|
शकुनाचं पान
Author: रवींद्र पिंगे
Publisher: चंद्रकला प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~160 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: टवटवीत लेखांचा नवीन संग्रह - रवींद्र पिंगे यांच्या शैलीदार लेखणीतून उतरलेला
ई-सकाळ रविवार २१ मे २००६ सहज आणि प्रसन्न लेखन ( वंदना बोकील-कुलकर्णी )
भावचित्रे, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, स्थलवर्णन आणि इतर आत्मनिष्ठ लेखन अशा अनेक प्रकारांना सामावून घेणार्या "ललितगद्य' या वाङ्मयप्रकाराला सध्या बहर आला आहे. सातत्याने "ललितगद्य' हा वाङ्मयप्रकार हाताळणार्या आणि आपल्या परीने त्यात भरही घालणार्या लेखकांत रवींद्र पिंगे हे नाव ठळक आहे. १९७८ मध्ये प्रकाशित झालेल्या "मोकळं आकाश' या पहिल्या ललित लेखसंग्रहापासून आताच्या "शकुनाचं पान' या ललित लेखसंग्रहापर्यंत त्यांचे एकूण तेरा संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. "शकुनाचं पान' या त्यांच्या ताज्या संग्रहातही प्रवासवर्णनपर लेख (नर्मदेच्या उगमापाशी, मुक्काम झांशी, गणपती पुळे इ.) स्थलवर्णनपर (सानेगुरुजींचा जन्मगाव, हृदयाची हाक घालणारी ठिकाणं, अबूच्या पहाडावरील सूर्यास्त इ.), आत्मपरलेखन (माझी भूमिका, निवृत्तीतलं भाग्य, आकाशवाणीवरले उमेदवारीचे दिवस इ.) असे विविध प्रकारचे ३० लेख समाविष्ट केले आहेत.
यातील अनेक लेख वेगवेगळ्या दैनिकांसाठी, नियतकालिकांसाठी लिहिलेले असल्यामुळे छोटेखानी आहेत. विविध विषयांवरचं हलकंफुलकं प्रसन्न शैलीतलं लिखाण असं त्यांचं स्वरूप असलं, तरी लेखकाचा मराठी व इंग्रजी साहित्याचा व्यासंग त्यामधून जाणवतो. विविध संदर्भांनी या लेखनाची गुणवत्ता उंचावली आहे. विशेष म्हणजे हे संदर्भ लेखनाच्या ओघात सहजपणे येतात. गोडसे भटजींच्या "माझा प्रवास'चा उल्लेख त्यात येतो तसा प्रिस्टले, ग्रॅहम ग्रीन यांच्या लेखनाचाही येतो. वेणूबाई पानसे लिखित हरिभाऊ आपटे यांच्या चरित्राचा येतो, तसा मेरी हिगीन्स क्लार्क या अमेरिकन लेखिकेच्या "माय वाईल्ड आयरिश मदर'चाही येतो. योगी अरविंदांचा येतो तसा श्रीगोद्याच्या शेख महंमद या सूफी संतकवीचाही येतो.
प्रवास करताना पिंगे यांची रसिक, जिज्ञासू वृत्ती जे टिपते ते शब्दांत उतरविण्याचे कसब "मुक्काम झांशी', "मधुर सुखाचा नजराणा' यांसारख्या लेखांतून नजरेत भरते. "लेखकांच्या दुनियेतला गारठा आणि ऊब', "संधिप्रकाशातलं समाधान', "लेखक-कलावंतांचं जग' आणि भाषणबाजीचं भन्नाट वारं' यांसारख्या लेखांतून साहित्यजगातल्या विसंगतीचं, विरूपतेचं दर्शन ते घडवतात. हरिभाऊ आपट्यांचं अद्भुत चरित्र', हीरकमहोत्सवी गीताप्रवचने, "श्री. कृ. कोल्हटकरांचं आत्मवृत्त', "आई, ती आईच' इ. लेख म्हणजे नावीन्यपूर्ण माहितीचा खजिना आहे.
भावनेला चटकन हात घालणारं, बुद्धीला पटकन गुंगवणारं असं सहज, ओघवत्या, प्रसन्न शैलीतलं हे ललितलेखन आहे. भटकंतीची आवड असणारे, रसिक आणि कलासक्त वृत्तीचे, लेखक- कलावंतांविषयी कृतज्ञ भाव ठेवणारे लेखक पिंगे "शकुनाचं पान' मधून भेटतात.
|
 |
 |
|