|
आपण माणसात जमा नाही
Author: राजन गवस
Publisher: मेहता प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~190 Pages, R180)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ग्रामीण माणसांची उलघाल, घुसमट, अगतिकता, राजकारणातले डावपेच, मुखवटे, त्यात जाणारे बळी ह्यांच्या काळजाचा ठाव घेणार्या कथा राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तर्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे. नया कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
|
 |
 |
|