|
आमचा बाप आन आम्ही
Author: नरेंद्र जाधव
Publisher: ग्रंथाली प्रकाशन
|
|
Price: $5.51 $4.4 20% OFF ( ~230 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: आमचा बाप आन आम्ही': नाबाद १,६०,०००! वाचन संस्कृती लोप पावत असल्याची ओरड होत असल्याच्या या काळात जिथे, * एखाद्या पुस्तकाची १००० प्रतींची आवृत्ती दोन वर्षांत विकली गेली तर ते पुस्तक यशस्वी झालं असं मानण्यात येतं. * पंधरा-वीस आवृत्त्या निघाल्या म्हणजे आकाशाला हात लागले असं वाटतं आणि एखाद्या पौराणिक कथेवर आधारित कादंबरीच्या पन्नास वर्षांत तीस-पस्तीस आवृत्या निघाल्या तर वर्तमानपत्रांतून अग्रलेख लिहिले जातात. त्याच सध्याच्या काळात, * एखाद्या मराठी पुस्तकानं देशी-विदेशी १७ भाषांमध्ये अनुवादित होऊन जगभरात केवळ वीस वर्षांत तब्बल ६ लाख प्रती विकल्या जाण्याइतके घवघवीत यश मिळवावे; * अमेरिकेत ते पुस्तक लिलाव बोलीनं विकलं जावं आणि त्यातून अॅडव्हान्स रॉयल्टी म्हणून लेखकाला ४० लाख रुपये मिळावेत, आणि सर्व देशी-विदेशी भाषांमधल्या प्रकाशनातून लेखकाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रॉयल्टी मिळावी. हे कोणाला सांगून तरी खरं वाटेल काय? हा चमत्कार घडवला आहे तो, 'आमचा बाप आन आम्ही' या पुस्तकानं! 'आमचा बाप आन आम्ही' २ डिसेंबर १९९३ रोजी प्रसिद्ध झाले आणि प्रकाशनाच्या दिवशीच एक हजार प्रतींची पहिली आवृत्ती संपून जाण्याची मराठी साहित्यामध्ये अशक्यप्राय समजली जाणारी घटना घडली. त्यानंतर आवृत्ती मागून आवृत्तीचा ओघ अव्याहतपणे चालू राहिला आहे. विशेष म्हणजे हा वेग चढत्या क्रमाने गेली वीस वर्षे कायम राहिला आहे आणि आता तर दर महिन्याला किमान एक आवृत्ती अशा वेगाने आमचा बाप आन आम्ही मराठी वाचकांमध्ये पसरत आहे. महाराष्ट्रात तर वाचणारं असं एकही घर नसेल की जिथे आमचा बाप आन आम्ही पोहोचलेले नाही. आजपर्यंत मराठीत १ लाख ६० हजाप प्रती विकल्या गेल्या आहेत. ही १६१वी ऐतिहासिक आवृत्ती! 'आमचा बाप'मुळे गेल्या दहा वर्षांत मला एक कोटी रुपयांचे मानधन मिळाले, हेही सौजन्य बाजूला ठेवून, यानिमित्ताने सांगावेसे वाटते. (त्यामुळेच तर २००६ साली अफगाणिस्तानातली वर्षाकाठी सव्वा कोटी रुपये देणारी नोकरी सोडून ९०-९५ टक्के वेतन कपात स्वीकारून पुणे विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून येणे मला शक्य झाले.) नव्या उमेदीच्या मराठी लेखकांसाठी ही बाब नक्कीच आशादायी ठरावी. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावरील पथिक अशा आम्हा जाधव कुटुंबातील सदस्यांच्या यशस्वी संघर्षाची ही कहाणी सच्च्या दिलाने मांडण्याचा मी प्रयत्न केला. लेखक म्हणून समाजाच्या सर्व स्तरातील मराठी वाचकांच्या घराघरात मला स्थान मिळाले, याचा आनंद शब्दातीत आहे. जोपर्यंत आई-बापा'च्या श्रद्धेभोवती आपली संस्कृती केंद्रीत आहे, तोपर्यंत आमचा बाप' घराघरात वाचले जाईल, यात तिळमात्र शंका नाही. आज १६१व्या आवृत्तीनंतरही हा विश्वास मनात पक्का आहे. कोणतेही काम करताना त्याच्यात टॉपला जाण्याची प्रेरणा देणाच्या आमच्या बापाभोवती केंद्रीत असलेल्या या पुस्तकाला मराठी वाचकांनी साहित्य संस्कृतीत टॉपला' नेलं. आमचा बाप'ला मिळालेल्या अफाट प्रतिसादामुळे आणि लोकप्रियतेमुळे आम्ही सारे जाधव कुटुंबीय भारावून गेलो आहोत. व्यक्तीश: मला केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान तर वाटतेच, परंतु त्याबरोबरच वाचकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांमुळे नव्या जबाबदारीची जाणीवदेखील निर्माण झाली आहे. हे पाथेय सोबत घेऊन, सामाजिक भान सतत जागृत ठेऊन, पुढील वाटचाल करायची आहे. यापुढेदेखील वाचक आमचा बाप आन आम्ही'वर आणि पर्यायाने लेखक म्हणून माझ्यावर असंच उदंड प्रेम करीत राहतील, हा आशावादच नवनव्या लिखाणाची मला सतत प्रेरणा देत राहील. माझ्या तमाम मराठी वाचकांना माझा कृतज्ञतेचा सलाम! - डॉ. नरेंद्र जाधव नवी दिल्ली २८ मे २०१३ =========== 'आंधळ्या' राहीआजीच्या 'दूर'दृष्टीस, 'अशिक्षित' दादांच्या 'बौद्धिक' प्रगल्भतेस, आणि आई 'सोना'बाईच्या वाट्याला आलेल्या 'गरिबी'च्या चटक्यांस ... -- जगप्रसिद्ध अर्थविशारद डॉ. नरेन्द्र जाधव
|
 |
 |
|