|
श्रीनिसर्गदत्तमहाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद
Author: श्रीनिसर्गदत्तमहाराज
Publisher: श्रीनिसर्गदत्त अध्यात्म केंद्र
|
|
Price: $18.28 $14.62 20% OFF ( ~700 Pages, R600)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: श्रीनिसर्गदत्तमहाराज जीवनातील आत्मज्ञान त्यांच्या स्पष्ट परखड भाषेतून आपल्या शिष्यांना ऐकवत असत. महाराजांना बोलण्याचा कधीच कंटाळा नसे. अज्ञानी जनांनी विचारलेल्या प्रश्नांना ते समर्पक उत्तरे देत, शंकेचे पूर्ण निरसन करीत. त्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत त्यांच्याशी बोलत. हे त्यांच्या निरुपणांचे एक पुस्तक. परमनित्य सुखाच्या, समाधानाच्या शोधासाठी पाश्चात्य देशातील जनता भारत भूमीकडे आकृष्ट झालेली आहेत. त्यांतील एक श्री. मॉरिस फ्रिडमन उर्फ भारतानंद हे पोलिश गृहस्थ होते. समाधान न पावल्यामुळे ते परमशांती देणार्याचा शोध घेत असताना त्यांना श्रीनिसर्गदत्त महाराजांचा शोध लागला. महाराजांचा त्यांना ५-६ वर्षांचा सहवास लाभला. त्यात त्यांनी प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांच्याकडून परमनित्य सत्याचा मार्ग मिळवला. त्यांच्या चर्चात्मक संवादाचे टेपरेकॉर्डवर रेकॉर्ड करून त्याचे योग्य संकलन करून इंग्लिश भाषेत पुस्तक प्रसिद्ध केले. त्याचे हे मराठी भाषांतर. आत्मज्ञानाची ओळख करून देऊन 'मी कोण?' या प्रश्नाचे गूढ उकलण्याचे उत्तम मार्गदर्शन प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे. श्री. फ्रीडमन यांनी संकलित केलेल्या "आय अॅम दॅट" या इंग्रजीतल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. गोगटे आणि श्री फडोळ यांनी यांनी एका ४ पुस्तकांच्या संचात केला आहे. त्यांचे पुन:प्रकाशन या एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहे.
Review courtesy of Loksatta: लोकसत्ता रविवार, ४ एप्रिल २००४
विश्वाला सुखी करणारा संवाद
'श्रीनिसर्गदत्तमहाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद' हे अध्यात्मावरील श्रेष्ठ पुस्तक अलीकडेच पुन्हा प्रकाशित झाले आहे. सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य श्री निसर्गदत्त महाराज यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचे हे संकलन आहे. हे मार्गदर्शन प्रवचनात्मक नाही, तर प्रश्नोत्तरात्मक आहे. शिष्यांनी तसेच जिज्ञासूंनी विचारलेल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे यात संकालित आहेत.
मॉरिश फ्रिडमन या जिज्ञासू साधकाने सर्वप्रथम इंग्रजीत हे संकलन केले. *** **** ***** या नावाने ते जगभर गाजले. या पुस्तकाचे मराठी भाषांतर म्हणजे ''निसर्गदत्त महाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद.'' *** **** ***** या पुस्तकाच्या आजवर तीस आवृत्त्या निघाल्या, शिवाय विविध पाश्चिमात्य भाषांत त्यांचे भाषांतर झाले आहे. अशा या जागतिक कीर्तीच्या पुस्तकाची हा लेख म्हणजे ओळख आहे. नवनाथांपैकी रेवणनाथ यांच्याकडून चालत आलेली परंपरा काडसिद्धेश्वर - गुरुलिंगमजंगम- भाऊ साहेब महाराज यांनी पुढे चालू ठेवली. भाऊ साहेब महाराजांचा संप्रदाय हा 'इंचगिरी संप्रदाय' या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच काडसिद्धेश्वर स्थान करवीरनजीक सिद्धगिरी डोंगरावर आहे.
भूसाहेब महाराज यांनी ४२ वर्षे साधना करुन परमार्थाचा वृक्ष जोरात पोसला. तो इंचगिरी संप्रदाय म्हणून नावारुपास आणला.
सर्वांना समजणारा विहंगम मार्ग!
