Search Browse Subjects Browse Authors Shopping Cart

Quick Search:

Advanced Search
(You can always search in Google or Bing using Unicode Devnagari as "मी कसा झालो site:rasik.com")
 

Marathi Library New
- Select books and magazines.
- Receive by mail.
- Read them.
- Send back by mail.
- No shipping charges!
Marathi CDs & Cassettes
Marathi Books
  New Additions
  Browse Categories
  Browse Authors
  Browse Publishers
  Read Synopsis of Books
Best marathi books
  Favorite of Our Visitors
  Sahitya Akademi Winners
  List of Best by Antarnad
  List of Best by AIR 1997
  List of Best by ma.TA. 1986
Online Marathi Books
Learn Phonetics
About Us
Tell us your favorite books
Download Fonts


मेल्टिंग पॉट
Author: मोहना जोगळेकर
Publisher: उन्मेश प्रकाशन
Add to Shopping Cart
Price: $3.59 $2.87 20% OFF ( ~150 Pages, R100)*
Reaches you in 4 to 5 weeks. We do not carry inventory. Availability status of Marathi books is always fluid. We promptly post refund for OutOfPrint books. (More options)

* Price does not include shipping charge. It is calculated for the the full order.

Note: Because of lack of uptodate information, certain books could be out of print or unavailable. In such case, the cost for those books will be refunded in full to you.


