|
जीएंच्या पत्रवेळा ...
Author: संपादित
Publisher: पॉप्युलर प्रकाशन
|
|
Price: $5.14 $4.11 20% OFF ( ~120 Pages, R150)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: कविवर्य ग्रेस, त्यांची कविता ही जीएंची अशीच एक अतिशय जिव्हाळ्याची जागा होती. पत्रांमधून जीएंनी ग्रेस यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याच पत्रसंवादाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे, त्याचे नाव "जीएंची पत्रवेळा ...' ग्रेस यांच्याबरोबरच त्यांची कन्या डॉ. मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश या संग्रहात आहे. १५ नोव्हेंबर १९७१ ते १० जुलै १९८७ अशा जवळपास सोळा वर्षांच्या कालावधीत लिहिलेली मराठी आणि इंग्लिशमधील ही पत्रे आहेत.
Review courtesy of eSakal: ई-सकाळ Sउन्दय, ंर्च ०६, २०११ हृद्य पत्रसंवाद : श्रेष्ठ 'कथे'चा श्रेष्ठ 'कविते'शी! -- प्रदीप कुलकर्णी आपल्याला कवी होता आले नाही, याची मनस्वी खंत विख्यात साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांनी आयुष्यभर उरात बाळगली. त्यांच्या अनेक कथा म्हणजे गद्य स्वरूपातील काव्यच आहे, हे जरी खरे असले तरी "कवी असणे ते कवी असणेच', असे त्यांना वाटत असे. शब्दमाध्यमात आपण केवळ कवीलाच कलावंत मानतो, असे ते म्हणत. कथालेखनाबरोबरच चौफेर आणि ऐसपैस पत्रलेखन हा त्यांचा विशेष होता. पत्रलेखनही "विदग्ध साहित्य' होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जीएंनी अनेकांना लिहिलेली मनमोकळी पत्रे. श्री. पु. भागवत, माधव आचवल, सुनीताबाई देशपांडे, जयवंत दळवी, शांताबाई शेळके, महेश एलकुंचवार...नावे तरी किती सांगावीत? अशा अनेकांना जीएंनी सुदीर्घ पत्रे लिहिली. जिव्हाळ्याच्या माणसांना पत्रे लिहिणे हा जीएंचा छंदच होता आणि पत्रांमधून निर्माण केलेला जिव्हाळा वाढवत नेणे, टिकवून ठेवणे हे ते अत्यंत निगुतीने करत असत. त्यांच्या असंख्य पत्रांमधून याची प्रचीती येते. श्रीपु, सुनीताबाई, शांताबाई यांना लिहिलेली गंभीर पत्रे; माधव आचवल, जयवंत दळवी यांना लिहिलेली खट्याळ पत्रे... जीएंची पत्रे व्यक्तीनुसार असे चेहरे बदलत असत. जीएंच्या निधनानंतर त्यांचा हा पत्रठेवा पुस्तकरूपाने चार खंडांमध्ये काही वर्षांपूर्वी प्रकाशितही झाला. कविवर्य ग्रेस, त्यांची कविता ही जीएंची अशीच एक अतिशय जिव्हाळ्याची जागा होती. पत्रांमधून जीएंनी ग्रेस यांच्याशी मनमुराद संवाद साधला. याच पत्रसंवादाचे पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे, त्याचे नाव "जीएंची पत्रवेळा...' ग्रेस यांच्याबरोबरच त्यांची कन्या डॉ. मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेल्या पत्रांचा समावेश या संग्रहात आहे. १५ नोव्हेंबर १९७१ ते १० जुलै १९८७ अशा जवळपास सोळा वर्षांच्या कालावधीत लिहिलेली मराठी आणि इंग्लिशमधील ही पत्रे आहेत. जीए आणि ग्रेस यांची भेट प्रत्यक्षात कधी झाली नाही; (फोनवरून काही वेळा बोलणे झाले) पण अनेकानेक पत्रभेटींमधून दोघांमध्ये विलक्षण गाढ ऋणानुबंध निर्माण झाले होते. ऋणानुबंधांसाठी हा "पत्रानुबंध'च त्यांना पुरेसा ठरला. श्रेष्ठ "कथे'ने श्रेष्ठ "कविते'शी साधलेला हा जणू हृदयसंवादच आहे! एक वेगळा, सर्वस्वी स्वत:च्याच वाटेने जाणारा कवी म्हणून कविवर्य ग्रेस यांच्याविषयी जीएंना मोठा आदर होता. या पुस्तकामधून त्याचा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, ग्रेस यांच्या कवितेविषयी जीए एका पत्रात लिहितात : "तुमच्या कविता या तुमच्या खासगी आयुष्यातून, भोगांतून निर्माण झाल्या आहेत. सर्वच कवींच्या कविता एका ढोबळ (आणि ढोबळ्या) अर्थाने त्यांच्या आयुष्याशी निगडित असतात. तसल्या ढोबळ अर्थाने "मी तसले' शाळामास्तरी विधान करत नाही. इतरांच्या बाबतीत पाहिले, जाणवले ते आरशावरील प्रतिबिंबाप्रमाणे दिसते. सरकून जाते. तुमच्या बाबतीत मात्र ते अंगावर गोंदवल्याप्रमाणे किंवा मांसात डागाने उठवलेले आहे...' एकंदरीतच ग्रेस यांच्या कवितेविषयी, कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी जीए किती बारकाईने विचार करत असत, हे जाणून घेण्यासाठी हे सगळेच पत्र (पृष्ठ क्रमांक ५९ ते ६५) वाचायला हवे. ग्रेस यांच्या कन्या मिथिला यांनाही जीएंनी लिहिलेली (इंग्लिशमधील) पत्रे दोघांमधील जिव्हाळ्याची साक्ष देतात. जीएंचा वाढदिवस लक्षात ठेवून त्या दिवशी मिथिलाने त्यांना तारेने पाठविलेल्या शुभेच्छांबद्दल जीए भारावून जाऊन कृतज्ञता व्यक्त करतात. पत्र पाठविताना कशा स्वरूपाचा, कोणत्या रंगाचा कागद वापरावा, ते तिला सुचवतात, वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेण्याविषयी सांगतात...आधुनिक शिक्षणाविषयी बोलताना तिच्याशी परखडपणे मतभेदही व्यक्त करतात... इंग्लिश भाषेतील अभिजात साहित्याविषयी चर्चा करतात... जीएंची अशी अनेक पत्ररूपे या छोटेखानी पुस्तकात आढळतात. जीएंच्या स्वभावाची अनोखी बाजू या पत्रांमधून कळते. कवी होण्याची तीव्र इच्छा असलेले; पण होऊ न शकलेले जीए आणि स्वतंत्र शैली, स्वतंत्र प्रतिमाविशर्वाद्वारे कवितेचा अनोखा महामार्ग तयार करणारे कविवर्य ग्रेस...अशा या दोन दिग्गज साहित्यिकांमधील हा पत्रसंवाद म्हणजे दोघांच्याही चाहत्यांना समृद्ध करणारा ठेवा आहे.
Other Links:
|
 |
 |
|