|
आम्ही चित्पावन
Author: म. श्री. दीक्षीत
Publisher: नीलकंठ प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~160 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: लोकसत्ता रविवार २ नोव्हेंबर २००३ 'आम्ही चित्पावन'च्या निमित्ताने... 'आम्ही चित्पावन' हा चित्पावन ब्राह्मणांसाठी व इतर जिज्ञासूंसाठी, अभ्यासकांसाठी म. श्री. दीक्षित यांनी सिद्ध केलेला संदर्भग्रंथ वाचण्यात आला. ग्रंथ पुरेसा बोलका आहे व यापेक्षा अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही, असे दीक्षित यांचे म्हणणे आहे, पण ते तितकेसे बरोबर वाटत नाही. या पुस्तकात चित्पावनांची लोकसंख्या संपूर्ण जगभर मिळून ३० लाखांच्या आसपास असावी, असे लिहिले आहे व राजकारणातील चित्पावनांच्या अवस्थेला लोकशाहीला जबाबदार धरले आहे. माझ्या मते, चित्पावनांच्या या अवस्थेला ते स्वत:च जबाबदार आहेत. स्वत:च्या तेजाने तळपणार्या हिर्यांचे तो कोणत्याही जातीचा / उपजातीचा असो, त्याचे स्वागत व नेतृत्व भारतातील जनता स्वीकारणारच, यात मला शंका वाटत नाही.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार २ नोव्हेंबर २००३
'आम्ही चित्पावन'च्या निमित्ताने...
'आम्ही चित्पावन' हा चित्पावन ब्राह्मणांसाठी व इतर जिज्ञासूंसाठी, अभ्यासकांसाठी म. श्री. दीक्षित यांनी सिद्ध केलेला संदर्भग्रंथ वाचण्यात आला. ग्रंथ पुरेसा बोलका आहे व यापेक्षा अधिक लिहिण्याची आवश्यकता नाही, असे दीक्षित यांचे म्हणणे आहे, पण ते तितकेसे बरोबर वाटत नाही.
या पुस्तकात चित्पावनांची लोकसंख्या संपूर्ण जगभर मिळून ३० लाखांच्या आसपास असावी, असे लिहिले आहे व राजकारणातील चित्पावनांच्या अवस्थेला लोकशाहीला जबाबदार धरले आहे. माझ्या मते, चित्पावनांच्या या अवस्थेला ते स्वत:च जबाबदार आहेत. स्वत:च्या तेजाने तळपणार्या हिर्यांचे तो कोणत्याही जातीचा / उपजातीचा असो, त्याचे स्वागत व नेतृत्व भारतातील जनता स्वीकारणारच, यात मला शंका वाटत नाही.
पुस्तकातील पहिले प्रकरण म्हणजे वि. का. राजवाडे यांचा १९१३ साली लिहिलेला लेख आहे. तर्कदृष्ट्या हा लेख मनाला पटणारा आहे. यात परशुरामाने १४ व्यक्तींना कोकणात आणून वसविले व त्यांना ब्राह्मण करुन घेतले, या दंतकथेची संगती ते लावतात. चित्पावन हे नाव का पडले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले आहेत. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावन वसतीसाठी कोकणात आले, असे वि. का. राजवाडे यांचे म्हणणे आहे. या निबंधात राजवाडे यांनी चित्पावनांच्या फक्त सामाजिक स्थितीगतींचा विचार केला आहे. एवढी गुणसंपन्नता इतकी वर्षे म्हणजे चित्पावनांचा उत्कर्षकर्ता बाळाजी विश्वनाथ यांच्या उगमापर्यंत गप्प का, याची तर्कसंगत मीमांसा या लेखात केली आहे.
