|
पांढरे ढग
Author: वि. स. खांडेकर
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $5.82 $4.65 20% OFF ( ~208 Pages, R170)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: या कादंबरीच्या निर्मितीबद्दल खांडेकर म्हणतात, 'माझ्या नजरेसमोर एक कल्पनाचित्र उभे राहिले. त्या चित्रात एकीकडे अगदी विरळ झालेले पांढरे ढग पुसट होत होत अंतराळात दिसेनासे होत होते. दुसर्या बाजूला आपला विक्राळ जबडा पसरून खायला येणार्या राक्षसाप्रमाणे भासणारा एक प्रचंड ढग हळूहळू पृथ्वीच्या रोखाने उतरत होता. दूर दूर जाणार्या त्या काळसर पांढर्या ढगांच्या मागाहून तहानेने व्याकूळ झालेले चातकांचे थवेच्या थवे धडपडत होते. उडू उडून पंख गळून गेल्यावर गिरक्या घेत अचेतन स्थितीत ती पाखरे पृथ्वीवर पडत होती. पण त्या पांढर्या ढगातून त्यांच्यापैकी कुणाच्याही चोचीत पाण्याचा एक थेंबसुद्धा पडला नाही. मात्र त्या थव्यापैकी एकाही पाखराला या निर्जल पांढर्या ढगाचा मोह सोडून क्षितिजाच्या दुसर्या बाजूला दिसू लागलेल्या विक्राळ काळ्या ढगाकडे जावे असे वाटले नाही. त्याच्या भीषण स्वरूपाचीच त्यांना भीती वाटत असावी. त्याच्या विशाल हृदयातून लख्खकन चमकणार्या विद्युल्लतेने त्यांचे डोले दिपून गेले असावेत. पण भित्र्या चातकांची गोष्ट निराळी आणि साहसी गरूडाची गोष्ट निराळी. पृथ्वीवर उतरणार्या त्या काळ्या मेघाकडे एक गरूड मोठ्या उत्कंठेने पाहत होता. असंख्या तहानलेल्या चातकांना ज्या पाण्याची जरूरी होती ते काळा मेघच देऊ शकेल अशी श्र्द्धेची भावना त्याच्या मुद्रेवर विलसत होती. गरुडाच्या मुद्रेवरली ती श्र्द्धा... त्याचा निर्भयपणा... एका क्षणात माझ्या नायकाचे नाव निश्चित झाले... अभय... कादंबरीचे नाव...पांढरे ढग... महाराष्ट्रातल्या सत्वशून्य आणि ध्येयशून्य होत चाललेल्या मध्यमवर्गाचे चित्रण ही कादंबरीची पार्श्वभूमी झाली. या पार्श्वभूमीवर गरीब मध्यमवर्गातला बुद्धीमान, भावनाशील असा अभय मी उभा केला. ज्या मध्यमवर्गात आपण जन्मलो, ज्याच्या विशिष्ट संस्कारात आपण वाढलो त्या वर्गाच्या जीवनविषयक आणि समाजविषयक सर्व कल्पना आता पांढर्या ढगाप्रमाणे झाल्या आहेत अशी मनाची पुरेपूर खात्री होऊन तो नव्या जीवनाकडे वळतो. त्या जीवनाचे स्वरूप अक्राळविक्राळ कृष्णमेघासारखे आहे. क्रांतीची विद्युल्लता त्यांच्यातून पदोपदी डोकावून पाहत आहे. ती कुठे पडेल आणि कुणाकुणाचा बळी घेईल याचा नेम नाही. पण तिच्याच प्रकाशात पुढचा मार्ग शेधण्याकरिता अभय निघाला आहे.'
|
 |
 |
|