Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


गार्डन ऑफ ईडन ऊर्फ साई सोसायटी
Author: मकरंद साठे
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $10.66 $8.52 20% OFF ( ~200 Pages, R350)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
कादंबरीत साठेचा तृतीय पुरुषी निवेदक जे विदारक वास्तव रेखाटतो तो आपला चालू वर्तमानकाळ आपलं समकालीन वाळवंट. ज्यात अनेक काळ बथ्थड गोळ्यांसारखे एकमेकांवर कर्कश्श्पणे आदळत बधिरपणा आणतात. ज्यात विकासापोटी रुंदावणार्‍या आर्थिक दर्‍या समाजाचे समाजपणच भंगवून टाकतात. ज्यात व्यक्तीच्या विखडित अस्मितांचे सैरभैर तुकडे कधी हिंसक झुंडीचे तर कधी व्याकूळ करणार्‍या एकुटवाणेपणाचे रूप घेतात. जिथे वास्तवापासून तुटलेले वर्धित वास्तव सार्वभौम होत जाते. अशा सुपीक वाळवंटात जातीवादाचे-धर्माधतेचे-एकाधिकारशाहीचे जालीम विष हरघडी पाझरत, मुरत. धगधगत राहते. त्यातून दररोज हिंसेची अधिकाधिक क्रूर रूपं साकार हात राहतात. ह्या सुन्न करणार्‍या वाळवंटातील चमचमते मृगजळ म्हणजे गार्डन ऑफ इंडन ऊर्फ साई सोसायटी'; जिच्या सुनसान आवारात हा कादंबरीतील आदी विभिन्न सामाजिक-आर्थिक स्तरांतून येणारी काही प्रमुख पात्रे योगायोगाने एकमेकांना सामोरी जातात.
ह्या उत्तर-आधुनिक वाळवंटाला भिडताना जर व्यामिश्रतेची वा अभिनिवेशाची ढाल पुढे न करता भूमिका घेण्याची जोखीम पत्करायची असेल तर पुन्हा एकवार 'आधुनिकतेला पर्याय नाही' असे साठे सुचवतात. मात्र इथे साठ्यांना आधुनिकतेचा रूढार्थ अभिप्रेत नाही. त्यांना जी अभिप्रेत आहे ती उत्तर-आधुनिकतेनतरची आधुनिकता. ती आपल्या समोरच्या निर्णायक प्रश्नांना स्थल कालसापेक्षतेच्या बचावात्मक मापदंडापलीकडे नेत सार्वत्रिकतेला भिडवू पाहते. सॉक्रटिसप्रमाणे निरपेक्ष सत्याचा आग्रह धरते ती मानवी जीवनाच्या सामाजिक-ऐतिहासिक भौतिक पातळ्या कवेत घेत त्या पल्याडच्या असण्याला स्पर्श करू पाहते. मात्र हे करताना "असण्याच्या" मुळाशी असलेल्या असंगताच्या अनिश्चिततेच्या, अटळ मृत्यूच्या बोद्धदर्शनाने ती कोलमडून जात नाही. "असण्याच्या" मूलभूत वैयर्थतेचा आत्मसन्मानाने स्वीकार आणि या धीरोदात्त स्वीकारासहित स्वातंत्रय-समता-बंधुता हा चिरंतन मूल्यत्रयीवर आधारित सामूहिक मानवी मुक्तीसाठीचा आर्ष, असीम प्रयास म्हणजे "आधुनिकता" अशी मांडणी हो कादंबरी सुचवते. हा सिसिफियन प्रवासाला गूढवादी आत्मिकतेच्या निर्वात पोकळीतून खेचून बाहेर काढत भौतिकतेला भिडवणे हे या कादंबरीचे मोठे यश आणि हा व्यामिश्रवैचारिक पट इथे एखाद्या वाचनीय रहस्यकथेप्रमाणे उलगडतो ही हा कादंबरीची खरी ताकद.

MaTa Review

Write your review for this book

Other works of मकरंद साठे
   आषाढ बार
   मराठी रंगभूमीच्या तीस रात्री (तीन खंड)
   काळे रहस्य
   ऑपरेशन यमू
   अच्युत आठवले आणि आठवण

Similar books:
  कादंबरी
   मृत्युंजय
   श्रीमान योगी
   स्वामी
   पार्टनर
   राधेय
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.