बाळाजी विश्वनाथाच्या उदयानंतर चित्पावन कोकण सोडून देशावर आले व आपल्या कतरृत्व गाजवले. मात्र त्यापूर्वी चित्पावनांना शिवाजीच्या काळापर्यंत ब्राह्मण म्हणून मान्यता नसल्यासारखे होते. चित्पावनांना अत्यंत खालच्या दर्जाचे समजले जात असे व तत्कालीन ब्राह्मण चित्पावनांबरोबर बेटी व्यवहार तर करत नसतच, पण चित्पावनांना आपल्या शेजारी जेवावयास बसवत नव्हते. दलित जनता आजकाल सदासर्वदा म्हणत असते की, ब्राह्मणांनी आमच्यावर पाच हजार वर्षे अन्याय, अत्याचार केले व आमचे जन्मश्रेष्ठत्वाच्या आधारावर शोषण केले. या अन्यायात चित्पावनांचा सहभाग नव्हता, कारण शिवाजीच्या काळापर्यंत चित्पावनांना ब्राह्मण म्हणून मान्यता नसल्यासारखीच होती.
शिवाजी हा युयुत्सु वृत्तीचा कणखर नेता होता, त्याने सतत लढा देत महाराष्ट्रतील जनतेत जागृती निर्माण केली. स्वत:चे सैन्य उभे केले व स्वराज्याची स्थापना केली. त्या वेळेच्या प्रचलित चालिरीतीनुसार शिवाजीला जनमान्यता हवी होती व त्यासाठी त्याने स्वत:चा वेदोक्त राज्याभिषेक सोहळा रायगडावर करण्याचे ठरविले, पण त्या वेळेच्या महाराष्ट्रतील ब्राह्मणांनी शिवाजीचे क्षत्रियत्व नाकारले व त्याला 'राजा' म्हणून मान्यता व आशीर्वाद दिले नाहीत. म्हणून शिवाजी महाराजांना काशीहून गागाभटांना आणावे लागले व स्वत:चा राज्याभिषेक करुन घ्यावा लागला. इतिहासाच्या ज्या कालखंडात ही घटना घडली, त्या काळात चित्पावन कोकणात राहात होते व त्यांना ब्राह्मण म्हणून मान्यता नसल्यासारखेच होते. शिवाजीसारख्या युगपुरुषाला नाकारणे यासारखा कृतघ्नपणा तो कोणता! या कृतघ्नपणाची व्याप्ती आजच्या कालखंडापर्यंत वाढवितो म्हटले तर शिवाजीचे राजेपण नाकारणार्या ब्राह्मणांचे वंशज म्हणजे महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय जनता पक्षाचे प्रमोद महाजन व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिवाजीचे नावही घेण्याचा नैतिक अधिकार उरत नाही व दैवदुर्विलास असा की, हीच मंडळी आज रात्रंदिवस 'शिवशाही-शिवशाही' असा घोषा लावत आहेत.
'चित्पावन समाज दर्शन' या शीर्षकाचे प्रकरण स्वत: म. श्री. दीक्षित यांनी लिहिलेले आहे. हा नितांतसुंदर लेख आहे. यात चित्पावनांच्या आडनावांची संख्या आता सव्वातीनशे आहे, जी पूर्वी फक्त साठ होती असे लिहिले आहे. दीक्षित लिहितात 'राजकारणात रस असणारा त्यांच्याइतका अन्य समाज भारतात असेल की नाही, याची शंका वाटते. बहुसंख्य चित्पावन हे हिंदुत्वाचे अभिमानी व राष्ट्रीय मनोवृत्तीचे असतात. विशेष असा की, पुरोगामित्वातही ते मागे नाहीत. गांधीवादी, समाजवादी आणि साम्यवादी चित्पावन नेते कितीतरी होऊन गेले, अद्याप आहेत.' चित्पावनांमध्ये हिंदुत्ववादी जास्त आहेत हे अगदी खरे आहे. पण हिंदुत्ववादी संघटनांमध्ये 'संघ परिवार' मोठा आहे व या संघटनेत अनेक चित्पावन आहेत. पण माझे निरीक्षण असे आहे की, या परिवारात चित्पावनांना नेतृत्व दिले जात नाही. या परिवारात देशस्थ अथवा कर्हाडे यांना नेतृत्व दिले जाते. उदाहरण म्हणजे, महाराष्ट्रत प्रमोद महाजन, पुण्यात प्रकाश जावडेकर व माजी खासदार अण्णा जोशी व नागपूर विदर्भात नितीन गडकरी, पण दुर्दैवाने संघ- परिवारातील चित्पावनांना आपण डावलले जातो व आपल्याला जास्त पुढे येऊ दिले जात नाही, हे राजकारण लक्षातच येत नाही!