Synopsis:
एका बाजूला भारतीय स्पदनांशी एकरूप झालेलं मन आणि एका बाजूला अमेरिकन लाईफस्टाईलमध्ये गुरफटून घेण्याचा निर्णत. या दोलायमान अवस्थेतल्या या काही कथा. स्वत:लाच शोधणार्‍या.
अमेरिकेतल्या 'मेल्टिंग पॉट'मध्ये वितळतानांची धग आणि पुन्हा स्वत:ला घडवण्याची प्रक्रिया - दोन्हीही अंतर्मुख करायला लावणारं. 'मेल्टिंग पॉट'मधल्या कथा वेगवेगळ्या देशांतून येऊन 'अमेरिकन" होणार्‍या माणसांचा संवेदनशीलपणे वेध घेतांना दिसतात. भारतीय आणि अमेरिकन या दोन्ही नात्याच्या गुंत्यांच्या पलिकडे जानारं अलिप्त मन हे या कथांचं वैशीष्ट्य.
अमेरिकन समाज आणि संस्कृतीचं आकर्षण असणार्‍या मराठी वाचकांना 'मेल्टिंग पॉट'मधल्या कथा वेगळी 'दृष्टी' देतील.
-- मेधा राजहंस, उन्मेष प्रकाशन
-------------------------------------
अनुक्रमणिका:
१. अंतराय
२. उल्लंघन
३. त्या दोघी
४. वर्तुळाचे टोक
५. एकटी
६. कालचक्र
७. न परतीची वाट
८. प्राक्तन
९. अनेकीतली एक
१०. पिपासा
११. निर्णय
१२. खेळ
१३. मनातलं घर
१४. प्रस्तर
-------------------------------------
अंतराय
ऑस्ट्रेलियाहून सुट्टीसाठी आलेल्या शमिकाची अचानक कॉलेजच्या मैत्रिणीशी गाठ पडते. मैत्रिणी ठरवून धमाल करण्यासाठी एकत्र भेटतात. शमिका आणि रंजन तर शाळेपासून एकत्र शिकलेल्या. त्या दोघी सांगोल्याला जायचं नक्की करतात. तिथे पोचल्यावर आता पन्नाशीला पोचलेल्या शाळूसोबत्याची गाठ पडते. मधली वर्ष कथा, कहाणी बनून समोर येतात.
शमिकाने सांगोल्यातलाच तिचा परममित्र दहा वर्षापूर्वी अपघातात गमावलेला असतो. इतक्या वर्षानी त्याच्या घरातल्याना भेटताना अस्वस्थ शमिका तुषारच्या भावाच्या वागण्याने चकित होते. परत निघताना तिच्या मनाचा निर्णय पक्का होतो. अंत:करण पिळवटून टाकणारी कहाणी.
-------------------------------------
उल्लंघन
दोन जीवलग मित्रांची कहाणी. बेफिकीर ब्रायन आणि संवेदनशील क्रिस जंगलात भटकायला गेलेले हे मित्र दुर्देवाने रस्ता चुकतात. रात्रीच्या भयाण शांततेत गप्पा रंगतात. वर्षानुवर्ष शेजारी रहात असूनही एकमेकाच्या कौटुंबिक घडामोडीबद्दलची अनभिज्ञता त्यांना आश्चर्यचकीत करते. जसजशी रात्र चढत जाते तसतसा ब्रायन अस्वस्थ व्हायला लागतो. हळूहळू क्रिस सगळी सूत्र हातात घेतो. दोघांमधले संबध ताणले जातात. क्रिसच्या मानसोपचारतज्ञाकडच्या खेपेचं कारण प्रथमच ब्रायनला समजतं तर वरवर बेफिकिर वाटणारा ब्रायन किती भित्रा आहे हे क्रिसच्या लक्षात येतं. तहानभुकेने ब्रायन आजारी पडतो. सुटकेची लक्षणं दिसत नाहीत म्हटल्यावर शेवटी स्वत:ला मारुन टाकण्याची भीक क्रिसकडे मागतो.
क्रिसच्या हातातल्या ब्रायनच्या आयुष्याच्या दोरीचं काय होतं?
-------------------------------------
त्या दोघी
त्या दोघी! उच्चशिक्षित मायलेकी. परदेशात येवून तिथल्या परिक्षेच्या भाराखाली दबलेली, नोकरी करता येत नाही या दु:खाने व्यथित; नवर्‍यामुलांवर चिडचिड करणारी मुलगी आणि तीस वर्षापूर्वी डॉक्टरीचा मोह सोडून नवर्‍याबरोबर परदेशात स्थायिक झालेली तिची आई.
दोघींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि दोघींमधल्या नात्याचा सुंदर गोफ
-------------------------------------
वर्तुळाचे टोक
सुदेश, रिमा आणि स्वाती. विचित्र नात्याच्या धाग्यात विरुन गेलेले तीन जीव. त्या नात्यातल्या एकेक धाग्याचा अर्थ शोधण्यात गुंतलेले. सुदीपच्या जन्माने तिघं जवळ आल्यासारखे वाटत असतानाच नियती कल्पनेपलीकडच्या सत्याला सामोरं जाणं भाग पाडते. या वर्तुळाच्या टोकात सामील होते सुमुखी....काय घडतं सुदेशच्या संसांरात?
-------------------------------------
एकटी
ती अमेरिकेत नवर्‍याबरोबर येते. दोन वर्षानी परत जाण्याची इच्छा बाळगत... ही दोन वर्ष कधीच संपत नाहीत. भारतातल्या प्रत्येक भेटीत पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय ही जाणीव तिचं मन पोखरत रहाते. कितीही नाकारलं तरी आपण काठावर उभे आहोत ही भावना नष्ट होत नाही.
ती अलिप्त होते. अचानक भारतात परत जायचं म्हणून अमेरिकेतही अलूफ राहीलेली ती आमुलाग्र बदलते. वर्ष जातात. तिचा चिमुकला पंख फुटून भरारी मारायला लागतो. त्याच्यासाठी म्हणून कराव्या लागणार्‍या गोष्टींची गरज उरलेली नसते.
पुन्हा एकदा तिचं मन उचल खातं. परत जाण्याची इच्छा बळावते. ती मुलाशी आणि त्याच्या बाबांशी बोलून आपला निर्णय सांगायचंं ठरवते.
काय होतं पुढे? वाचा 'एकटी' या कथेत!
-------------------------------------
कालचक्र
"अॅना मी लहान पडते तुझ्यापेक्षा, पण रोज सांगते तेच पुन्हा सांगते आपल्या समाजाचे नियम पाळायलाच हवेत. बाहेरच्या जगाशी आपल्याला काहीही देणंघेणं नाही, तसचं तिथल्या माणसांशीही. जेकबशी लग्नं होणार या वेडया आशेवर असशील तर सावर स्वत:ला. अजून हे तुझ्या माझ्यातच आहे तोपर्यंंत ठीक आहे. नुसता संशय जरी आला कुणाला तरी वाळीत टाकतील तुला." डॅनिअलने एका दमात बोलणं संपविलं आणि मिचमिच्या नजरेने ती अॅनाकडे पहात राहिली.
कालबाहयं संस्कृती जोपासणार्‍या ऑमिष समाजात घडलेली नाटयमय कथा
-------------------------------------
न परतीची वाट
परदेशात स्थायिक झालेलं कुटुंब. त्या देशात रुळण्याचा, सामावून जाण्याचा प्रयत्न करणारे आणि आपल्या मुलांना मोठे करणारे वडील असं परिपूर्ण सुखी चित्र. संपूर्ण वेगळया संस्कृतीत मूल वाढवणं केव्हाही कठीणच, त्यातूनही मुलीला लहानाचं मोठं करणं तर तिच्या दृष्टीने तारेवरची कसरत...
