Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)
Author: आसाराम सैंदाणे
Publisher: प्रतिमा प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $22.85 $18.28 20% OFF ( ~560 Pages, R750)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
ई-सकाळ ११ मे २०१४
छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना दिला. त्याचबरोबर जांजरेकर हबशी, गोव्याचे पोर्तुगीज आणि मुंबईचे इंग्रज तसेच स्वार्थांध आप्तस्वकीय यांच्याशी लढून अखेरीस औरंगजेबाचे क्रूर अत्याचार सहन करीत हौतात्म्य पत्करले.

Review courtesy of Loksatta:
ई-सकाळ ११ मे २०१४
शाहूराजांच्या कर्तृत्वाचा वेध
-- डॉ. सदाशिव शिवदे
छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना दिला. त्याचबरोबर जांजरेकर हबशी, गोव्याचे पोर्तुगीज आणि मुंबईचे इंग्रज तसेच स्वार्थांध आप्तस्वकीय यांच्याशी लढून अखेरीस औरंगजेबाचे क्रूर अत्याचार सहन करीत हौतात्म्य पत्करले.
अग्निशिखेला समोर जावे कसा करावा जंग|
सिदी फिरंगी इंग्रज टाके अवाढव्य अवरंग|
झुंज झुंज अन झुंज दिसावी महाराष्ट्राच्या भूमीत|
जिथे जाहले रूधीर पावन हौतात्म्याच्या यज्ञात|
महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांना रायगडच्या वेढ्यातून अतिशय सुज्ञ अशी मसलत करून बाहेर काढलं आणि आपण आपले पुत्र शाहूराजे यांच्यासह कैद पत्करली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी जिंजी येथे राहून सुज्ञपणानं औरंगजेबाच्या सैन्यावर, अडचणींवर मात केली. संताजी व धनाजी यांच्यासारखे मर्दानी सेनापती; प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, अमात्य खंडोबल्लाळ व परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यांच्यासारखी स्वामिनिष्ठ माणसं मिळवली आणि औरंगजेबाला जेरीस आणलं. दुर्दैवाने राजाराम महाराजांचं ३ मार्च १७०० रोजी निधन झालं. त्यानंतर औरंगजेबाला मराठ्यांची पाळंमुळं पूर्णपणे उखडून टाकण्याची खात्री वाटली. मराठ्यांची मर्दुमकी ही गनिमी काव्याच्या कवचात दडलेली आहे, याची जाण धूर्त बादशहाला होती. मात्र, एखाद्या अद्भुतरम्य कथेतील पोपटासारखा मराठ्यांचा राजा महाराष्ट्राबाहेर केव्हाच निघून गेला व जिंजीला पोचला होता. तिथं राहून त्याने आपली राजसूत्रं अशी हलविली, की औरंगजेबाच्या मनोरथाची चाकं महाराष्ट्राच्या मातीत रुतून बसली. मराठ्यांच्या तलवारींना तेज आलेलं पाहून तो दिपून गेला. राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्यावर त्याच्या आशेला पालवी फुटली; पण राजारामाची बायको ताराराणी. रणरागिणी भद्रकालीच्या, महिषासुरमर्दिनीच्या रूपात आपल्यापुढं उभी राहील अशी कल्पनाही त्याच्या डोक्यात आली नाही, अशा वेळी त्या रणचंडिकेचं रूप पाहूनच तो विचलित झाला.
अखेरीस मराठ्यांशी लढता लढता २० फेब्रु. १७०७ या दिवशी औरंगजेब बादशहाचं निधन झालं. त्यानंतर त्याचा मुलगा शहाजादा आज्जम यानं शाहूराजांना कैदेतून मुक्त केलं. महाराणी येसूबाई मात्र पुढे १० वर्षं कैदेतच होत्या. तब्बल तीस वर्षं या महाराणीनं कैदेतच काढली.
१२ जाने. १७०८ रोजी शाहूराजांचा सातारा येथील किल्ल्यावर विधीयुक्त राज्याभिषेक झाला. त्यांनी राज्यसूत्रं हातात घेतली. शाहूराजांनी आपल्या ऋजू स्वभावानं आपल्या काकीशी (ताराराणींशी) आणि आपले चुलत बंधू संभाजीराजे (कोल्हापूर) यांच्याशी समझोत्याचं राजकारण केलं. आपल्या कारकिर्दीत बाजीराव, नानासाहेब पेशवे, सरदार मल्हारराव होळकर, सरदार महादजी शिंदे, गायकवाड, आंग्रे, जाधवराव, दाभाडे यांच्यासारखे शूरवीर निर्माण केले आणि आपल्या राज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं.
दक्षिण दौलत दौडत गेली उत्तरसीमा पार |
शौर्याला ना सीमा उरली उघडे दिल्ली द्वार |
महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात काहीसा संघर्ष निर्माण झाल्यावर ताराराणीनं पन्हाळा येथे आपली राजधानी निर्माण केली. वारणेचा तह झाल्यावर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. गुंतागुंतींचं राजकारण झालं, तरीसुद्धा शाहूराजांनी अतिशय समजूतदारपणानं राजकारण करून पेशव्यांसारख्या मुत्सद्द्यांना आणि अनेक मराठा सरदारांना पराक्रमास वाव दिला व हिंदवी स्वराज्याच्या सीमा दिल्लीपर्यंत पोचविल्या. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहू महाराजांचं निधन झालं. त्यांच्याबद्दल तत्कालीन कागदपत्रांतून अतिशय प्रशंसेचे शब्द वाचण्यास मिळतात, उदा. ...""सातार्‍यास तख्त करून राहिले, तेव्हापासून राज्यकारभार सेवक लोकांपासून, अनेक मसलती व युद्धप्रसंग मोठ्या फौजा पाठवून केले. मनसब्यात बहुत चतुर, सर्व राज्य मोगलाईत गेले होते ते सोडविले. लोक अज्ञेत वागवून नवीन माणसे निर्माण केली... उत्तर देश सोडवून थोरले महाराजांचा उद्देश सिद्धीस नेला. पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस चतु-समुद्र मर्यादा होऊन चहू दिशेचे राज्य एक आज्ञा चालू लागले.
निजाम उल्मुल्काचा नातू मुजफ्फरजंग यास शाहू महाराजांच्या मृत्यूची बातमी समजली. त्या वेळी तो म्हणाला, ""मोगलाईत निजाम उल्मुल्क व मराठे राज्यात शाहूराजे होते. ऐसे माणूस पुढे होणार नाही.'' सर्व राज्य पेशव्यांस सोपवून गेले. छत्रपतींसारखा राजा होणे, राज्य बरे नांदविले. अजातशत्रू होते. ""प्रत्यक्ष रणांगणावर कधीही न उतरता आपल्या सेवकांवर पूर्ण विश्वास ठेवून राज्यवृद्धी करण्याचं काम शाहूराजांनी केलं. माणसांची योग्यता पारखून त्यांच्यावर विश्वास टाकला व अतिशय सौजन्यशील वृत्तीने त्यांनी सर्वांना जवळ केलं. पण, आपला वारस ठरविण्याच्या बाबतीत निर्णय घेताना मात्र ज्या दोन याद्या केल्या, त्याचा थोडा गोंधळ निर्माण झाला हे मात्र खरे !
शाहूराजांनी औरंगजेबाच्या सहवासात १९ वर्षं काढली होती. औरंगजेबाच्या चरित्राचा त्यांनी जवळून अभ्यास केला होता. मोगलांची वृत्ती त्यांनी पूर्णपणे जाणली होती. कोल्हापूरच्या गादीशी तंटे त्यांनी कधीही विकोपास नेले नाहीत, किंबहुना ते सामंजस्यानेच मिटविण्याचे प्रयत्न केले, त्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक हे विशेषण लावलं जातं. त्यांच्या चरित्रावर आजपर्यंत काही चरित्रग्रंथ लिहिले गेले. उदा. छ. शाहू महाराजांचे चरित्र (चिं. ग. कर्वे), शाहू महाराजांची बखर (गो. स. चिटणीस), पुण्यश्लोक शाहू महाराज (गो. स. सरदेसाई), छ. थोरले शाहू महाराज (मुंबई विद्यापीठ प्रबंध), ढरीरलरळ | कशी ढळाशी हा ब्रिज किशोर यांचा लखनौ विद्यापीठातील प्रबंध इ. अशा या ग्रंथांमध्ये आज थोरले छ. शाहू महाराज या ग्रंथाने नवीन भर पडत आहे, ही एक चांगलीच गोष्ट झाली. सैंदाणे यांनी शाहू महाराजांच्या कर्तृत्वाचा समग्र आढावा (थोरले शाहू महाराज, सातारा) या ग्रंथात घेतला आहे. शाहू महाराजांचा कालखंड (१७०८ ते १७४९) असा ४१ वर्षांचा तसा मोठा आहे, अनेक गुंतागुंतीच्या घटनांनी भरलेला आहे. अशा या थोर राजाच्या चरित्राचा आलेख मांडताना काही दोष अनवधानानं राहून गेल्याचं जाणवतं. काही ठिकाणी अन्य लेखकांची जशीच्या तशी वाक्यं व परिच्छेद घेतल्याचं दिसतं. लेखकाने संशोधन पद्धतीचा (Rएसेअर्च मेथोदोलोग्य) अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढील आवृत्तीत सुधारणा होईल असं वाटतं. या चरित्राच्या योगे पुन्हा पुन्हा अशी चरित्रं लिहिली गेली पाहिजेत असं वाटतं, कारण शाहू महाराजांच्या कर्तृत्वामुळे मराठे थेट दिल्लीच्या पुढेही पोचले. उत्तरेकडे मराठी शूरांचा संचार हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड ठरला. पुढे ब्रिटिशांनी भारत देश जिंकला, त्या वेळी त्यांना मराठ्यांशी लढावं लागलं. जी. डब्ल्यू. स्टीव्हन्स आपल्या "यस्टर इंडिया' या ग्रंथात लिहितात, ""...आम्ही हा देश येथील मोगल सत्ताधीशांकडून घेतला नाही. या देशातील सर्व राज्यकर्ते आम्हाला शरण आले. मात्र, मराठ्यांशी आम्हाला लढावं लागलं; आणि मगच आम्ही सार्वभौम सत्ता निर्माण करू शकलो.'' सैंदाणे यांनी शाहू महाराजांवरील हा ग्रंथ अतिशय परिश्रमपूर्वक खुलासेवार व विस्तृतपणानं लिहिला आहे. एकंदर ग्रंथाची रचना, बांधणी, मुखपृष्ठ, ग्रंथातील छायाचित्रं आदी गोष्टींत काहीच उणीव नाही.

Other Links:

Write your review for this book

Other works of आसाराम सैंदाणे
   टेंबे स्वामींचे दिव्य साक्षात्कार
   वृद्धांनी सांगितलेल्या अद्भूत कथा

Similar books:
  इतिहास
   मुस्लिम मनाचा शोध
   श्रीमान योगी
   सिंधी साहित्याचा इतिहास
   शोध महात्मा गांधींचा - भाग १ आणि २
   कान्होजी आंग्रे
   More ...  
  व्यक्तिपरिचय
   दाद
   वपुर्झा
   कोल्हापुरी साज
   गोकर्णीची फुले
   चिअर्स
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.