'कोकण आणि कोकणस्थ' हे चिंतामणराव वैद्य यांनी लिहिलेले आहे. कोकणस्थ पहिल्यापासून बुद्धिमान, आहेत व कोकणात १८०० वर्षांपासून राहात आहेत, तर त्यांचे नाव इतिहासात पेशवाईपूर्वी का दिसत नाहीत, याचे उत्तर त्यांनी असे दिले आहे की, पूर्वी ब्राह्मण राजकारणात जात नव्हते. कोकणस्थांत वेदाध्ययन करुन स्नानसंध्येत काल घालवणारे व चरितार्थाकारिता शेती करणारेच पुष्कळ होते. या संदर्भात वि. का. राजवाडे यांनी दिलेले स्पष्टीकरण तर्कदृष्ट्या मनाला पटते. वि. का. राजवाडे लिहितात, 'चित्पावन ब्राह्मण भारतवर्षाच्या राजकीय क्षितिजावर एकोकी व अकस्मात उगवलेले स्थूलदृष्टीला दिसतात. सामान्यत: असाही समज आहे की, कोणत्याही प्रकारचे पूर्वचिन्ह न दाखविता किंवा कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता हा समाज दैवयोगाने ऐश्वर्यारुढ झाला, पण असा चमत्कार इतिहासाला परिचित नाही. इतकेच काय सृष्टीलाही परिचित नाही. वास्तविक सूक्ष्म शोध घेतला असता असे आढळून आले आहे की, चित्पावनांची उद्योन्मुखता आस्ते आस्ते व क्रमाक्रमानेच होत आली आहे. ३०८८ वर्षांपूर्वी चित्पावनांना परशुरामाने कोकणात आणून बसवले तेव्हा ते फक्त १४ जण होते. शकपूर्व १२०० ते शकोत्तर १२०० पर्यंतच्या २५०० वर्षांत चित्पावनांची लोकसंख्या इतकी थोडी होती की, हिंदुस्थानच्या राजकारणांत हात घालण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. त्यांची लोकसंख्या चार-पाच हजार असावी. प्रजावृद्धी होण्यासारखी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती. शके १२०० नंतर मुसलमानी अमलात लौकिक व्यवहार चित्पावन उचलू लागले, तसतसे त्यांचे आर्थिक सामर्थ्य वाढू लागले व जास्त प्रजा पोसण्याची शक्ती त्यांच्या ठायी आली. बुद्धी तर होती व या बुद्धीला काही प्रमाणात संपत्तीची व प्रजावृद्धीची जोड मिळाली, तेव्हा हिंदुस्थानच्या राजकारणात हात घालण्याची शक्ती उत्पन्न झाली. ही शक्ती संधीची वाट पाहत होती व ती संधी राजाराम छत्रपतींच्या मृत्यूनंतर चित्पावनांना सापडली व तिचा त्यांनी यथायोग्य उपयोग केला.'