वयात आलेली मुलगी जेव्हा लग्नाला नकार दिलात तर लग्न न करताच प्रियकराबरोबर रहाण्याची धमकी देते तेव्हा काय घडतं त्या कुटुंबात? मुलीच्या मनाप्रमाणे करु शकते ती? यशस्वी होतात वडील तिला समजाविण्यात?
-------------------------------------
प्राक्तन
दोन्ही मुलं परदेशात गेल्यावर आता भारतात राहून काय करायचं या विचाराने सुमित्रा नवर्‍याचं मन वळवून अमेरिकेत मुलांसमवेत राहण्याचं पक्क करते. नोकरी करणारी मुलगी, शिकणारा मुलगा यामध्ये जयेश, सुमित्रा आपला जीव रमविण्याचा प्रयत्न करतात. ते साध्य होतय असं वाटत असतानाच दैव एकामागून एक घाला घालतं. कुणाच्याही भाळी दैवाने असं 'प्राक्तन' रेखाटू नये अशी प्रार्थना करावी असं वाटणारी कथा
-------------------------------------
अनेकीतली एक
"आई, एमएस झाल्यावर वाटलं होतं आता शिक्षणाला पूर्णाविराम. पण शिक्षणाला वयाचं बंधन नसतं हेच खरं. केदार कायम बीझीच असतो. मला मात्र स्वत:ला बीझी ठेवण्यासाठी इथे आल्यापासून काहीतरी शोधावं लागतय. हेच करतेय मी वर्षानुवर्षे. एकदा तो शोध संपला की घेते मी गुंतवून स्वत:ला त्यात. पण कधीतरी प्रश्न पडतो "का असतं हे फॉरेनचं आकर्षण आपल्याला?" एका बरोबर दुसर्‍याची फरफट एवढंच समीकरण मी इथे येणार्‍या बर्‍याच जणांच्या संसारात पाहिलय. आता आताशा तर एकटीने यश, अपयश पचविण्याचा कंटाळा यायला लागलाय. केदारला हे सगळेमाझ्या मनातले खेळ वाटतात. मी कुठेच समाधानी नाही असं वाटतं त्याला. पण त्यामुळे आमच्यातला संवाद खुंटला हे लक्षात घेत नाही तो. पूर्वी खूप उत्साहाने माझ्या मनातले बेत ऐकवायची मी त्याला, तो ही तसा हो ला हो करायचा म्हणा. पण हळूहळू एकसूरी झालय आता. संसार म्हणजे दोघांनी एकमेकासाठी करायची तडजोड असेल तर मग एकाचच करिअर महत्वाच कसं ठरतं याची उमज मला अद्यापही पडत नाही. एक खर पैशापुढं सर्व गौण असतं याची प्रचिती मात्र सारखी येत राहते. शेवटी अमेरिकन लोकं म्हणतात तसं, ब्रेडविनर केदार आहे ना? त्यात बायकोची स्वप्नं दुय्यमच ठरतात.
अनेकीतल्या एकीच्या मनातली ही खंत.
-------------------------------------
पिपासा
सीमेवर घडलेली ही सत्यघटना. शाळकरी मुलींना सैनिकांच्या भुकेसाठी पुरवठा करण्याची जबाबदारी स्विकारलेला कंत्राटदार आणि स्व:ताच्या मुलीसकट सगळयांची या सैनिकांपासून सुटका करण्यासाठी धडपडणार्‍या, तोंड बंद ठेवण्यासाठी होउ शकणारी मुलीची सुटका नाकारत वरपासून, खालपर्यंत सडलेल्या यंत्रणेची पाळंमुळं उखडून काढणार्‍या एका धारिष्ठ्यवान स्त्रीच्या लढयाची ही कहाणी. सत्यघटनेवर आधारित कथा.
-------------------------------------
निर्णय
कार्तिकच्या बाबतीत आपल्याला काय आवडेल? दोनच पर्याय समोर होते. गाडी, पैसा अशासारख्या अद्ययावत, चैन अशा सुखसोयी स्वीकारून कार्तिकला 'अमेरिकन लाईफस्टाईल'मध्ये गुरफटून टाकायचं किंवा हे सगळं नाकारून त्याचा कोवळेपणा जपायचा. काय खरं आणि काय खोटं? बसल्याबसल्या ती दोन्ही दृश्यं कल्पनेनी रेखाटत राहिली. बराच वेळ तिच्या या आवडीच्या खेळात ती जीव गुंतवत राहिली. कुठलं दृश्य प्रत्यक्षात अनुभवायचं एवढाच निर्णय घ्यायचं तिच्या हातात होतं. ते जोपर्यंत ठरत नव्हतं तोपर्यंत तिचा खेळ संपणार नव्हता. पण हाच तर तिच्या आवडीचा खेळ होता.
काय होतो निर्णय?
-------------------------------------
खेळ
"कमाल करतात ही मुलं. तरीच आक्रमक असतं, लिसाचं वागणण माझाबरोबर; सगळं ओरबाडून घेतल्यासारखं करते नेहमी. अरे, मी काय कमी करतो ह्यांच्यासाठी? कुठं गेलो की आधी तिन्ही बायकांची मुलं आणि नातवंड यांच्यासाठी उधळून दिल्यासारख्या भेटवस्तू आणत होतोच ना इतकी वर्षं? कशाला कधी नाही म्हटलं तरी हळूहळू निकोलच्या मुलांशी संबंध संपला, त्याचं दु:ख अजूनही डाचतं माझ्या मनाला."
झटपट लग्नं तितक्याच पटकन घटस्फोट या साखळीत अडकलेल्या, मुलांच्या प्रेमाला हपापलेल्या एका साध्या सरळ माणसाची कथा
-------------------------------------
मनातलं घर
"रसिका, तू गेली नसतीस तर नक्कीच मी भाग्यवान ठरले असते. मला फक्त तुला सासरी पाठवताना होणारी पाठवणीच भावणार होती. पण शेवटी निर्णय तुझा आहे. जपून रहा. अमेरिकेत असलो तरी आपली मूल्यं, नितीमत्ता जपायचा प्रयत्न तरी करायला हवा." भरुन आलेल्या आवाजावर ताबा मिळवण्याअधीच रसिकाने तिला अलगद थोपटलं.
सतत वाटणारी भिती आज खरी ठरली होती. तिच्या मुलीने निर्णय घेतला होता. तो बदलणं तिच्या हातात नव्हतं, आता फक्त या घरात राहून रसिकाची काळजी करणं एवढच हातात उरणार असं वाटायला लागलं होतं तिला... काय होतं तिच्या मनातल्या घराला?
-------------------------------------
प्रस्तर
आई, मुलगा आणि वडिलांच्या नात्यातील ही विचित्र गुंतागुंत. आपल्या तरुण मुलाच्या आक्रमकपणाने शीला हादरुन जाते. हा वडिलांच्या वळणावर तर नाही ना चालला हा प्रश्न तिला तिच्या संसाराकडे वळून पहायला लावतो. मुलाला मानसोपचारतज्ञाच्या मदतीने माणसात आणायचे तिचे प्रयत्न यशस्वी होत आहेत असं वाटत असतानाच पुन्हा एकदा गाडलेल्या संसारातील भुतं जागी होऊन तिच्या समोर उभी रहातात. विसरुन गेलेलं आयुष्य नव्याने सुरु करण्याची वेळ तिच्यावर येवून ठेपते. काय होतं त्या तरुण मुलाचं, वडिलांचं आणि समर्थपणे येईल त्या प्रसंगाला तोंड देणार्‍या शीलाचं?
शीला, सॅम आणि रॉनच्या आयुष्याचा प्रवास वाचा 'प्रस्तर' या उत्कंठावर्धक कथेत!

