|
भोपळा, बायको आणि डोंबलं
Author: गंगाधर गाडगीळ
Publisher: मौज प्रकाशन
|
|
Price: $6.85 $5.48 20% OFF ( ~190 Pages, R200)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)
|
* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.
Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.
Synopsis: ई-सकाळ रविवार ११ डीसेंबर २००५ गमतीसाठी गंमत मौज प्रकाशन गृह ही विख्यात प्रकाशन संस्था विनोदी पुस्तक फारशी छापत नाही. पहिल्या पंचवीस वर्षांमध्ये या संस्थेने 'बटाटयाची चाळ' हे एकमेव विनोदी पुस्तक प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर गंगाधर गाडगीळ यांच्या निवडक विनोदी कथांचा संग्रह त्यांच्याकडून यावा, ही गोष्ट नक्कीच लक्षणीय. 'भोपळा, बायको आणि डोंबलं' या शीर्षकांतर्गत गाडगीळ यांच्या तेरा विनोदी कथा अलीकडेच एकत्रित स्वरूपात समोर आलेल्या आहेत. कथांची निवड प्रा. सुधा जोशी यांनी केलेली असून पुस्तकाला गाडगीळ यांची विस्तृत प्रस्तावना आहे. गाडगीळ यांचा पोरकट बंडू अनेक मराठी वाचकांना परिचित आहे. तो, त्याची खमकी बायको स्नेहलता आणि त्याला सतत शहाणपण शिकवणारा त्याचा मित्र नानू या त्रिकुटानं पुष्कळ उचापती केल्या. अत्यंत मर्मभेदी नवकथा लिहिणार्या गाडगीळ यांनी त्याच काळात, जोडीने अशा कथा लिहाव्यात याबद्दल काहींनी आक्षेपही घेतले. पण गाडगीळ आपल्या परीने अशा प्रकारचे लिहीतच राहिले. एकीकडे छोटया-सामान्य माणसाच्या जगण्यातल्या खटपटी-लटपटी आणि दुसरीकडे अत्यंत अतार्किक, अकल्पित अशा फॅंटसीवजा घटना या दोन टोकांमध्ये गाडगीळ यांची विनोदी कथा हेलकावत राहिली. प्रस्तुत पुस्तकामध्येही या दोन्ही नमुन्यांची रेलचेल आहे. 'माझ्या रक्तदाबाची एएशीतैशी', 'बाळू बायकोला खडसावतो', 'राग गिळायचा, गिळायचा, गिळायचा तरी किती?' या कथा मध्यमवर्गीय, सांसारिक पुरुषाची घुसमट गमतीदार पद्धतीने रंगवतात. साधं सकाळी उठून, आवरून ऑफिसला जाणं; पण त्यात क्षणाक्षणाला अडचणी, विघ्नं येतात आणि सगळ्यांचं खापर त्या बिचार्या पुरुषाच्या माथी फुटतं. बायकोनं साधीशी म्हणून सांगितलेली कामं त्याचा प्रचंड गोंधळ उडवतात. पोरंबाळं त्याचं डोकं पिकवतात. तो सगळ्या जगावर कावतो, तरीही दुसर्या दिवसाची वाट बघतोच बघतो. मानवी जीवनाचं हे सनातन वास्तव. आणि फॅंटसी कुठली, तर मुलाला गणितात शून्य मार्क मिळाल्याचं बघून नवराबायकोत धुसफूस होणं आणि या शून्याचा भोपळा होऊन त्यातून बसून गडगडत कुठेतरी जाणं! 'बुगडी माझी सांडली गं|.' हे गाणं सारखं एएकता एएकता ती गाणारी बाईच कल्पनेत समोर येणं. पुढे या कथेत नारदमुनी, माकड, पोलिस, भगवान शंकर अशा पात्रांची भरपूर घडामोड होते आणि सगळंच प्रकरण तर्कातीत पण रंजक होऊन बसतं. सध्याच्या मराठी निवेदनात अशी फॅंटसी सहजासहजी आढळत नाही. गाडगीळ यांच्या या विनोदाला कोणत्याही प्रयोजनाचं ओझं वाहावं लागत नाही. हा विनोद कोणत्याही चळवळीचं, विचारधारेचं साधन बनत नाही. सामाजिक अपप्रवृत्तींवर नेम धरत नाही. ख्यातनाम व्यक्तींची चेष्टा, विडंबन करत नाही. केवळ 'गमतीसाठी गंमत' एवढाच त्याचा आवाका. या पुस्तकातली मला सर्वांत आवडलेली कथा म्हणजे 'माणसानं जन्माला यावं तरी केव्हा?' आपण ज्या काळात जन्मतो, जगतो त्यापेक्षा वेगवेगळ्या काळातल्या गोष्टींचं आपल्याला सगळ्यांना आकर्षण असतं. प्रत्येक काळातले सगळे फक्त फायद्याचे मुद्दे आपल्याला हवे असतात. या विचारातली गफलत या कथेत फारच मोहकपणे उतरते. गाडगिळांचं 'गाडगीळपण' या कथेत प्रकर्षानं जाणवतं. (मंगला गोडबोले)
|
 |
 |
|