|
राधाचं घर (सहा पुस्तकांचा संच)
Author: माधुरी पुरंदरे
Publisher: ज्योत्स्ना प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~160 Pages, R225)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: सहा रंगीत पुस्तकांचा संच ====== ह्या घरात राधा तर राहतेच; पण राधाचे आई-बाबा, झालंच तर नाना, आजी आणि काका एवढे सगळे राहतात. शिवाय राधाचा भावसभाऊ गौतम आणि मामेभाऊ तन्मयसुद्धा. म्हणजे ते इथे राहत नसले, तरी नेहमी राधाशी खेळायला येतात, म्हणून तेही ह्या घरातलेच आहेत. अशा ह्या घराच्या इवल्या इवल्या गोष्टी.
आई - कधी कधी कुणी विचारतं, राधे, तू कुणाची? आईची? की बाबाची? की आजीची?... राधा म्हणते, मी सगळ्यांची, पण आई फक्त माझी!!
बाबा - राधाचा बाबा दिवसभर घरात नसतो. पण घरी आला, की राधाशिवाय त्याला मिनिटभरही करमत नाही.
काका - काका म्हणजे वाराच. सारखं इकडून भुर्रर्र, तिकडून भुर्रर्र! तो आपल्यापेक्षा मोठा आहे असं राधाला वाटतच नाही.
आजी - मी तुझ्याएवढी होते नं, राधे .स... आजी असं म्हणते तेव्हा राधा दोन्ही कान टवकारून अन डोळे मोठ्ठे करून छोट्या आजीच्या गोष्टी ऐकते.
नाना - राधाचे आजोबा काही रोज कामाला जात नाहीत. घरातच असतात. त्यामुळे त्यांच्यापाशी राधासाठी केव्हाही आणि कितीही वेळ असतो.
भाऊ - राधाला सख्खं भावंड नाही. पण म्हणून काय झालं! तिचे शनिवार-रविवारचे भाऊ आहेत ना - गौतम आणि तन्मय!
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, १३ एप्रिल २००३
शाळा सुटली, पाटी फुटली...
आत्तापर्यंत बहुतेक मुलांच्या परीक्षा संपल्या असतील आणि चार-दोन दिवस आळसात लोळूनही झालं असेल. सुट्टीचे बेत आखणं चालू असेल. आंब्या-फणसांच्या,जांभळांच्या वासाचेही वेध लागले असतील. या सगळ्या गडबडीत पुस्तकांना नाही ना विसरलात? गोष्टीची पुस्तकं तुमच्या सुट्टीचा मुहूर्त साधत प्रकाशित झाली आहेत. त्या पुस्तकांची ही ओळख-
'राधाचं घर' हा माधुरी पुरंदरे यांनी केलेला सहा पुस्तकांचा छोटासा संच. लिहिलेला नव्हे, केलेला. या प्रत्येक पुस्तकात राधाच्या घरातल्या एकेका व्यक्तीचं राधाच्या नजरेतून केलेलं पोर्ट्रेट आहे. ते शब्दांमध्येही आहे आणि चित्रांमध्येही आहे. ही चित्रंही खास लहान मुलांच्या बर्शमधून उतरल्यासारखी गोड आणि अत्यंत सजीव आहेत. मोजके, अत्यंत समर्पक शब्द आणि थोडकयाच रेषांमधून साकार झालेला हा संच बदलत्या संस्कृतीचा निदर्शक आहे. एकुलत्या एका राधेला आजीच्या लहानपणी तिचे केस खूप लांब होते आणि तिला आणि तिच्या ताईला खूप श्लोक-कविता पाठ होत्या, याचंच अप्रूप वाटतं. तिची मीनाई साडी कवचितच नेसते आणि मधूनच राधाच्या बाबांना अरुण अशी हाक मारते. राधाचा शिदूकाका आजचा 'डांगचिक' नाच करतो आणि त्याच्या मैत्रिणी तिला अजिबात आवडत नाहीत. लहान मुलांच्या विश्वाचं त्यांच्या नजरेतून केलेलं हे चित्रण मोठयांच्याही गालावर हसू आणेल, असं झालं आहे. इंग्रजी माध्यमात शिकणार्या मराठी मुलांना मराठी वाचनाची गोडी लावू शकेल, असं हे पुस्तक झालं आहे.
|
 |
 |
|