ई-सकाळ रविवार २८ मे २००६
अमेरिकेत वितळणारे भारतीय
( डॉ. प्रल्हाद वडेर )

आजकाल भारतीयांना अमेरिकेची अलिबाबाची गुहा सतत खुणावते आहे; पण तिथं आत जाता येतं; पण बाहेर येता येत नाही हे जेव्हा कळतं, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अमेरिकेत गेलेल्या भारतीयांच्या दुसर्‍या व त्याहीपेक्षा तिसर्‍या पिढीचे "प्रॉब्लेम्स' फार निराळे आहेत. अमेरिकेच्या "मेल्टिंग पॉट'मधली माणसाला वितळून टाकण्याची धग एवढी प्रचंड आहे, की त्यातून बाहेर पडून पुन्हा स्वत-ची भारतीय संवेदनशीलता जपणं, स्वत-ला घडवणं ही प्रक्रिया जीवघेणी आहे. मोहना जोगळेकर या अमेरिकेत विविध राज्यांत वास
जग जवळ आलं. त्याच्या कानाकोपर्‍यातून माणसं अमेरिकेत आली. प्रत्येकाच्या मनात आपला देश, संस्कृती, मूल्यं यांची ओढ आहे. ती जपत पुढच्या पिढीतल्या इथंच जन्मलेल्या मुलांत ती कशी रुजवायची हा मोठा प्रश्न त्यांना पडतो; कारण अमेरिकेत जीवनाचा प्रचंड वेग, वेगळी नीतिमूल्यं, तिथलं मुक्त जीवन, करिअर माइंडेड नवरा-बायको, तरुण स्त्री-पुरुषांची बदलती नाती यात होणारी फरफट लेखिका विविध अनुभवांतून मांडण्यात काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. तिच्या मर्यादित यशाचं कारण प्रत्येक अनुभवाला तिला ""बांधीव''रूप देता आलेलं आहे असं नव्हे. मधू मंगेश कर्णिकांनी प्रस्तावनेत त्यांच्या कथातील काही त्रुटींचा उल्लेख केला आहे.

