|
ओअॅसिसच्या शोधात
Author: फादर दिब्रिटो
Publisher: राजहंस प्रकाशन
|
|
Price: $7.61 $6.08 20% OFF ( ~280 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: मानवी अस्तित्वाचा मूलाधार कोणता, अशी जिज्ञासा दिब्रिटो यांच्या मनामध्ये जागी झाली आणि तिचा शोध घेण्यासाठी त्यांनी पश्चिमेकडे प्रथान केले. प्राचीन आणि अर्वाचीन यांचा संगम साधणा-या युरोपीय भूमीवर ते मुक्तपणे हिंडले. त्या परिक्रमेचा हा आशयगर्भ आलेख. भेटणा-या माणसांशी संवाद करताना दिब्रिटो तटस्थ, कोरडे रहात नाहीत. ते त्यांच्या व्यथावेदनेशी सहजपणेच समरस होऊन जातात. एवढे भावबळ फारच थोड्यांना लाभलेले असते. म्हणून हे पर्यटन हौसेमजेसाठी केलेली मुशाफिरी ठरत नाही. त्याला भावोत्कट यात्रेचे एक निराळेच परिमाण प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्या व्यक्तित्वाची ही विशेषता इथे पानोपानी प्रत्ययास येते; वाचकाला खिळवून ठेवते.
Review courtesy of Maharashtra Times: २९एप्रिल२००१ मराठी मनाने केलेला युरोप प्रवास - जॉन कोलासो
भारतीय संस्कृतीने ओतप्रोत भरलेले मराठी मन घेऊन जगप्रवासाची भरारी मारली, तर अपेक्षाभंगच पदरी येईल! फादर फ्रान्निस दिब्रिटो यांच्या इन सर्च ऑफ दि ओअॅसिस या पुस्तकात अपेक्षाभंगाचे अनुभवच अधिक वाचायला मिळतात. मुळात त्यांनी लिहिलेल्या ओअॅसिसच्या शोधात या पुस्तकाचा हा इंग्रजी अनुवाद आहे. मराठी मनाला झालेले विश्वदर्शन आंग्लभाषिकांनाही व्हावे आणि दोन संस्कृतींमधील विसंगती त्यांच्याही लक्षात यावी, या हेतूने हा अनुवाद करण्यात आला आहे.
त्यांचा युरोपचा प्रवास रोमपासून सुरू होतो. ख्रिस्ती भाविकांच्या दृष्टीने रोम हे पवित्र शहर. त्याच भावनेने लेखक या शहरात प्रवेश करतो आणि त्याच्या भावनांना तडा जायला आरंभ होतो. रोमन साम्राज्याचे भव्य दर्शन घडविणार्या या शहरातील माणसे अतिशय खुज्या पद्धतीने वागताना दिसतात. इटलीमधील व्हॅटिकन हे पोपचे स्वतंत्र राज्य आहे. या शहराची सुरक्षा व्यवस्था इटलीच्या पोलिसांकडे आहे. परंतु हे पोलिस अत्यंत अकार्यक्षम आणि भ्रष्टाचारी असल्याचे साध्यासाध्या प्रसंगांतून लेखकास दिसून येते. १९८१ साली पोप द्वितीय जॉन पॉल यांच्यावर खुनी हल्ला झाला, तेव्हापासून तेथील सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. परंतु या पोलिसांच्या कार्यक्षमतेत सुधारणा झालेली दिसून येत नाही. ज्या तरुणांना इतरत्र नोकरी मिळू शकत नाही, ते पोलिसांत दाखल होतात, असे लेखकाने म्हटले आहे.
पावित्र्याची जिवंत मूर्ती असलेल्या पोपच्या दर्शनासाठी मिळणारा फुकट पास पर्यटन कंपन्या काळाबाजारात विकतात. गुड फ्रायडेच्या दिवशी पोपच्या राज्यात सार्वजनिक सुट्टी नसते; त्यादिवशी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी उपस्थिती कमी असते.
जर्मनीमध्ये लेखक गेल्यावर तेथील नागरिकांना भारतात ख्रिस्ती धर्म आहे, हे ऐकून आश्चर्य वाटते. त्या देशात पालक आपल्या मुलांना एकटे राहण्याचे धडे लहानपणापासून देतात. तान्ह्या बाळाला रात्री स्वतंत्र खोलीत झोपविण्यात येते. मध्यरात्री रडत असलेले बाळ पाहून लेखकाचा जीव तीळतीळ तुटू लागतो. बाळापेक्षा पती-पत्नीचे संबंध अधिक जपणारे जोडपं पाहून तो अस्वस्थ होतो.
पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, स्लोव्हाकिया या देशांतील संस्कृतीचे दर्शनही लेखकाने घडविले आहे. चर्चमध्ये वेदीसमोर उभे राहून लावण्यात आलेली लग्ने मोडू शकतात; तर लग्न न लावता, एकत्र राहिले तर कोठे बिघडले? घटस्फोट घेताना त्रास नाही, अशी विचारसरणी तरुण-तरुणींमध्ये वाढत असल्याचे पाहून लेखक खिन्न होतो.
हे सर्व अनुभव पाहता युरोपात आदर्श संस्कृतीचा शोध घेणे म्हणजे एक मृगजळच ठरते! पुस्तकाचा हा अनुवाद सरस झाला आहे. या कामी लेखकास रेमंड मच्याडो यांनी सहकार्य केले आहे.
|
 |
 |
|