|
रेषाटन
Author: शि. द. फडणीस
Publisher: ज्योत्स्ना प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~200 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ १३ नोव्हेंबर २०११ फडणीसांच्या ब्रशचे 'रेषाटन' ! -- विनायक लिमये प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांची वाटचाल सांगणारं आत्मकथन वाचकाच्या भेटीला येतंय. आजपर्यंत फडणीस यांच्या चित्रांनी वाचकांना मनसोक्त हसवलं. आता या चित्रांचा आणि चित्रकर्त्यांचा प्रवास या पुस्तकातून कळणार आहे. मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून "जी. डी. आर्ट' (कमर्शियल) ही पदविका उत्तीर्ण झाल्यावर फडणीस यांनी काही काळ मुंबईत विविध जाहिरात संस्थांसाठी काम केलं. त्यानंतर ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरमधून त्यांनी जाहिरात संस्थांची कामं आणि दिवाळी अंकांची कामं सुरू ठेवली होती. हंस प्रकाशनाचे अनंतराव अंतरकर मात्र त्यांच्याकडे व्यंगचित्रासाठी आग्रह धरत असत. अंतरकरांच्या पाठपुराव्यामुळे फडणीस यांनी एक वेगळं व्यगंचित्र काढलं. तो अनुभव त्यांच्या शब्दांतच देणं योग्य ठरेल. ते म्हणतात, ""माझ्या अन्य कामांमुळे मी व्यंगचित्रं काढणं कमी केलं होतं. माझ्या लेखी "छंद' एवढंच अशा चित्रांना स्थान होतं. पण हंस प्रकाशनाच्या अंतरकरांचा माझ्या व्यंगचित्रांबाबतचा पाठपुरावा चालूच होता. अंतरकर यांचा संपादकीय पाठपुरावा विलक्षण होता. त्यांना "मोहिनी' १९५२ च्या दिवाळी अंकासाठी मुखपृष्ठ हवं होतं. मोहिनी हे मासिक त्यांनी नुकतंच सुरू केलं होतं. त्यावर बहुरंगी विनोदी मुखपृष्ठ! त्या वेळच्या बहुसंख्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठ दीनानाथ दलाल, मुळगावकर, पंडित यांसारख्या मातब्बर कलावंतांनी रंगवलेल्या सुंदर ललनांनी सजलेली असायची. काहींवर चित्रतारकांचा लावण्यप्रकाश. विक्रेते व एजंट यांचा विनोदी मुखपृष्ठाबाबत प्रतिकूल अभिप्राय अंतरकरांना माहीत होता. तरीही हा प्रयोग ते करणार होते. खर्चाची जोखीम त्यांची व चित्रपरीक्षा माझी. अशा साशंकतेतच मी "हो' म्हणून कळवलं व कामाला लागलो. प्रयोग असल्यामुळे कच्चं चित्र पाठवलं. सूचनांसह ते माझ्याकडे फेअर करण्यासाठी कोल्हापूरला आलं. त्या चित्रातला तपशील, "एक बसस्टॉप. एक युवती. तिच्या साडीवर मांजराचे प्रिंट्स. बाजूला युवक उभा. त्याच्या मॅनिलावर उंदारांचे प्रिंट्स....' हे चित्र आता अनेकांना माहीत आहे. त्यानंतरच्या काळात माझी तब्येत बिघडली. खरंतर मुंबईहून आल्यापासून तब्येतीच्या तक्रारी चालूच होत्या. अनेक तज्ज्ञांकडून तपासण्या झाल्या. शेवटी अपेंडिसायटीसची शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. ऑपरेशन मिरजेला झालं. ऑपरेशननंतर मी बिछान्यावर पडून होतो. कोणत्याही प्रकारे उमेद वाटावी अशी शारीरिक व मानसिक अवस्था नव्हती. अशा अवस्थेत पडलेलो असतानाच अचानक नानाचा नोकर, कागवाडे, "सकाळ'चा अंक घेऊन समोर उभा. ""पाहा साहेब, तुमचं चित्र छापून आलंय.'' माझं चित्र, आणि सकाळमध्ये? बघितलं तर "दिवाळी अंकांवर दृष्टिक्षेप' या सदरात, मोहिनीवरील उंदीरमांजराचं चित्र लहान आकारात छापलं होतं. अन खाली ओळ होती, "चाकोरीबाहेरचे मुखपृष्ठ'. माझं दिवाळी अंकावरचं पहिलं मुखपृष्ठ, चित्र व श्रेय देणारी ओळ, सर्व अनपेक्षित! घरातली दिवाळी अशी वेगळ्याच प्रकारे साजरी होत होती. साहजिकच, तब्येत झपाट्यानं सुधारली! मिरजेहून कोल्हापूरला पोचलो. अनेक लेखक, प्रकाशक यांच्याकडून मुंबई, पुणे इत्यादी शहरांतून अभिप्राय व कामांबाबत विचारणा सुरू झाल्या. अनंत अंतरकरांनी कळवून टाकलं, "अशी मुखपृष्ठ दरमहा देण्यासाठी तयारीत राहा. मोहिनी दिवाळी अंक १९५२ चे हे मुखपृष्ठ अखेर दिशा देणारं ठरलं एवढं खरं!'' अंतरकरांच्या या आत्मचरित्रामुळे व्यंगचित्रकारांचा संघर्ष आणि त्यांचे कष्ट लोकांसमोर येणारे आहेत. मुळात आपल्याकडे चित्रकार आणि चित्रकलेसंबंधीची पुस्तके कमी आहेत. फडणीस यांचे आत्मकथन नव्या चित्रकारांना प्रेरणा देणारे ठरेल, यात शंका नाही.
Loksatta Review
|
 |
 |
|