पंधरा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाहून आपल्या गावी आलेल्या शमिकाला तेथील नाती व जीवन कशी अस्वस्थ करतात हे "अंतराय'मध्ये दिसतं. तिची मैत्रीण जातीबाहेरच्या लग्नामुळे आईबापांना तुटली आहे. नात्याचा, माणसांचा, मैत्रीचा शोध पुन्हा घेणं तिला अशक्य होतं. बावीस वर्षं एकदा तरी सांगोल्याला जायला हवं, असं म्हणणारी शामिका आता पुन्हा कधीही परत येणार नव्हती. एका भ्रमनिरासाला तिला सामोरं जावं लागतं.

अमेरिकेत येऊन सहा वर्षं झालेल्या निमाला मिहीरशी अजूनही जमवून घेता येत नाही. भरपूर ओळखी होतील, नोकरी मिळेल, भारतातच असल्यासारखं वाटेल, यातलं प्रत्यक्षात काहीही घडत नाही. तिच्या आईला तिच्या मनाचा गुंता उलगडत नाही. करिअर एका मार्कानं चुकल्यामुळे आलेलं अपयश तिला चिडचिड बनवतं. या उलट तिची आई स्वत-ला सहजपणे विसरून मुलांनातवंडात मिसळते. हा दोहोंतला फरक "त्या दोघी' या कथेत येतो आणि आईच पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याचा आत्मविश्वास मुलीत जागवते.

