|
स्फटिकदिवे
Author: त्र. वि. सरदेशमुख
Publisher: सुविद्या प्रकाशन
|
|
Price: $6.16 $4.92 20% OFF ( ~200 Pages, R180) Was recently Out of Print.*
Was recently Out of Print. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books.
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार १८ डीसेंबर २००५ 'स्फटिक दिव्यां'च्या प्रकाशगृहात
'शारदीय चंद्रकळे'नंतर तितकाच प्रगल्भ - परिपक्व, 'स्फटिकदिवे' हा 'आधुनिकांचे आर्त' प्रकट करणारा, प्रा. त्र्यं. विं. सरदेशमुख यांचा लेखसंग्रह मध्यंतरी प्रकाशित झाला. 'विनोबा भावे आणि साने गुरुजी या थोर आधुनिक सत्पुरुषांना आदरपूर्वक प्रेमांजली' वाहणार्या या लेखसंग्रहात महात्मा गांधी, जे. कृष्णमूर्ती, खलिल जिब्रान, बाबामहाराज आर्वीकर तसेच बा. सी. मर्ढेकर या प्रेमधर्मी आधुनिक चिंतकांवर (ज्यांनी आपल्या प्रचतीनुसार परिवर्तनाच्या व सदगतीच्या वाटा दाखवल्या) आधारलेले 'त्र्यं विं'चे लेख कमालीचे अर्थवान आहेत.
'साहित्याचे प्राणपंख : आस्था आणि सदभाव' हा ग्रंथातील प्रारंभीचा लेख केवळ अपूर्व आहे. साहित्याचे थोरपण आणि समीक्षेची सफलता याविषयीचे आपले चाळीस-पंच्चेचाळीस वर्षांतले मनाशी दृढ होत गेलेले चिंतन त्यांनी लेखात नोंदविलेले आहे. हा लेख त्यांच्या साहित्य - समीक्षा दृष्टीवर नेमका प्रकाश टाकतो. लवचिकता आणि काळजीपूर्वक केलेली बांधणी यातून सृजनशीलतेची व सत्यदर्शनाची होणारी पहाट, ही या लेखाची खास जमेची बाजू. दुर्दैवाने 'त्र्यं. विं.'चा हा अखेरचा लेखसंग्रह ठरला आहे. पण त्यातील संदर्भवैपुल्य, हेतुगर्भता आणि परिणामसुंदरता यांचा काव्यात्म वृत्तीने, त्यांनी घेतलेला प्रगल्भ शोध पुढील अनेक पिढयांना - समीक्षकांना प्रेरणादायी ठरणारा आहे यात शंका नाही.
अभिजात रसिकता, तरल संवेदनक्षमता, प्रखर बुद्धिमत्ता, काव्यात्मकता आणि गाढ चिंतनशीलता यांचे सहज मिश्रण प्रा. सरदेशमुख यांच्या लिखाणात असते. यातही लेखातील कोमल अंत:प्रवाह, शब्दलालित्य वाचकाला फार मोहवून टाकते.
'स्व'रूपाचा शोध हे साहित्याचे अध्यात्मच असते. जे कृष्णमूर्ती - महात्मा गांधी, मर्ढेकर आणि आर्वीकर तसेच खलिल जिब्रान यांच्या वाणीने व ग्रंथाने जे सखोल, समृद्ध व उदार आशयगुहा प्रकट केले त्यातील विश्वात्मक चैतन्याच्या आत्मवत्तेला व गतीशील जाणतेपणाला 'त्र्यं वि' स्पर्श करतात. या प्रभुतींचे साहित्य अहंभावाचा निरास आणि आत्मभावाचा उल्लास अंत:करणात घडावा यासाठी कटिबद्ध असते. तिची नैतिक - सामाजिक बांधिलकी त्यात सामावलेली असते. मी-पणातील उणीव तू-पणाला आलिंगन देते तेंव्हाच नष्ट होते. व्यक्तिजीवन ही सदभाव - असदभाव, प्रकाश आणि तिमिर यांनी क्षणोक्षण भारलेली असतात. नकार कशाला द्यायचा, अंगीकार कशाचा करायचा या निवडीचे स्वातंत्र्य माणसाच्या प्रज्ञेत, विवेकात असते. या प्रज्ञेला जागवण्याचे कार्य असे श्रेष्ठ साहित्य करीत आले आहे, असे 'त्र्यं विं.'नी या लेखांतून सूचित केले आहे. (डॉ. कमलेश)
|
 |
 |
|