ठरेल असे हे पुस्तक आहे.
दत्ता पंचवाघ
|
 |
 |
|