|
असा झुंजला हिंदुस्थान ( १९६५- भारत-पाकिस्तान लढाई )
Author: शशिकांत रा. मांडके
Publisher: भारतीय विचार साधना
|
|
Price: $4.11 $3.28 20% OFF ( ~100 Pages, R120)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: इ-सकाळ रविवार, २ ऑक्टOबर २००५ भारतीय सेनेच्या युद्धगाथा (लेफ्टनंट जनरल सतीश सातपुते) खडकवासल्याच्या 'राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी'त १९६१ मध्ये प्रवेश घेतला. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये गोव्याचा मुक्तिसंग्राम झाला व गोवा भारतात समाविष्ट झाला. त्यानंतर लगेचच एन.डी.ए.त शिकत असलेल्या काही कॅडेटसना गोव्यात प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. त्यांच्यात मीही होतो. गोव्यात झालेल्या लष्करी कारवायांचं आणि चकमकींचं प्रत्यक्ष वर्णन एएकायला मिळालं, आणि काही घटनास्थळं पाहायला मिळाली. माझ्या लष्करी कारकिर्दीतील युद्धाची ही पहिली ओळख. पुढच्याच वर्षी, १९६२ मध्ये भारत व चीन यांच्यात युद्ध झालं. या युद्धाच्या वेळी मी एन.डी.ए.मध्ये शिकत होतो. आमचे प्रशिक्षक अधिकारी आम्हाला युद्धाचे वृत्तान्त सांगत असत. त्यातील काहींना युद्धाचा अनुभव होता, त्यामुळे युद्धाची माहिती अधिक जिवंत व प्रभावीपणे आमच्यापुढे येत होती. १९६४ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचा अभ्यासक्रम संपवून मी भारतीय सेनेत दाखल झालो. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात आणि १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात मला सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळाली. १९६५ च्या संग्रामाच्या वेळी माझी सैन्यातील सेवा जेमतेम वर्ष-दीड वर्ष झालेली होती. १९७१ च्या संग्रामात माझा अनुभव सात-आठ वर्षांचा होता. पहिल्या युद्धात मी लेफ्टनंट म्हणून काम केलं. त्यानंतर २००२ मध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमून आले होते. डिसेंबर २००१ मध्ये पाक अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला व परिणामत: लढाईची शक्यता निर्माण झाली. लढाई अगदी जवळ येऊन ठेपली. इतकी, की ती आज सुरू होते की उद्या, अशी निकराची परिस्थिती होती. त्या वेळी मी लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत येऊन पोचलो होतो व एकविसाव्या आघाती कोअर चं नेतृत्व करत होतो. लढाई झाली असती तर माझ्या पंचाएएंशी हजार सैन्यासह पाकिस्तानात मुसंडी मारण्याची जबाबदारी माझी होती.... तथापि ही लढाई टळली, हे आपल्याला ठाऊक आहे. आज हे सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे, आपण लढाया लढलो की त्यातील घटना इतिहासजमा होतात. काही काळानंतर त्यांचे रंग फिकट होतात. ज्या वेळी मी ६५ अन ७१ च्या युद्धांवर होतो, त्या युद्धांत माझ्यावर सोपवलेल्या रणनीतींची व प्रत्यक्ष लढाईची समग्र माहिती मला होती. तथापि संपूर्ण युद्धाची माहिती असणं अवघड होतं. १९६२ चं युद्ध का झालं, त्यातील लढाया कुठं कुठं झाल्या, नंतर १९६५ मध्ये आपल्याला युद्धास पुन्हा का उभं राहावं लागलं, १९७१ मध्ये बांगलादेशाची लढाई का झाली; त्यात आपण कसे जिंकलो, आपल्या सैन्यानं कसं नाव कमावलं, याची कारणमीमांसा आज करायची ठरवली तर दरम्यानच्या काळात खूप काही काळाच्या पडद्याआड गेलेलं असतं. हातात