|
नेत्रस्वास्थ्य साधना
Author: सदाशिव प्र. निंबाळकर
Publisher: योगविद्या निकेतन
|
|
Price: $4.79 $3.83 20% OFF ( ~200 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: योगविद्या निकेतन प्रकाशन नवशक्ती जून २०१२ आयुर्वेद आणि योगविद्या यांचा घनिष्ठ संबंध त्यांच्या पुस्तकात पहायला मिळतो. आयुर्वेद हे माणसाच्या संपुर्ण आयुष्यबद्दल भाष्य करणारी विचारप्रणाली आहे. मग त्यात माणसाचा जीवनक्रम, जीवनकर्म पार पाडताना प्रचलित जीवनशैली आणि त्या अनुषंगाने निर्माण होणार्या समस्या त्याचं निराकरण, उपचार इ. ओघाने आलंच. सध्याच्या वेगवान, स्पर्धात्मक युगात प्रदूषण, संगणिकीकरण, यंत्रयावत जीवनपद्धती अपरिहार्य आहे. अशा अपवर्तनामुळे शरीराचे विशेष करून डोळ्याचे स्वास्थ्य धोक्यात येते. शरीरावर, मनावर ताण निर्माण होतो आणि त्यातून विकृती, आजाराला आमंत्रणच मिळते. ते कसं टाळता येईल हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकामार्फत केला आहे. ते म्हणतात, निसर्ग हा आरोग्य रक्षण करणारा `तसेच बिघडलेले आरोग्य तन्दुरुस्त करणारा किमयागार धन्वंतरी आहे. पुस्तकात प्रथमदर्शनी नेत्ररचना, त्यांचे कार्य यांची मुलभूत माहिती दिली आहे. पटल, नेत्रपटल, भिंग इ. क्लिष्ट भाषेत न सांगता सुलभ सोप्या भाषेत स्पष्ट केले आहे. नेत्ररोगाची मुख्य कारणे (आनुवांशिकता, वातावरण, दुर्घटना) व त्यावर सुलभ योगिक शुद्धीक्रिया, नेत्रावरण, नेत्रस्पर्श, नेत्रप्रक्षालन तसेच नेत्रस्वास्थ्य सहाय्यक योगसाधना, मनोकायिक व्यायाम ह्या उपचारपद्धती नमूद केल्या आहेत. त्यासोबत समर्पक छायाचित्रे जोडण्यामुळे वाचकाला कळण्यास आणि आचरणास सोयीचे होईल.सरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर नेत्र म्हणजे चैतन्ययुक्त जिवंत कॅमेरा याउलट कॅमेरा म्हणजे चित्शवितविहीन निर्जिव यंत्र, मग मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित यात फरक असणारचं. बिघडलेली दृष्टी ही बिघडलेल्या मनाचा परिणाम आहे. मन करा रे प्रसन्न| सर्व सिद्धींचे कारण या संतकवींच्या उक्तीचा प्रत्यय येतो. पुस्तकाच्या शेवटच्या भागात नेत्रसमस्यांचे प्रतिनिधीत्व करणारी प्रश्नोत्तरे वाचकांच्या शंकांचे निरसन करतील. नंतरच्या पृष्ठावर या संदर्भातील इतर पुस्तकांची संदर्भसूची तसचं नेत्रचिकित्सेसंबंधित मराठी, इंग्रजी शब्दसूची दिली आहे. त्याचप्रमाणे योगविद्या निकेतन या संस्थेमार्फत राबवले जाणारे विविध उपक्रम यांची उपयुक्त माहिती दिली आहे. लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे विनासायास भरपूर वाचन, लेखन करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रात कौशल्य मिळविण्यासाठी आणि निसर्गातील विविध रंगांचा, अमाप सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जीवनभर जोपासयला हवे नेत्रस्वास्थ्य.
Other Links:
|
 |
 |
|