|
सृजनाचा मळा
Author: फादर दिब्रिटो
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~140 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: प्रहार २७ जुलै २०१४ शब्दांचं शुचिर्भूत सृजन मानवी देहभोग, माणसाच्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धती, निसर्ग, पशू, पक्षी, सूर्य, आकाश, प्रकाश, काळोख, समुद्र, नदी, बावखल, फुलं, झाडं, चिमण्या, घरटी, मानवी नाती, त्यातील गुंते, सोडवणूक, ताणतणाव असे अनेक विषय त्यांच्या या मळ्यात गळ्यात गळे घालून विहरताना दिसतात. विहरताना अशासाठी म्हणतो की त्यात दु:खाचे अनावश्यक कढ नसतात, तर त्यातून सोडवणुकीचं आश्वासन असतं. त्या सा-या विषयांत आपण गुंतून पडतो, कारण पुस्तकात चर्चिलेल्या विषयांशी आपली नेहमीच कुठे ना कुठे, कधी ना कधी, भेट झालेली असते. रेव्ह. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी, सृजनाचा मळा या ललितलेख संग्रहामधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक आणि तरल भावाविष्कारी माणूस म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. दिब्रिटो हे एरवी धर्मगुरूंची जीवनशैली स्वीकारलेले समाजव्रती आहेत, परंतु त्यांच्या आजवरच्या कार्यपद्धतीनुसार ते स्वधर्माच्या पलीकडे विचार करताना याही पुस्तकात दिसून येतात. अर्थात ललित लेखक म्हणून वावरताना आपल्या दैनंदिन बांधील कामकाजाची वेस ओलांडावी लागते, तीही उचित मर्यादांचे पालन करून, हे पथ्यही फादर दिब्रिटो यांनी पाळलं आहे. त्यामुळे पुस्तकावर त्यांची धर्मगुरूही ओळख नसती, तर अनोळखी वाचकाला ते पूर्णवेळ साहित्यिक असावेत असंच वाटलं असतं. पुस्तकाला सृजनाचा मळा हे नाव देताना लेखकांनी चांगलीच सूचकता दाखवली आहे. त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी गावखेडयाशी जवळीक साधणारी. त्यातून वसईसारख्या निसर्गसंपन्नतेची देणगी लाभलेल्या गावाची पार्श्वभूमी, अशा वातावरणात त्यांचं बालपण आणि तारुण्यातील काही काळ शिक्षण, प्रशिक्षणासाठी परदेशी, परगावी सोडला, तर त्यानंतरचा आतापर्यंतचा काळ वसईतच घालवल्यानंतर त्यांच्यामधील प्रतिभेला सृजनाची वाट नसती मिळाली तरच नवल असतं. दिब्रिटोंचा व्यासंग उच्च दर्जाचा आहे. संवेदनांना आध्यात्मिकतेचं अधिष्ठान आहे. अवलोकनांना तीव्र जाणिवांची सोबत आहे. शब्दांशी असलेलं त्यांचं मैत्र देवाच्या शब्दाइतकंच पवित्र आणि निष्कलंक आहे. त्यामुळेच ते विचारांना शब्दांद्वारे न्याय देऊ शकतात आणि म्हणूनच त्यांचा शब्द न शब्द खरा उतरतो आणि मनाला भिडून जातो. मानवी देहभोग, माणसाच्या अभिव्यक्त होण्याच्या पद्धती, निसर्ग, पशू, पक्षी, सूर्य, आकाश, प्रकाश, काळोख, समुद्र, नदी, बावखल, फुलं, झाडं, चिमण्या, घरटी, मानवी नाती, त्यातील गुंते, सोडवणूक, ताणतणाव असे अनेक विषय त्यांच्या या मळ्यात गळ्यात गळे घालून विहरताना दिसतात. विहरताना अशासाठी म्हणतो की त्यात दु:खाचे अनावश्यक कढ नसतात, तर त्यातून सोडवणुकीचं आश्वासन असतं. त्या सा-या विषयांत आपण गुंतून पडतो, कारण पुस्तकात चर्चिलेल्या विषयांशी आपली नेहमीच कुठे ना कुठे, कधी ना कधी, भेट झालेली असते. बावीस लेखांमधून हे पुस्तक साकारलं आहे. ते लेख विविध नियतकालिकांतून पूर्वप्रसिद्धी मिळालेले आहेत, परंतु पुस्तकरूपात ते एकत्रितपणे भेटल्यानंतरही त्यांच्यातील लय, ताल, तोल कुठेही ढळलेला वाटत नाही. वेगवेगळ्या