बाळाजी विश्वनाथ भट हा चित्पावन ब्राह्मण शाहू महाराजांमुळे पेशवेपदावर पोहोचला. हा चित्पावनांचा उत्कर्षकर्ता होता, यावर म. श्री. दीक्षित यांनी एक प्रकरण या पुस्तकात लिहिले आहे. ते वाचनीय आहे. यात पेशव्यांच्या कोकणातील श्रीवर्धन येथील वाड्याची सध्या काय अवस्था आहे वगैरे तपशील आहे. या बाळाजी विश्वनाथाच्या पत्नीचे सासरचे नाव राधाबाई असे होते व ती बर्वे घराण्यातील होती. भावी काळात ही मुलगी सुलक्षणी निघाली. वीरपती आणि वीरमाता या उभय नात्याने तिचे नाव सर्वतोमुखी झाले. राधाबाईचा पुत्र प्रतापी बाजीराव वयाच्या १८व्या वर्षी पेशवेपदावर आरुढ झाला. (बाजीरावाबाबत या पुस्तकांत त्रोटक माहिती दिलेली आहे) माझ्या मतानुसार नेपोलियन बोनापार्टच्या तुलनेच्या या पराक्रमी पेशव्याने पाहता पाहता शिवाजीच्या स्वराज्याचे सामरज्यात रुपांतर केले. या बाजीरावात ब्राह्मण्याचा लवलेश नव्हता. तो पकका छात्र-वृत्तीचा लढवय्या होता. दूरदृष्टीच्या या योद्धयाने महाराष्ट्रतील मराठा, धनगर, बंजारा आदी सर्व जातींमधील गुण हेरुन ते विकासित केले. असे सांगतात, बाजीराव जेव्हा मोहिमेवर जायचा, तेव्हा त्याच्या राहुटीजवळ एका महार सरदाराची राहुटी असण्याची खबरदारी तो घेत असे. (संदर्भ- काळाच्या पडद्या आड, प्रकाशक- मराठी साहित्य परिषद, हैद्राबाद) आज महाराष्ट्रबाहेर ग्वाल्हेर, झांशी, इंदोर व बडोदा हे मराठयांच्या पराक्रमाचे दाखले उभे आहेत, ते याच पहिल्या बाजीरावाचे कतरृत्व होय. या प्रतापी बाजीरावाने मुसलमान कन्या 'मस्तानी'शी जिवापाड प्रेम केले, लग्न केले. बाजीरावाला मस्तानीपासून जी मुले झाली, त्यांच्या त्याने मुंजी केल्या. 'बाजीराव- मस्तानी' हे हिंदू-मुस्लिम ऐकयाचे एक आदर्श उदाहरण आहे. पण पुढील इतिहासात इंग्रजांनी कुटील डाव रचून हिंदू व मुसलमानांमध्ये द्वेष पसरविला.स्वतंत्र सृजनाच्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा दूरदृष्टीचा चित्पावन नेता याला बळी पडला, यासारखे दुर्दैव ते कोणते?
महाराष्ट्रचे व मराठी लोकांचे दुर्दैव असे की, पानिपतावरच्या लढाईत मराठी पराभूत झाले. त्यांची एक पिढीच्या पिढी गारद झाली. स्वत: सदाशिवभू व विश्वासराव पेशवे धारातीर्थी पडले. या पराभवाचा फारच भयावह असा परिणाम महाराष्ट्रवर पडला. पुण्यातील महाराष्ट्रतील ब्राह्मणांनी, पेशव्यांनी ब्राह्मणत्वाचा त्याग केला व 'बाजीरावाने मुस्लिम कन्येशी विवाह केला व ब्राह्मणधर्म बुडविला म्हणून पेशव्यांना पानिपतावर हार पत्करावी लागली', अशी हाकाटी पिटावयास सुरुवात केली. या सर्व प्रकारामुळे पेशवे धास्तावले. पेशवाई ब्राह्मणवादाकडे झुकली, महाराष्ट्रतील ब्राह्मणांचा प्रभाव चित्पावनांवर वाढला व त्यातून पानिपत युद्धापूर्वी कधीच न घडलेले दलितांवरील अत्याचार वाढीला लागले, हा सर्व ब्राह्मणवादाचा प्रभाव होता, जो कदापिही योग्य नव्हता.