पुरेशी माहिती देणारी साधनसामग्री उपलब्ध होत नाही. प्रत्येक लढाईनंतर पुष्कळ पुस्तकं लिहिली जात असली तरी अशा पुस्तकांचं मंथन करून काही ज्ञानार्जन करणं, महत्त्वाची माहिती मिळवणं हे सामान्य नागरिकांसाठी अवघड असतं, असं मला वाटतं. खरं तर पुस्तकं वाचायची सवयच हल्ली जरा कमी झालीय, नाही का? सखोल अभ्यासासाठी मोठी जाडी पुस्तक लागतील, पण अवांतर वाचनाला पुस्तकं सुटसुटीत हवीत. शाळकरी मुलांना सेनेच्या तिन्ही विभागांविषयी, सैन्यातील धाडसी जीवनाविषयी आकर्षण असतं. त्यांच्यासाठी सुलभ, सोपी पुस्तकं आवश्यक आहेत. अशा वाचनानं मुलांच्या जीवनाला नवी दिशा मिळेल. त्यांची जिज्ञासा, कुतूहल भागवणारी, त्यांच्या मनावर साहसाचे अन मर्दुमकीचे संस्कार करणारी, अशी पुस्तकं त्यांच्यासमोर येणं आवश्यक आहे. शशिकांत मांडके यांनी नेमकी हीच बाब हेरून नुकताच तीन पुस्तकं लिहिली आहेत. १९६२, १९६५ आणि १९७१ च्या तीन लढायांवर ही पुस्तकं आहेत. साधारणत: फक्त सत्तर-एएंशी पानांत प्रत्येक युद्धाची माहिती आटोपशीरपणे आणि कुठलाही महत्त्वाचा संदर्भ न वगळता मांडली आहे. जरूर तिथं छायाचित्रे आणि नकाशेसुद्धा दिलेले आहेत. मांडके यांचा परिवार सैन्याशी जोडलेला आहे. त्यांचे बंधू सुधाकर ऊर्फ लाला मांडके १/८ गुरखा रेजिमेंटमध्ये होते. १९६५ च्या युद्धात खेमकरण भागात लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांचे धाकटे बंधू शरद मांडके यांचे चिरंजीव गौतम २/८ गुरखा रायफल्समध्ये कॅप्टन आहेत व सैनिकी घराण्याचा वारसा पुढं चालवत आहेत... या सैनिकी वातावरणाचा लाभ लेखकाला मिळाला आहे. हातात असलेल्या माहितीतील कोणताही भाग वाचकांपर्यंत कसा पोचवायचा, याचं अचूक भान लेखकानं ठेवलं आहे. प्रत्येक लढाई कशी झाली, युद्धात उतरलेल्या राष्ट्रांच्या भूमिका काय होत्या, लढाया कशा लढल्या गेल्या, हे या पुस्तकांत क्रमवार मांडलेलं आहे. प्रथम चीननं आणि नंतरच्या दोन्ही युद्धांत पाकनं कुरापती कशा काढल्या, याचा व इतर घटनांचा परामर्श यथायोग्य घेतला आहे. भारतीय सेनेनं शाआरYय गाजवलेल्या अनेक घटनांचं चित्रण तिन्ही पुस्तकांत केलेलं आहे. पुस्तकांचं मला आवडलेलं आणखी एक वैशिष्टय म्हणजे, आपल्या देशातील सामान्य नागरिकांनी केलेल्या अमोल सहकार्याचे, त्यागाचे व बलिदानांचे उल्लेख. त्यांच्या यथोचित सन्मानानं पुस्तकांचं मूल्य निश्चित वाढलेलं आहे. पाकिस्तान सीमेवर आपले रणगाडे कूच करत असताना एका शेतकर्यानं रणगाडे आपल्या भरल्या शेतातून नेण्यास सैन्यातील अधिकार्यांना सांगितलं. ''माझ्या शेतातून रणगाडे खुशाल जाऊ दे. पीक तुडवलं गेलं तरी चालेल. पुढच्या सुगीत पुन्हा येईल. आत्ता रणगाडे पुढं जाणं महत्त्वाचं...'' असं सांगून सैनिकांना प्रोत्साहन दिलं, असा एक प्रसंग एका ठिकाणी आहे, व त्याचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. असे प्रसंग वाचताना तरुणांना देशाचा अभिमान वाटेल, त्यांच्या मनातील राष्ट्रप्रेम वाढेल. सैन्यात दाखल व्हावं, अशी भावना जागी होईल. सर्व नागरिकांना, विशेषत: तरुण मुलांच्या पालकांना या पुस्तकांतून सेनेची ओळख होईल, सेनेविषयीचा आदरभाव वाढेल व आपल्या सेनेने लढलेल्या युद्धाचं आकलन होण्यात या पुस्तकांचा हातभार लागेल. शाळकरी मुलं असलेल्या प्रत्येक घरात असायलाच हवीत, अशी आहेत ही तीन पुस्तकं...
|
 |
 |
|