काळात, मन:स्थितीत हे लेख लिहूनही पुस्तकरूपात त्यांना वाचताना त्या लेखांमधील सातत्याचं कौशल्य वाखाणण्याजोगं आहे. जीवनव्यवहारांशी लेखकाचं इनव्हॉल्व्ह होणं त्या पुस्तकात पानोपानी आढळून येतं. लेखक म्हणतात की, ही अवघी पृथ्वीच सृजनाचा मळा आहे. त्यामुळे त्यांना आलेल्या जीवन व्यवहारातील सारेच अनुभव, अपरिहार्य, म्हणूनच स्वीकारार्ह वाटतात. त्यातूनच त्यांचा सृजन आणि नवनिर्मिती शोधण्याचा ध्यास दिसतो. लेखक संपूर्ण पुस्तकात आश्वासक जरी भासले असले तरी त्यांच्यात एक अवस्थ समाजचिंतक दडलेला आहे, हे पानोपानी लक्षात येतं. रहाटमाळ या लेखात त्यांनी रहाटाचं जिवंत प्रतीक आपल्या जीवनाशी नेऊन भिडवलं आहे. रहाटाभोवती फिरणारं माणसांचं जीवनचक्र आणि त्यातील भावव्यवहार कमालीच्या वेधकपणे चितारले आहेत. रहाट, काळाच्या रेटयात नष्ट झाला, परंतु त्याचं संगीत लेखकाच्या मनाला अंगाई गीतासारखं आजही जोजावत आहे, हेच रहाटाचं सृजन आहे. शब्बाथबद्दल (ज्यू धर्मामध्ये सांगितलेला साप्ताहिक सुट्टीचा दिवस) लेखक म्हणतात की, शब्बाथ म्हणजे विश्रांतीचा दिवस. तो असा की, हा दिवस म्हणजे स्तनपान करताना बाळ जसं क्षणभर डोकं वर काढून मातेच्या तृप्त नेत्रांकडे पाहतं; तो कृतज्ञतेचा क्षण म्हणजे शब्बाथ. लेखकाच्या या कल्पनेला सलाम. कोजागिरीच्या रात्रौत्सवामध्ये चंद्रसूर्यादी ग्रहांचं मानवाशी मैत्राचं नातं उलगडून दाखवून कोजागर्तीचा अर्थही त्यांनी समजावून सांगितला आहे. हे वाचायलाच हवं. एका लेखात पावसाचं वर्णन करताना, अडीच वर्षाची बालिका आपल्या आयुष्यातील पहिलावहिला पाऊस ज्या भान हरपलेपणानं पाहते, हा भाग विलक्षण तरलतेने साकारला आहे. तिचं औत्सुक्य, विस्मय हे अध्यात्माचं उच्चतम शिखर आहे, असं ते लिहून जातात. आणखी एका लेखातील कोकीळकुजनात लेखक प्रभूच्या संगीताची मैफल पाहतात. स्नेहसदनमधील वास्तव्यात लेखकांना पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेता आला. लेखकांनी अनुभवलेली वारक-यांची वारी आणि लेखकांनी केलेली जेरुसलेमची वारी या दोहोंत लेखकांना परमेश्वर-भक्तीचं तेच साधम्र्य आणि सर्व धर्मातील प्रार्थनेची तीच एकवाक्यता आणि एकरूपता जाणवते. जो वर्तमानाचा वारकरी होतो त्याच्या घरात पंढरी साकारते, हा संदेश लेखक देतात. मेघदूत या लेखामधून मानवी जीवनातील प्रीती, विरह आणि त्यातून उद्भवणारे सारेच भावतरंग, मेघ, वृक्ष, पर्जन्य, सौदामिनी अशा निसर्ग प्रतिमांमधून उमटवून दाखवले आहे. जगातील सर्वात मोठं गुरुत्वाकर्षण घराचं असतं असं लेखक आनंदयात्रेत म्हणतात. या आनंदयात्रेत ते असंही म्हणतात की, आपल्याला भेटलेल्या मोठया माणसाचा सहवास आपल्याला आकाशाशी नातं जोडायला शिकवतो. पुस्तकातील असे कित्येक विचार लेखकांनी आपल्याला जोपासायला आणि तपासायला दिले आहेत. या सर्व लेखांच्या शेवटी लेखकांनी चक्क प्रभू येशूशीच संवाद साधला आहे. पुस्तकातील विचारांना आध्यात्मिकतेची जोड असल्यामुळेच आपोआप शेवटी कृतज्ञतेचे हात जोडले गेले आहेत. येशूशी त्यांची झालेली आई म्हणजे बय आणि बाबांकडून झालेली ओळख, पुढे त्यातूनच झालेली धर्मशास्त्राची ओळख आणि मग धर्मगुरूची भूमिका आणि त्यातून झालेलं बायबलचं आकलन.. या सा-याच अनुभवांना आणि साचलेल्या विद्वतविचारांना लेखक फादर दिब्रिटो यांनी ललितवाङ्मयाच्या अंगाने तरीही चिंतनशीलतेचे परिणाम देऊन पेश केलं आहे. ते जरूर वाचायला हवेत.
Other Links:
|
 |
 |
|