पुढील काळात महाराष्ट्रत अनेक सामाजिक चळवळी झाल्या. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ त्यापैकीच. या चळवळीला पुण्यातील चित्पावन भिडेशास्त्री यांनी सर्वतोपरी मदत केली. पुढे लोकमान्य टिळकांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. या महान चित्पावन राष्ट्र्पुरुषावर हे तेल्यातांबोळ्यांचे पुढारी आहेत म्हणून महाराष्ट्रतील ब्राह्मणांनी चिखलफेक केली होतीच. या पुस्तकात लोकमान्य टिळकांचे १९०० सालातील 'कोकणस्थ, देशस्थ व कर्हाडे' या मथळ्याचे केसरीतील दोन अग्रलेख आहेत. यात लोकमान्यांनी कोकणस्थ, देशस्थ व कर्हाडे यांनी आपापसात विवाह करावेत, असे स्पष्टपणे लिहिले आहे. हे अग्रलेख त्याकाळात पुरोगामी व सुधारक वाटले असतील, पण आज २००३ मध्ये सुद्धा देशस्थ, कोकणस्थ व कर्हाडे यांच्या विवाहापासून निर्माण होणारी संतती जेव्हा वयात येते, स्वत: विचार करु लागते, तेव्हा त्यांची सामाजिक कुचंबणा होत असते, असे माझे निरीक्षण आहे.
१९३०नंतर महाराष्ट्रतील मराठा समाजाला सत्तेची चाहूल लागली व त्यासाठी त्यांनी पद्धतशीरपणे ब्राह्मणद्वेष पोसला व पसरविला. यांत चित्पावन अन्य ब्राह्मणांपेक्षा स्वत:चे वेगळे अस्तित्व (आयडेन्टिटी) दर्शवू शकले नाहीत. या ब्राह्मणद्वेषाच्या लाटेत ते पार होरपळले गेले. त्याला ते स्वत:च जबाबदार आहेत.
लिन्दा कॉकस या अमेरिकेतील विद्यर्थिनीने 'चित्पावन' या विषयावर एक प्रबंध पूर्ण केला आहे. २२ फेब्रुवारी १९७० च्या 'द इलस्टरेटेड विकली ऑफ इंडिया'त तिचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्याचा स्वैर अनुवाद या पुस्तकात दिला आहे. यात त्या म्हणतात, 'चित्पावनांचा सनदशीर मार्गाने राजकीय उद्योग चालू होताच, परंतु दुसराही राजकीय उद्योग चालू होता तो म्हणजे 'दहशतवाद.' चाफेकरबंधूंनी रॅन्डचा काटा काढला व नथुराम गोडसे हा बहुधा शेवटचा दहशतवादी असावा. गांधीहत्येनंतरच्या ब्राह्मणद्वेषाच्या वादळात राजकीय नेतृत्व लोपले तरीही उजवे व डावे यांचे नेतृत्व चित्पावनच राहिले.' 'चित्पावनांचे मानबिंदू' या प्रकरणात पराक्रमी चित्पावनांचे फोटो व माहिती दिली आहे. यात जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांचा फोटो दिला आहे. धनंजयराव गाडगीळ यांनी सहकारी चळवळीचे बीजारोपण महाराष्ट्रत केले. मराठा समाजातील शेतकर्यांना त्यांनी सहकार चळवळ शिकाविली व त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा घेऊन अनेक सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रत उभे झाले. बुद्धी एका चित्पावनाची व संपूर्ण फायदा मात्र मराठा समाजाला झाला. त्यांच्यातूनच मग पुढे वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व महाराष्ट्रत सत्तेवर आले.
आमरावतीजवळ तपोवन येथे प्रख्यात समाजसेवी डॉ. शिवाजीराव पटवर्धन या चित्पावन ब्राह्मणाने कुष्ठरोग्यांसाठी एक आश्रम काढला होता. त्यास महाराष्ट्र सरकारचे अनुदान होते. पटवर्धनांनी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना अनुदान वाढवून मागितले, पण दादांनी त्याला नकार दिला. शिवाजीरावांनी उपोषण सुरु केले; पण वसंतदादा पाटील बधले नाहीत. शिवाजी पटवर्धनांना जी अनुदानाची रककम हवी होती ती देणे महाराष्ट्र सरकारला सहज शकय होते. पण वसंतदादांनी मानले नाही, कारण शिवाजीराव पटवर्धन चित्पावन होते. पुढे शिवाजीराव पटवर्धन यांना प्रायोपवेशन करावे लागले. माझ्या मतानुसार शिवाजीराव पटवर्धनांच्या या मृत्यूतून एक गोष्ट समस्त चित्पावनांनी शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे कोणत्याही चित्पावनाने 'समाजसेवा' करु नये.