सुदेशनं स्वातीच्या गळ्यात माळ घातली आणि त्याच्यापासून दिवस गेलेली, लग्न रजिस्टर झालेली रिमा घरी आल्यावर डॉक्टर झालेल्या सुदेशकडून ही अपेक्षा कोणी केली नसती. वडिलांनाही त्यानं असं का करावं हे कळत नाही. स्वाती, रिमा आणि सुदेश यांची ही त्रिकोणी प्रेमकथा लेखिकेनं एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून मांडली आहे; पण हे "वर्तुळाचं टोक' रंगविताना लेखिकेला बर्‍याच उलट्यासुलट्या उड्या घ्याव्या लागल्या आहेत हेही खटकतं. "एकटी' या कथेत लेखिकेनं घेतलेल्या विविध व्यक्तींच्या एकाकीपणाचा शोध आहे. भारतात जाऊन आलं, की कधी एकदा परततोय असं वाटतं. नातेवाईकांपासून आपण वेगळं पडतोय असं त्यांना वाटतं. मुलंही मोठी होऊन स्वत-च्या विश्वात रमतात. तीही भारतात जायला तयार नसतात.

या संग्रहातील काही कथा अ-भारतीयांच्या आहेत. त्यात "उल्लंघन'मधील आपल्या मित्राला त्याच्याच सांगण्यावरून मृत्यू देणारा क्रिस आहे. "कालचक्र'मधील आठ भावंडं असलेली अॅना आहे. जेकबशी लग्न करणं हे समाजाला कधीच मान्य होणार नाही हे सत्य तिला कळतं. स्टीव्हन तिच्यासाठी झुरतो; पण अॅनानं जेकबला भावनेच्या भरात सर्वस्व दिलंय हे कळूनही तो तिला स्वीकारतो. त्या नजरेतलं प्रेम, ओढ तिला पहिल्यांदाच समजते. ""न परतीची वाट''मधल्या अर्धी अमेरिकन झालेल्या निकिताबद्दल तिची आई मेधाला काळजी वाटते. गोरी, नाजूक निकिता प्रेमात पडते ती काळ्या निग्रो युवकाबरोबर; पण भारतात परत जायचे परतीचे दोर कधीच कापलेले असतात. भारतीयांच्या अमेरिकेतील तिसर्‍या पिढीच्या समस्या अशा विविध असतात हे या कथेतून जाणवतं.

"प्राक्तन'मध्ये मानसी, अजय या बहीण-भावंडांना वेगळ्याच प्राक्तनाला सामोरं जावं लागतं; पण योगायोगाच्या अतिरेकामुळे ही कथा बटबटीत होते. "अनेकातील एक' मधील दोन पिढ्यांतील जनरेशन गॅप, सुखासीनतेचा मोह, नात्यांचा विसर वाचकाला अस्वस्थ करतो. "पिपासा'मध्ये सैनिकांचे अत्याचार आणि त्यातही इतर मुलींसाठी स्वत-च्या मुलीला सोडवून न आणता गावातल्या मुलींना सोडवून आणणारी नीना आहे.

अशा विविध अनुभवांची भाषा मात्र काही वेळा खटकते. अनेकदा फक्त क्रियापदं मराठी असणं, बाकी सर्व इंग्रजी असं स्वरूप भाषेला येतं; तसंच "कथे'च्या "फॉर्म'कडेही लेखिकेनं लक्ष पुरवलं, तर मराठी वैशिष्ट्यपूर्ण कथांत त्या भर घालू शकतील असं वाटतं.

मेल्टिंग पॉट - मोहना जोगळेकर, उन्मेष प्रकाशन
चंद्रनील अपार्टमेंट, "सी' विंग, सिंहगड रस्ता, पुणे ३०.
पाने - १३१, किंमत - १०० रुपये.

- डॉ. प्रल्हाद वडेर

Loksatta Review

Write your review for this book

Other works of मोहना जोगळेकर
   रिक्त

Similar books:
  कथासंग्रह
   बटाट्याची चाळ
   तार्‍यांचे बेट
   चिमणरावांचे चर्‍हाट
   अघळ पघळ
   मिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा
   More ...  

Home Help Desk FAQ Your Comments

© 1998 - Rasik Enterprises.