Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


निरामय कामजीवन
Author: विठ्ठल प्रभू
Publisher: मॅजेस्टिक प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $9.59 $7.67 20% OFF ( ~450 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
कामजीवन हे श्र्वसन, पचन, निद्रेसारखेच अगत्याचे; तरीही पर्यावरण, आहार, निद्रेविषयी जितकी जागरूकता आढळते, तितकी कामविज्ञानाविषयी आढळत नाही. विवाह पूज्य, मातृत्व पूज्य पण यातील दुवा म्हणजे कामजीवन हे अश्र्लील मानले जाते.
स्त्री-पुरुष मीलनाचा आनंद घेणे नैसर्गिक असले, तरी त्याविषयी उघडपणे चर्चा करणे शिष्टसंमत नसल्यामुळे कामविषयक परंपरागत अज्ञान व गैरसमजुती आजही टिकून आहेत. ही जळमटे नाहीशी करणारा हा ग्रंथ.
विसाव्या शतकाच्या मध्यानंतर आल्फ्रेड किन्से, डॉ. मास्टर्स व जॉन्सन, डॉ. हेलन सिंगर कॅप्लान यांच्या प्रदीर्घ संशोधनामुळे कामजीवनासंबंधीच्या विचारात जगभर आमूलाग्र बदल घडून आला. कामवृत्ती कामप्रतिसाद, कामअसमर्थता या विषयांची अधिक जाण आली. नपुंसकत्व, शीघ्रपतन, योनिआकर्ष, कामउदासीनता यांसारख्या लैंगिक समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी सुचविलेले उपचार या ग्रंथात दिले आहेत. लैंगिकता शिक्षणावर एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे.
यौवनात पदार्पण, विवाहपूर्व मार्गदर्शन, विवाह, कामक्रिया, विवाहाची अपूर्तता, लैंगिक आगळीक, गर्भधारणा, संततिनियमन, एड्स, गुप्तरोग, जनननिवृत्ती, थोडक्यात-कुमारावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंतची कामजीवनाची संपूर्ण माहिती सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे हे एकमेव संग्राह्य पुस्तक.
लेखकाविषयी डॉ. विठ्ठल प्रभू हे काम-समस्या सल्लागार आहेत. काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अॅण्ड पेरेंटहुड (इंटरनॅशनल) या संस्थेचे ते मानद उपाध्यक्ष व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सेक्स एज्युकेशन, काउन्सेलिंग, रिसर्च, थेरपी केंद्राचे मानद सल्लागार आहेत.
लैंगिकता शिक्षण व आरोग्य या विषयांवर त्यांनी एकूण २५ पुस्तके लिहिली असून त्यातील तीन पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा `उत्कृष्ट मराठी वाङ्मयनिर्मिती पुरस्कार लाभला आहे.
`निरामय कामजीवन व यौवन ते विवाह ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. एवढेच नव्हे तर या पुस्तकांनी विक्रीचा उच्चांक गाठला आहे.
यौवनात पदार्पण, विवाह, कामक्रिया, गर्भधारणा, संततिनियमन, जनननिवृत्ती - थोडक्यात कुमारावस्तेपासून वृद्धावस्तेपर्यंतच्या कामजीवनासंबंधी सोप्या, सरळ, सुबोध भाषेत विवेचन करणारे पुस्तक. नपुंसकत्व, शीघ्रपतन, योनिआकर्ष, कामउदासीनता, यांसारख्या लैंगिक समस्यांसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपचारांचा समावेश.

Write your review for this book

Other works of विठ्ठल प्रभू
   संपूर्ण कामजीवन
   तारुण्याच्या उंबरठ्यावर
   स्नेहबंध
   गोष्ट एका डॉक्टरची
   लैंगिकता शिक्षण - का? कुणी? कसे? किती? केंव्हा?

Similar books:
  आरोग्य
   वंशवेल
   आयुर्वेदीय गर्भसंस्कार
   घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती
   आयुष्मान भव !
   गुणकारी आहार
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.