या पुस्तकात एक मनोरंजक माहिती दिलेली आहे, ती म्हणजे चित्पावनांचे काही प्रसिद्ध बिगरचित्पावन जावई त्यापैकी काही - शंतनुराव किर्लोस्कर, ग. दि. माडगुळकर, प्रा. राम शेवाळकर, रत्नाकर मतकरी, खासदार प्रकाश आंबेडकर, प्रा. डॉ. अ. रा. कुळकर्णी, इ.
आपण 'चित्पावन की चित्तपावन ?' हा गोविंदकृष्ण मोडक यांचा प्रमुख लेख आहे व संस्कृत भाषेतील धातू, व्याकरण व दंतकथांची फोड करुन मोडक यांनी चित्पावन हाच शब्द योग्य आहे, असे सिद्ध केलेले आहे. चित्पावनांची स्वत:ची अशी चित्पावनी भाषा होती. त्याचे नमुने या पुस्तकात दिले आहेत. आता ही भाषा/ बोली लोप पावली आहे.
कुलवृत्तान्त प्रकाशित करणे, ही चित्पावनांची एक खासियत बनली आहे. 'कुलवृत्तान्त समाजाच्या इतिहासाचा मूलाधार' हा प्रा. डॉ. गं. ना. जोगळेकरांच्या लेख. ते लिहितात - 'राष्ट्रच्या इतिहासात सर्वसामान्य माणूस हाच मुख्य घटक राहील. त्यामुळे प्रत्येक समाजघटकाचा जितका प्रमाणभूत इतिहास लिहिला जाईल, तितका त्या राष्ट्रचा इतिहास अधिकृत व वास्तव रुप धारण करील. कुलवृत्तान्त हा या व्यापक इतिहासाचा प्रारंभबिंदू असल्यामुळे जितके अधिक कुलवृत्तान्त लिहिले जातील तितका त्या प्रदेशाचा व राष्ट्रचा नेमका आलेख उभा राहील. चित्पावन समाजाने ही बाब ओळखली आहे.'
चित्पावनांमधील कतरृत्ववान स्त्री-पुरुषांची यादी दिलेली आहे. यात मृणाल गोरे व पुष्पा भावे यांची नावे दिलेली आहेत. या माहेरुन चित्पावन नाहीत. माझ्या मते, स्वातंत्र्योत्तर काळात तीन चित्पावन नावे महाराष्ट्रच्या राजकीय व सामाजिक जीवनांत समोर येतात. ती म्हणजे- एस. एम. जोशी, ना. ग. गोरे व मधु लिमये. मधु लिमयांसारख्या करारी, बुद्धिमान, राजकारणपटू व पंतप्रधान होण्यायोग्य व्यक्तीला महाराष्ट्र सोडून बिहार आपली कर्मभूमी निवडावी लागली. मगच त्यांचा प्रभाव लोकसभेत पडला. या अवस्थेला चित्पावन स्वत: जबाबदार आहेत, असे माझे स्पष्ट मत आहे.
या पुस्तकावर लिहिताना कोणत्याही जातीला वा धर्माला दूषणे देण्याचा माझा उद्देश नाही, तर चित्पावनांना त्यांचा हरवलेला सूर गवसावा, हेच एकमात्र उद्दिष्ट आहे. तसेच इतर जातींचा चित्पावनांबाबतचा गैरसमज दूर व्हावा व चित्पावनांना पुन्हा पहिल्यासारखे तेजस्वी, आनंदाचे, शारYय व बुद्धिमत्ता दर्शविण्याचे व वैभवाचे दिवस यावेत, म्हणून हे लेखन केले आहे.
संजय सहस्रबुद्धे
|
 |
 |
|