|
बखर अयोध्येची
Author: गिरीश आफळे
Publisher: भारतीय विचार साधना
|
|
Price: $6.82 $5.45 20% OFF ( ~320 Pages, R250)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: राम मंदिरासाठी झालेला संघर्ष यामध्ये विस्तृतपणे दिलेला आहे. या पुस्तकामध्ये एकूण १३ प्रकरणे आहेत. त्यापैकी शेवटची दोन प्रकरणे ही परिशिष्ट आणि संदर्भसूचीसाठी आहेत. अयोध्येच्या इतिहासासंबंधी पहिले प्रकरण आहे. त्यामध्ये वेदकाळापासून अयोध्येतील राम मंदिराचा इतिहास सांगितला आहे. परकीय धर्मांधांनी केलेल्या हल्ल्याचा व वेळोवेळी त्याला प्रतिकार करणार्या शेकडो वर्षातील रामभक्तांच्या त्यागाचा इतिहास आहे. दुसरे प्रकरण हे श्रीराम बंदिवासातून मुक्त झाले यासंबंधी आहे. यामध्ये इ.स. १८८५पासून वेळोवेळी दाखल केलेल्या कोर्ट केसची माहिती आहे. विश्व हिंदू परिषदेची स्थापना विशाल हिंदू संमेलन, श्रीराम जन्मभूमी, मुक्ती यज्ञ, श्री राम जानकी रथयात्रा, ताला खोलो आंदोलन इत्यादीची तपशीलवर माहिती दिलेली आहे. तिसरे प्रकरण हे राम मंदिराचा शिलान्यास यासंबंधी आहे. यामध्ये आळंदीचे धर्म संमेलन, बजरंग दल, आंतरराष्ट्रीय रामायण संमेलन, तत्कालीन पंतप्रधान व काही राजकीय व्यक्तींच्या रामजन्मभूमी आंदोलना संबंधित प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. चौथे प्रकरण हे भारतातील हिंदू मन जागविणार्या लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रे संबंधी आहे. मंदिर वही बनायेंगे हा पाचव्या प्रकरणाचा विषय आहे. यामध्ये विश्व हिंदू अधिवक्ता संघाने राम मंदिरासाठी केलेल्या कार्याची माहिती, कोठारी बंधूंचे बलिदान इत्यादी उपप्रकरणे आहेत. राम मंदिरासंबंधित सर्व ऐतिहासिक पुरावे हे सहाव्या प्रकरणाचा विषय आहेत. क्रांतीचे पूर्वरंग हे सातवे प्रकरण आहे. यामध्ये आयोध्येमध्ये धर्मांधांनी केलेल्या दंगली, देहू येथील संत संमेलन, बोट क्लबवरील विश्व हिंदू परिषदेचा विशाल मेळावा, तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या राम मंदिरा संबंधीच्या प्रतिक्रिया व भूमिका, २.७७ एकर जागेचे हस्तांतरण, श्रीराम चबुतर्यांची कारसेवा अशी अनेक उप प्रकरणे आहेत. प्रतिक्षेचा कडेलोट, डिसेंबर या आठव्या प्रकरणात डिसेंबर १९९२ च्या कारसेवा यात्रेसंबंधी माहिती दिलेली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली. त्या प्रसंगाचे रोमहर्षक वर्णन हे नवव्या प्रकरणात आहे. बाबरी मशिद पाडल्यानंतर काही राजकीय तसेच बाबरी मशीद पतनानंतर घडलेल्या विविध घटनांचा आढावा व प्रतिक्रिया या दहाव्या प्रकरणात दिल्या आहेत. अकरावे प्रकरण हे ६ डिसेंबरच्या क्रांतीनंतर असे आहे. ======= लेखकाचे मनोगत २६ नोव्हेंबर १९९२ रोजी अयोध्येस जाणासाठी आमची निगडी प्राधिकरणातील वाहिनी (तुकडी) निघाली. सोबत माझी पत्नी डॉ. सौ. गीता ही देखील होती. वाहिनी प्रमुख त्याचप्रमाणे डॉक्टर अशी दुहेरी जबाबदारी माझ्यावर होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ज्याने अयोध्येतील "तो" क्षण पाहिला, ती व्यक्ती तो क्षण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. मीही अशातीलच एक.९ डिसेंबर १९९२ ला पुण्यात परत आलो, तेव्हा भारतभर दंगली चालू झाल्या होत्या. मुंबईची दंगल शमायला दीड-दोन आठवडे लागले. ही दंगल शमते न शमते, तोवर जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत लगेच दुसरी दंगल सुरूझाली. दै. 'लोकसत्ता'ने त्या वेळी वाचकांच्या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. दंगलीची कारणमीमांसा करणारा एक छोटासा लेख मी लिहिला. तो दै. 