|
एक गाव, एक पाणवठा
Author: बाबा आढाव
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $6.23 $4.98 20% OFF ( ~260 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार २२ जानेवारी २००६ एक चळवळ, एक पुस्तक 'एक गाव, एक पाणवठा' हे पुस्तक महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांमध्ये विविध सामाजिक चळवळी जागवणारे ठरलं. असंख्य वंचितांना या पुस्तकानं आत्मभान दिलं. अलीकडेच याची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्या निमित्ताने डॉ. बाबा आढाव यांनी या पुस्तकाचा लेखन प्रवास व आजच्या काळातही त्याची प्रासंगिकता, याबद्दल व्यक्त केलेलं हृदगत - ****************************** डॉ. बाबा आढाव यांच्या 'एक गाव, एक पाणवठा' या पुस्तकाची पहिली आवृत्ती मौज प्रकाशनानं जून १९७६ मध्ये प्रकाशित केली होती. तिसर्या आवृत्तीपर्यंतचा गेल्या तीन दशकांचा कालखंड पाहिला तर, असं लक्षात येतं की काही प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. अशा वैचारिक पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघणं, हे बरंच काही सांगून जातं. डॉ. बाबा आढाव म्हणतात, 'या पुस्तकाला सामाजिक अनुबंध आहे. तो मानसिकतेशी जोडलेला आहे. अस्पृश्यतेच्या विरोधाचा आपल्याकडे मोठा इतिहास आहे. आजच्या ज्ञान- विज्ञानाच्या युगातसुद्धा अस्पृश्यतेला आधार देणारा एकही निकष सापडलेला नाही. जीन्समध्ये सापडत नाही. रक्तगटातही आढळत नाही. या अस्पृश्यतेला कुठलंही शास्त्रीय कारण सापडत नसलं तरी ती मूळ धरून आहे.' भारतीय घटनेतील सतराव्या कलमात अस्पृश्यतेला कायमस्वरूपी प्रतिबंध करून ती संपवल्याचं म्हटलेलं आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या मानसिकतेला विरोध म्हणून धर्मांतर केलं, घटनेत बदल केले, त्या आंबेडकरांना जाऊन पुढच्या वर्षी पन्नास वर्षं पूर्ण होतील, तरीही अजून अस्पृश्यता शिल्लक आहेच. हे लोकशाहीला लांच्हन आहे. यामुळे लोकशाही कमकुवत होते. अमेरिकेत या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं डॉ. अब्राहम लिंकन व जाआरEज वॉशिंग्टन यांच्यासारख्या नेत्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जनतेनंही समानता, बंधुता या मूल्यांचा मनोमन स्वीकार करून एकसंधतेचे प्रयत्न केलेले आहेत.' डॉ. आढाव 'एक गाव, एक पाणवठा' या पुस्तकातील एक अंश उदधृत करून या पुस्तकाच्या जन्माची चित्तरकथा सांगतात. 'शंभर वर्षांपूर्वी अगदी मूलभूत, बुद्धिवादी भूमिका घेऊन भारतातील धर्म, वर्ण व जातीव्यवस्थेविरुद्ध प्रखर आंदोलन उभे राहिले. वर्षानुवर्षे ते चालले. खेडोपाडयांतून पसरले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन ढवळून निघाले. या झंझावातात अनेक घटना घडल्या. त्या अशा पुरेशा ज्ञात नाहीत. 'ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद' ही त्यांतील एखादी घटना झाली. एवढयाच घटनेमुळे बाकीचा इतिहास अंधारात राहिला. चळवळीच्या मूळ उद्दिष्टातून आणि वाटचालीतून नव्या समाजाची क्षितिजे दृष्टोप्तत्तीस येऊ लागली होती. परंतु ही प्रक्रिया थांबली.' डॉ. आढाव सांगतात, 'समाजवादी पक्षाचा मी कार्यकर्ता. महाराष्ट्र पातळीवरच्या एका शिबिरात मी प्रबंध वाचला. त्यात मी सत्यशोधक चळवळीचा सुटलेला धागा जोडण्याची संधी घेण्याबद्दल म्हटलं होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी १९७३ मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला तेव्हा शंभर वर्षं पूर्ण होणार होती. १९७४ हे वर्ष श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समारंभाच्या त्रिशताब्दीचं व शाहू छत्रपतींच्या जन्मशताब्दीचं होतं. मी तेव्हा म्हणालो होतो, की गायीपेक्षा आणि गणपतीच्या सोंडेपेक्षा आपल्यासारख्याच माणसांची, गरीब व दलितांवर अन्याय झाल्यावर उसळून बंड करणार्या बंडखोरांची आज महाराष्ट्राला नितांत गरज आहे. महाराष्ट्रातील तरुण पुरुषार्थाला हे आव्हान आहे. पुढील दोन वर्षं किमान या एका उद्दिष्टासाठी तरी सर्व महाराष्ट्रात प्रबोधन व्हावं. सभा, संमेलनं, परिषदा, मिरवणुका यांनी महाराष्ट्रात बंद पडलेली विचारांची दालनं खुली व्हावीत. १९७३ च्या सप्टेंबर महिन्याच्या २४ तारखेला महाराष्ट्रातील सर्व खेडयात सर्वांसाठी एक विहीर सुरू व्हावी. फुल्यांचे स्वप्न साकार व्हावे, हे विचार मी मांडू लागलो.' 'महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानची सुरवात ता.२७ नोव्हेंबर १९७१ रोजी झाली. २८ सप्टेंबर हा ज्योतिरावांचा स्मृतिदिन. संस्थेच्या पहिल्या वाढदिवशी भ्रमंती सुरू झाली. 'एक गाव, एक पाणवठा', मोहिमेचे अर्ज तयार करून घेतलेले होते. ते अगोदर जागोजागी पाठवलेले होते. हिंडणं आणि लिहिणं सुरू झालं. सात- आठ महिन्यांनंतर याचे परिणाम दृग्गोचार होऊ लागले. दुष्काळाचे वर्ष. या मोहिमेकडे लक्ष द्यायला कोठली फुरसद राहणार, असे वाटत होते. परंतु झाले उलट. ग्रामीण भागातील शेतमजुरांना दुष्काळाने एकवटले होते. मोठया संख्येने स्त्री- पुरुष दुष्काळी कामावर भेटत. दीड- दोन वर्षांत जवळपास सत्तर पंच्याहत्तर मोठया गावांतील तरुणांपुढे व्याख्याने दिली. तीस तालुक्यातील चारशेच्या वर खेडी पाहिली.' वाशिम जिल्ह्यातल्या पांगरीकुटे गावातल्या डॉ. वसंतराव गायकवाड यांची उत्तम प्रॅक्टिस चाललेली होती. त्यांना गावच्या विहिरीवर जायची परवानगी नव्हती. ते मोठे विद्रोही स्वभावाचे. डॉ. आढावांना आठवतं, त्या डॉक्टरांनी मला, ग्र. प्र. प्रधानांना, विजय तेंडुलकरांना पत्र लिहून कळवलं, की तुम्ही इथं येऊनच शहानिशा करा. आम्ही तेथे गेलो, जागोजागी संघर्ष नुसता खदखदत होता. प्रकरण नुसतं पाण्यापुरतं राहीना. जमिनीचे प्रश्न, एक गाव, एक मसणवट, सहकारी कारखान्यांमध्ये घेतलं न जाण्याच्या तक्रारी, कोल्हापूर परिसरातल्या देवदासींचा प्रश्न वगैरे प्रश्नांची मालिकाच त्यातनं निघू लागली. भटक्या जमातींच्या प्रश्नाला तोंड फुटलं. दलित जीवनाची ससेहोलपट होऊ द्यायची नसेल, तर हा प्रश्न काळावर सोपवून देऊन भागणार नाही. त्यासाठी शैक्षणिक व सांस्कृतिक पातळीवरच आमूलाग्र बदल करायला हवेत. धर्मातलं स्पृश्या-स्पृश्यतेचं स्थान घालवायला हवं. आपण एकसंध आहोत, अशा सामुदायिक निर्धाराची गरज आहे, असं मत मांडून डॉ. आढाव मराठी साहित्यालाही सवाल करतात. 'मराठी साहित्यानं किंवा मध्यमवर्गीय साहित्यानं एवढया मोठया प्रश्नांची दखल घेतलेली नाही. मग मराठी साहित्य कुणाचं? समतेच्या वागणुकीच्या दृढ संकल्पाची आवश्यकता आहेच, पण केवळ राजकीय पक्षांपुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही. यासाठी स्वतंत्रपणे जनसंघटन उभारण्याचीही गरज आहे. (मुलाखत : नीला शर्मा)
|
 |
 |
|