त्यामध्ये श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी फक्त ध्यानधारणेनेच अंतिम सत्य प्राप्त होते असे नाही तर विहंगम मार्गाने सारासार विवेकाच्या मार्गानेसुद्धा सत्यस्वरुप प्राप्त करता येते, याजसाठी गुरुआनुज्ञा मिळविली. इंचगिरी संप्रदायाला एक नवीन मार्गाची जोड दिली. तदनंतर मराठी दुसर्या इयत्तेपर्यंत शिक्षित असूनही वेदांतासारख्या अध्यात्म ज्ञानाचा अवघड विषय सुलभ व सोप्या भाषेत साधकांना ते समजावून सांगू लागले. १९२६ ते १९३६ पर्यंत अखंडपणे कर्नाटक व महाराष्ट्रत त्यांनी ज्ञानप्रसार केला. मुंबई शहरात त्यांची निरुपणे होत असत.
मी देहात नाही! देह माझा नाही!!
महाराज सामान्यांतून असामान्य असे दैनंदिन जीवन कंठीत होते. सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न त्यांनाही भेडसावित असत. परंतु आपण देही नव्हे, हे गुरुवचन त्यांच्या अंतर्यामी निश्चयात्मकपणे एवढे बिंबले होते की, कोणत्याही संकटाची ते तमा बाळगीत नव्हते. त्यांच्या निरुपणाचे एक सूत्र होते, 'स्व'ला जाणा व 'स्वस्थ' राहा! सुखसंवादातील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात महाराजांची ठाम भूमिका दिसून येते.
शिर धडावेगळे केले तर!
निर्भीड परखड प्रश्नांना महाराजांनी दिलेली उत्तरेही तशीच समर्पक आहेत, ते खालील प्रश्नावरुन समजते.
प्रश्न- जर तीक्षण तलवारीने एका झटकयात आपले शिर धडावेगळे केले तर त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? उत्तर : काहीच नाही! धड आपले शिर गमावून बसेल!
श्री महाराजांच्या संवादातील ठळक आणि वेगळे असे वैशिष्ट्य आहे. ते संवाद फक्त त्यांच्या भक्तअंसाठी अथवा विशिष्ट संप्रदायासाठी आहेत असे नव्हे, तर ज्या कोणाला जीवनाचे सत्य स्वरुप जाणून घेण्याची जिज्ञासा आहे त्या व्यक्तीला ते आवडतील. त्यांच्या ठिकाणी असणारी आत्मज्ञानाची जिज्ञासा संवाद वाचल्यानंतर निश्चितपणे पूर्ण होईल. प्रस्तुत सुखसंवादाची मांडणी अगदी वेगळ्याच धाटणीने कुठल्याही दार्शनिक तत्त्वांचा आधार न घेता स्वानुभवाधिष्ठित आहे, याची प्रचीती वाचकांना येईल.
कोणतेही श्रेष्ठ, अक्षर वाङ्मय हे कोणातरी एका श्रेष्ठ अलौकिक व्यक्तीचे उदगार असतात. जी व्यक्ती अधिक खोलवर विचार करु शकते, तीच कायमचे टिकणारे विचार देऊ शकते. हेच श्रेष्ठपणाचे खरे रहस्य आहे. महाराजांच्या वाणीचा हाच बाणा आहे. साधकांत आत्मविश्वास उत्पन्न करण्याचे, त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे व त्याला प्रेम देण्याचे सामर्थ्य महाराजांच्या शब्दाशब्दांमध्ये दिसून येते.
काही वाकये पाहा 'सुखदु:खाच्या किनार्यामधून जीवनरुपी नदी वाहते. मन जेव्हा जीवनप्रवाहाबरोबर न वाहता किनार्याला अडकून पडते, तेव्हा मनाची समस्या निर्माण होते.' दुसर्याला न दुखवता जीवन जगा. निरुपद्रवीपणा हा योगाचा प्रभावी प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही त्वरित ध्येयाप्रत पोचाल, त्यालाच मी निसर्गयोग म्हणतो.' याप्रकारे दैनंदिन अडचणी, चिंता यांना आध्यात्मिक मार्गाने मुक्ती देणारा हा ग्रंथ एकूणच सर्वांच्याच पचनी पडेल.
(श्रीनिसर्गदत्तमहाराजांशी प्रश्नोत्तररुपी ज्ञानचर्चा ) (वितरक: सतीश भा आव्हाड)
Reader Comments: Ravi Apte writes on Wed Aug 11 15:18:51 2004: Marathi version of "I am that" (by Mr. Maurice Frydman" was first made available as a set of 4 books by Mr. Gogate and Mr. Phadol. That edition became OutOfPrint recently, so a new edition has been published in 2000 as one book with 4 parts.
|
 |
 |
|