'लोकसत्ता'च्या व्यासपीठ' या सदरात छापून आला. मी लिहू शकतो, असा विश्वास जागृत झाला. ___ अयोध्या या विषयावरील मिळतील ती पुस्तके, विश्व हिंदू परिषदेच्या पत्रिका, पुस्तिका वाचू लागलो. मनामध्ये काही आकृती साकार होऊ लागली. याच वेळी श्री. चं. प. तथा बापूराव भिशीकर यांचे 'हाक अयोध्येची ' (१९९०) हे पुस्तक वाचण्यात आले. मार्च १९९३ च्या मुंबईत झालेल्या बोबस्फोटांनी संपूर्ण भारतच हादरला. हे सर्व अयोध्या प्रकरणामुळे झाले, अशी साधी, सुटसुटीत, पण भ्रामक चिकित्सा भाजपेतर राजकीय पक्ष व संघाच्या विरोधकांनी मांडली. मात्र जगभर मुस्लिम आतंकवाद भडकतच होता. जगातल्या त्या त्या ठिकाणी थोडेच अयोध्याकांड घडत होते? या ग्रंथाच्या निर्मितीत अनेकांचा हातभार लागलेला आहे. त्यांचा नावानिशी वार उल्लेख करणे हे खुद्द त्यांनाही आवडणार नाही. हा धोका पत्करूनही काही उल्लेख अवश्य करावेसे वाटतात. रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे काही केंद्रीय व प्रांत स्तरावरील अधिकारी, त्याचप्रमाणे अनेक स्थानिक स्वयंसेवक व संघाच्या अधिकार्यांनी या पुस्तकाचे हस्तलिखित वाचले. प्रोत्साहन दिले. विहिंपच्या पुणे कार्यालयाने त्यांच्याकडे असलेल्या अनेक पुस्तिका व काही पुस्तके दिली. १९८६ ते १९९२ पर्यंतच्या सांस्कृतिक वार्तापत्रांचे सर्व अंक मा. संपादकांनी अत्यंत तत्परतेने दिले. या वार्तापत्रांचा मला ग्रंथलेखनात अतिशय उपयोग झाला आहे. भारतीय जनता पक्षाने १९९३ साली अयोध्येवर एक श्वेतपत्रिका प्रसिध्द केली होती. भाजपा महाराष्ट्र प्रांताच्या कार्यालयाने ती मला तत्परतेने दिली. पुणे विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांनी अत्यंत अल्प काळात पुस्तक वाचून प्रस्तावना लिहून दिली. केवळ राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्या विषयांचीच पुस्तके प्रकाशित करणार्या भारतीय विचार साधनेने माझा हा ग्रंथ प्रकाशित करावा, हा मी माझा गौरवच समजतो. हे सर्व होत असताना, मला प्रकर्षाने आठवण होत असायची, ती त्या स्वयंसेवकांची; ज्यांच्याबरोबर मी अयोध्येत तंबूत राहिलो होतो. दुर्लभ असलेल्या बंधुत्वाचा सहज अनुभव मला त्या १०-१२ दिवसात आला. लिखाण चालू असताना होणारा सर्व त्रास माझ्या पत्नीने सोसला. दै. तरुण भारत (मुंबई), सा. विवेक (मुंबई) दै. सकाळ (पुणे) व दै. लोकसत्ता (पुणे) यांच्या मा. संपादकांनी त्यांच्या वृत्तपत्रांमधील/साप्ताहिकांमधील पूर्वप्रकाशित वार्तापत्रे, लेख, मुलाखती व प्रकाशचित्रे छापण्यास परवानगी दिल्यामुळे या पुस्तकाची गुणवत्ता निश्चितच वाढली आहे. या सर्वांविषयी मी कृतज्ञ आहे व त्यांच्या ऋणातच राहणे मी पसंत करीन. माझ्या ह्या सर्व कार्याची प्रेरणा निश्चितच रा. स्व. संघ आहे.या ग्रंथात जर चांगलेकाही आढळले तर त्याचे सर्व श्रेय या सर्वांना आहे. काही त्रुटी, चुका, उणिवा आढळल्यास मात्र, मी एकटा जबाबदार आहे. अयोध्या आंदोलनाविषयी माझे मत मी मुद्दाम कोठेच व्यक्त केलेले नाही. फक्त घटना वाचकांसमोर मांडत गेलो आहे. सूज्ञ वाचक स्वत:ची मते बनविण्यास निश्चितच सक्षम असतो, यावर माझा विश्वास आहे. शेवटी एक नम्र विनंती. या पुस्तकासंबंधी काही नवीन संदर्भ, काही उणिवा, त्रुटी आढळल्यास किंवा काही सूचना कराव्याशा वाटल्या तर वाचकांनी नि:संकोच लिहून कळवाव्यात. त्याचा आदर करून पुढील आवृत्तीत योग्य ते बदल करण्यात येतील. जय श्रीराम! डॉ. गिरीश आफळे, १२/३/२००२ (महाशिवरात्री, शके १९२३, युगाब्द ५१०३)
Other Links:
|
 |
 |
|