Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


बालिका पर्व
Author: सुरेखा शहा
Publisher: अक्षरमानव प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $2.74 $2.19 20% OFF ( ~90 Pages, R80)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
ई-प्रभात ...
बालपणीच्या हळूवार क्षणांचा जीवनवेध लेखिकेने या पुस्तकात घेतला आहे. लेखिकेच्या जीवनाचा बालपण ते लग्न ठरेपर्यंतचा साधारणत: १९४० ते १९५४ पर्यंतचा टप्पा या पुस्तकात आहे. गुलबर्ग्याजवळील आळंद हे लेखिकेचे मूळ गाव. गाव छोटेसे, कर्नाटक-महाराष्ट्र सीमारेषेवरील... पहिल्याच प्रकरणात या आळंदच्या मातीची ओढ लेखिकेच्या लिखाणातून दिसते. लेखिकेचे आजोबा त्या काळाच्या पुढे काही पावले जाणारे, दूरदृष्टीचा विचार करणारे आणि महिलांनीही शिकले पाहिजे... अगदी पोहण्यापासून सायकल चालवण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांना आल्या पाहिजेत अशा आग्रहाचे... ते वातावरण, आळंदचे नैसर्गिक पर्यावरण आणि ऐतिहासिक महत्त्व लेखिकेने उत्तम रेखाटले आहे... ज्या ठिकाणी त्यांची शारीरिक, मानसिक, शैक्षणिक जडणघडण झाली त्या मातीचं लेणं त्यांच्या लेखणीतून जाणवतं. लेखिकेचे मामा सोलापुरातील दयानंद कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यामुळे अर्थातच लेखिकेची पुढे सोलापूर शहराशी जी नाळ जोडली गेली ती कायमची. सोलापुरातील सरस्वती मंदिरात त्यांचे शिक्षण झाले, हे सांगताना सोलापुरातील शाळेपासून इतर अनेक वास्तूंशी त्यांचे भावविश्व जोडले गेले. त्या प्रत्येक आठवणी त्यांनी या पुस्तकातून जपल्या आहेत, साकारल्या आहेत. त्या काळात सोलापुरात छकडा चालवला जायचा, त्याचे वर्णनही लेखिकेने अचूक केले आहे.
सुरेखा शहा यांचे आजोळ बोरामणीचे. आजोबा शिवलाल बोरामणीकर हे स्वातंत्र्य चळवळीत होते. सोलापुरातील लढ्यात, कायदेभंगाच्या चळवळीत त्यांचा सहभाग होता. अर्थातच ते प्रभावही लेखिकेवर आहे, असे हे पुस्तक वाचताना जाणवते. कोणतीही गोष्ट न लपवता आत्मकथन कसे असावे, हे या पुस्तकातून सतत जाणवत राहते. लेखिकेच्या सुशीलामावशीबद्दलचा उल्लेख या पुस्तकात आहे. त्या काळातही पती निधनानंतर मॉण्टेसरीचा कोर्स करून सोलापूर श्राविकाश्रमात त्या बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका झाल्या... यावरून त्यांच्या घरातील शिक्षणाबद्दलची ओढ आणि महिलांना असलेले मानाचे स्थान लक्षात येते.
हैदराबाद मुक्ती संग्रामात हरवलेले सर्वस्व हे प्रकरण वाचताना त्यावेळी रझाकारांनी आळंदला घातलेला हैदोस आणि त्यात लेखिकेच्या आजोबांना आळंद सोडावं लागलं या घटना हेलावून टाकणार्या आहेत. रझाकारांनी पेटवलेला त्यांचा वाड्यात घराण्याची सर्व कमाई जळून खाक झाली होती. हा संपूर्ण काळच त्या बालमनावर एक वेगळे वैशिष्ट्य उमटवून गेला होता, हे सतत जाणवत राहते. हैदराबाद कअॅंगेअ६रस अधिवेशन, राष्ट्र सेवा दलाचं शिबीर अशा अनेक घटना लेखिकेने पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत. त्या सर्वच घटनांचे वर्णन यात आलेल्या व्यक्तिविशेषांसह मुळातून वाचण्यासारखे आहे. बालपणाचे संस्कार, त्या अमृतमय आठवणी आणि आयुष्य घडवतात, वैचारिक समृद्धतता आणतात असे म्हटले जाते, ते हे पुस्तक वाचताना जाणवत राहते.
-- मिलन म्हेत्रे

Write your review for this book

Other works of सुरेखा शहा
   जोहड
   जय यमुने जय जय गंगे
   राणी अब्बक्कदेवी
   पुत्रवती
   पुण्यनगरीच्या तेजस्वी हिरकण्या

Similar books:
  आठवणी
   नाच ग घुमा
   आहे मनोहर तरी ...
   गणगोत
   पुरचुंडी
   मैत्र
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.